Sanjay Mishra Buys Sea Facing Apartment In Mumbai: कधीकाळी 150 रुपये रोज काम करायचा 'हा' अभिनेता, आज मुंबईत खरेदी केलंय 4.75 कोटींचं सी फेसींग अपार्टमेंट
Sanjay Mishra Buys Sea Facing Apartment In Mumbai: कधीकाळी फिल्म इंडस्ट्री सोडून या अभिनेत्यानं 150 रुपये रोजानं ढाब्यावर काम करायला सुरुवात केलेली. पण, त्यानंतर पुन्हा इंडस्ट्रीत पदार्पण करुन यशाचं सर्वोच्च शिखर गाठलं.

Sanjay Mishra Buys Sea Facing Apartment In Mumbai: बॉलिवूडमध्ये (Bollywood News) अनेक सेलिब्रिटी (Celebrity) आहेत, ज्यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर मोठं नाव कमावलं आहे. तर, अनेक अभिनेते, अभिनेत्री अशा आहेत, ज्यांना यशाचं सर्वोच्च शिखर गाठताना फार संघर्ष करावा लागला. असाच एक बॉलिवूडचा गुणी अभिनेते म्हणजे, संजय मिश्रा (Sanjay Mishra). कधीकाळी फिल्म इंडस्ट्री सोडून या अभिनेत्यानं 150 रुपये रोजानं ढाब्यावर काम करायला सुरुवात केलेली. पण, त्यानंतर पुन्हा इंडस्ट्रीत पदार्पण करुन यशाचं सर्वोच्च शिखर गाठलं आणि आज स्वतःच्या मालकीचं 4.75 कोटींचं सी फेसींग अपार्टमेंट खरेदी केलं आहे.
बॉलीवूड अभिनेता संजय मिश्रा यांनी मुंबईतील मड आयलँडवर एक आलिशान सी फेसींग अपार्टमेंट खरेदी केलं आहे. पंधराव्या मजल्यावर असलेल्या या अपार्टमेंटची किंमत तब्बल 4.75 कोटी रुपये असल्याची माहिती मिळत आहे. हे अपार्टमेंट रहेजा एक्झोटिका सायप्रस इमारतीत आहे.
कागदपत्रांनुसार, या अपार्टमेंटचा कार्पेट एरिया 1,701 चौरस फूट आणि डेक एरिया 201 चौरस फूट आहे. याचा अर्थ असा की, हे घर एकूण 1,900 चौरस फुटांपेक्षा जास्त आहे, जे सी फेसींग आहे.
4.75 कोटींचं सी फेसींग अपार्टमेंट
आजवर अनेक अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलेले अभिनेते संजय मिश्रा 1995 पासून चित्रपटांमध्ये काम करत आहे. संजय मिश्रा यांनी सध्या मड आयलँडमध्ये सी-फेसींग अपार्टमेंट खरेदी केल्यामुळे चर्चेत आहे. 'जॅपकी'कडे असलेल्या नोंदणी कागदपत्रांनुसार, अपार्टमेंटची किंमत 4.75 कोटी आहे.
View this post on Instagram
मिडिया रिपोर्टनुसार, संजय मिश्रा यांचं अपार्टमेंट मड आयलँडमधील रहेजा एक्झोटिका सायप्रस इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर आहे. गायक जुबिन नौटियाल यांचंही त्याच इमारतीच्या 34 व्या मजल्यावर एक अपार्टमेंट आहे. संजय मिश्रा यांच्या अपार्टमेंटमध्ये 1,701 चौरस फूट रेरा-मंजूर कार्पेट एरिया आणि 201 चौरस फूट अतिरिक्त डेक एरिया आहे. संजय मिश्रा यांनी या अपार्टमेंटसाठी 28.50 लाख स्टॅम्प ड्युटी आणि 30,000 नोंदणी शुल्क भरलं. 11 जुलै 2025 रोजी अपार्टमेंटची नोंदणी झाली. या नव्या घराच्या खरेदीमुळे संजय मिश्रा यांचा मुंबईतील प्रीमियम प्रॉपर्टी मालकांच्या समावेश झाला आहे. या घराचं सौंदर्य आणि स्थान हे घर आणखी खास बनवतं.
दरम्यान, मड आयलँड आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर बऱ्याच काळापासून बॉलिवूड स्टार्सचं एक आवडतं ठिकाण आहे. विक्रांत मेस्सी, अर्चना पूरण सिंह आणि पंकज त्रिपाठी सारख्या स्टार्सची इथं घरं आहेत. जवळच्या वर्सोवा परिसरात कार्तिक आर्यन, रोनित रॉय, विवेक अग्निहोत्री आणि आयुष्मान खुराना सारख्या सेलिब्रिटींचीही प्रॉपर्टी आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























