1600 कोटींची संपत्ती, बॉलिवूडमधील सर्वांत श्रीमंत पत्नी; तिचं प्रॉडक्शन हाऊस वर्षाला कमावतंय 500 कोटी
Bollywood : बॉलिवूडमधील एका बड्या स्टारच्या पत्नीची संपत्ती 1600 कोटी इतकी आहे.

Bollywood : बॉलीवूडमधील स्टार्स जितकी कमाई चित्रपटांमधून करतात, तितकीच कमाई त्यांच्या पत्नी देखील करत असतात. बॉलीवूडमधील सेलेब्रिटींच्या बायका देखील स्वतःचे बिझनेस चालवतात, याबद्दल अनेकांना फारसं माहीत नसतं. बॉलीवूडचा ‘किंग खान’ शाहरुख खान यांची पत्नी गौरी खान ही बी-टाऊनमधील (बॉलिवूड) सर्वात श्रीमंत पत्नींपैकी एक आहे. गौरी खान अनेक बिझनेस चालवते, शिवाय तिचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊसही आहे, ज्यामधून ती भरघोस कमाई करते. गौरी खानची एकूण संपत्ती पाहिली तर बॉलीवूडमधील अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि आलिया भट्ट याही तिच्या तुलनेत मागे पडतात.
गौरी खानची एकूण संपत्ती
लाइफस्टाइल एशियाच्या अहवालानुसार, गौरी खानची एकूण संपत्ती सुमारे 1600 कोटी रुपये आहे. गौरी एक यशस्वी इंटिरियर डिझायनर आहे. तिने अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींचे घर डिझाइन केले आहे. यामध्ये अनन्या पांडेपासून मनीष मल्होत्रापर्यंत अनेकांचं नाव आहे. 2010 मध्ये तिने अधिकृतपणे डिझायनिंगमध्ये आपला करिअर सुरू केलं. सुरुवातीला ती तिची मैत्रीण सुजैन खानसोबत अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत होती. 2017 मध्ये गौरीने स्वतःचं स्टुडिओ सुरू केलं, ज्याचं नाव ‘Gauri Khan Studio’ असं ठेवलं. या स्टुडिओमधून ती मोठ्या प्रमाणात कमाई करते.
प्रोडक्शन हाऊसमधून मिळते कमाई
इंटिरियर डिझायनर स्टुडिओव्यतिरिक्त, गौरी खानने 2002 मध्ये 'रेड चिलीज एंटरटेनमेंट' हे प्रोडक्शन हाऊस सुरू केलं. या प्रोडक्शन हाऊसमधून गौरीने अनेक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली आहे. रिपोर्टनुसार, गौरी या प्रोडक्शन हाऊसमधून दरवर्षी सुमारे 500 कोटी रुपयांची कमाई करते. याशिवाय ती अनेक ब्रँड्सचं प्रमोशनही करते, आणि त्यासाठी ती मोठ्या प्रमाणात फी घेते.
दीपिका पदुकोणची एकूण संपत्ती
दीपिका पदुकोण ही बॉलीवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिची एकूण संपत्ती 500 कोटी रुपये आहे. यामध्ये तिची सर्वात मोठी कमाई चित्रपट आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून होते. ती चित्रपटांसाठी आणि जाहिरातींसाठी दोन्हींसाठी मोठी फी घेते. 2022 मध्ये तिने स्वतःचा ब्यूटी ब्रँड सुरू केला आहे, ज्यामुळे तिच्या संपत्तीत दरवर्षी वाढ होत आहे.
आलिया भट्टची एकूण संपत्ती
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलिया भट्टची संपत्ती दीपिका पदुकोणपेक्षाही जास्त आहे. ती सुमारे 550 कोटी रुपयांची मालकिण आहे. आलियाची कमाईदेखील मुख्यतः चित्रपट आणि ब्रँड एंडोर्समेंटमधूनच होते. तिने स्वतःचं प्रोडक्शन हाऊसही सुरू केलं असून त्यामार्फत ती अनेक चित्रपटांची निर्मिती करत आहे. याशिवाय तिचा स्वतःचा क्लोदिंग ब्रँडही आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
























