Big Boss Fame Actor Passed Away: ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्याचं आकस्मिक निधन; तिसऱ्या हृदयविकाराच्या झटक्याने घेतला जीव
Big Boss Fame Actor Passed Away: एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Bigg Boss Fame Actor Passed Away: देशात ‘बिग बॉस’ हा शो कितीही वादग्रस्त ठरला तरी त्याची लोकप्रियता मात्र कायम आहे. या कार्यक्रमातून अनेक कलाकारांना ओळख मिळाली, तर काहींच्या आयुष्यात मोठे बदल घडले. पण गेल्या काही वर्षांत या शोशी संबंधित अनेक कलाकार गंभीर आजारांमुळे जग सोडून गेले आहेत. सिद्धार्थ शुक्ला, सोनाली फोगाट, स्वामी ओम यांसारख्या अनेक जणांचे हृदयविकाराने निधन झाले, तर हिना खान आणि दीपिका कक्कर या अभिनेत्री सध्या कॅन्सरशी झुंज देत आहेत. आता या यादीत आणखी एक नाव दुर्दैवाने जोडले गेले आहे.
कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कॉमेडियन आणि ‘बिग बॉस कन्नड’चे माजी स्पर्धक राजू तालिकोटे (Raju Talikote) यांचे सोमवारी निधन झाले. ते केवळ 48 वर्षांचे होते. कर्नाटकच्या उडुपी जिल्ह्यात एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. तात्काळ त्यांना मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
शूटिंगदरम्यानच अचानक प्रकृती खालावली
मिळालेल्या माहितीनुसार, राजू तालिकोटे रविवारी संध्याकाळपर्यंत आपल्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत होते. काम आटोपल्यावर काही तासांतच त्यांना खांद्यामध्ये तीव्र वेदना जाणवू लागल्या आणि नंतर श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, हा त्यांचा तिसरा हृदयविकाराचा झटका होता आणि या वेळी मात्र त्यांनी जीव गमावला.
कॉमेडीच्या मंचावरून चित्रपटसृष्टीपर्यंतचा प्रवास
विजयपूरा येथे जन्मलेले राजू तालिकोटे यांनी करियरची सुरुवात स्टँड-अप कॉमेडीपासून केली होती. त्यांच्या जबरदस्त टाइमिंग आणि विनोदी शैलीमुळे ते प्रेक्षकांच्या मनात घर करून गेले. 2009 साली ‘मनसरे’ या चित्रपटातून त्यांनी मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं आणि नंतर ‘राजधानी’, ‘मैना’, ‘अलेमारी’, ‘टोपीवाला’ अशा लोकप्रिय चित्रपटांत अभिनय केला. ‘बिग बॉस कन्नड’च्या सातव्या सीझनमुळे त्यांची ओळख घराघरात पोहोचली. त्यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण साऊथ इंडस्ट्री आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. सहकलाकारांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत, “हास्य देणारा चेहरा आता कायमचा शांत झाला,” अशा भावनिक शब्दांत त्यांना निरोप दिला आहे.
Pankaj Dheer :अभिनेते पंकज धीर काळाच्या पडद्याआड
टेलिव्हिजन विश्वासवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बीआर चोप्रांच्या महाभारतातली कुंतीपुत्र कर्णाची भूमिका अजरामर करणारे अभिनेते पंकज धीर (Pankaj Dheer) काळाच्या पडद्याआड गेले आहेत. अभिनेते पंकज धीर यांच्या निधनाच्या बातमीला त्यांचे जवळचे मित्र अमित बहल यांनी दुजोरा दिला आहे. कर्करोगानं पंकज धीर यांचं निधन झालं असून त्यांच्या पश्च्यात त्यांचा एक मुलगा आणि सून आहे. मुलगा निकितिन धीर इंडस्ट्रीत काम करत असून त्याची पत्नी कृतिका सेंगरसुद्धा (Kratika Sengar) अभिनेत्री आहे.


















