एक्स्प्लोर

Bhushan Kadu : आयुष्यातला पडता काळ अन् इंडस्ट्रीतल्या कलाकाराचा मदतीचा हात, भूषण कडूने मानले 'या' अभिनेत्याचे आभार 

Bhushan Kadu :  अभिनेता भूषण कडू याने त्याच्या आयुष्यात पडत्या काळात मदत केलेल्या कलाकारांचे आभार मानले आहेत. तसेच त्याच्या पडत्या काळात धावून आलेल्या कलाकाराविषयी देखील कृतज्ञता व्यक्त केली आहे. 

Bhushan Kadu :  अभिनेता भूषण कडू (Bhushan Kadu) हा काही वर्षांपासून कॅमेऱ्यापासून पूर्णपणे लांब होता. कारण भूषण त्याच्या वैयक्तिक आयुष्यात अत्यंत कठिण काळातून जात होता. आर्थिक अडचणी, बायकोचं जाणं, मुलाची जबाबदारी अशा अनेक गोष्टींमुळे भूषण हा पूर्णपणे खचला होता. पण आता नव्याने उभं राहत, भूषण पुन्हा त्याचं कमबॅक करण्यासाठी सज्ज झालाय. लॉकडाऊनच्या काळात भूषणची पत्नी कादंबरी हिचं निधन झालं. त्यानंतर भूषणच्या आयुष्यात बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या. यावेळी त्याला काही कलाकारांनी मदतीचा हात दिला त्याचप्रमाणे अनेकांनी पाठही फिरवली. अभिनेते विजय पाटकर (Vijay Patkar) यांनी केलेल्या मदतीचा उल्लेखही भूषणने केला आहे. 

अभिनेता भूषण कडूने नुकतीच 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. यावेळी त्याने या सगळ्या कठिण प्रसंगांविषयी भाष्य केलं आहे. यावेळी त्याने अनेक कलाकारांची नावं घेत त्यांचे आभारही मानले आहेत, 22 व्यावसायिक नाटकं, 7 ते 8 सिनेमे करणारा हा विनोदवीर मागील काही वर्ष त्याच्या आयुष्यातला सगळ्यात कठिण काळ अनुभवत होता.बायको गेल्यानंतर स्वत:ला सावरणं, मुलाची जबाबदारी निभावणं अशा अनेक गोष्टींविषयी भूषण पहिल्यांदाच व्यक्त झालाय. 

विजय पाटकरांनी न सांगता एक रक्कम मला पाठवली - भूषण कडू

आयुष्यातल्या कठीण काळात मदत केलेल्यांविषयी कृतज्ञता यावेळी भूषणने व्यक्त केली आहे. त्याने म्हटलं की, 'अनिरुद्ध दुभाषी, सचिन बागवे अशी अनेक मंडळी पाठिशी उभी राहिलीत. माझ्या सासूबाई, माझा मेव्हणा अनेकांनी खूप खंबीर साथ दिली. आज सासूबाई आहेत, म्हणून मी माझ्या मुलाला त्यांच्याजवळ ठेवून बाहेर कामासाठी जाऊ शकतो. काही जणांनी खूप चांगली साथ दिली. पण काही जणांनी मात्र त्यांच्याकडे कुवत असूनही, शक्यता असूनही काहीच केलं नाही. तेव्हा जाणवलं की, तुमच्या चांगल्या काळात खूप माणसं तुमच्या सोबत असतात, पण वाईट काळात पटकन् माणसं साथ सोडून निघून जातात. पण काही हिंतचिंतक होते, काही ज्यांना आपलं हित झाल्यावर चिंता वाटते असेही होते. काही कलाकार मंडळींनी मला मदत केली. विजय पाटकरांनी तर न सांगता मला एक रक्कम पाठवली. त्यांना माहिती होतं, कारण प्रत्येक कलाकाराला प्रत्येकाचं दु:ख माहिती होतं. बरं ओळखीचे मित्रही होते, पण त्यांचीही हिच अडचण होती.' 

स्वत:ला संपवण्याचा निर्णय घेतला - भूषण कडू

पुढे भूषनने म्हटलं की, 'कोविडच्या काळात पूर्ण इंडस्ट्री बंद पडली होती. प्रत्येकाच्या आर्थिक अडचणी होत्या. माझंही तेच होतं. जेव्हा कादंबरी आजारी होती, तेव्हा रोज थोडा थोडा आर्थिक संचय वापरत होतो. पण एका वेळेनंतर तो देखील संपला. त्यानंतर आयुष्यात खरी ओढाताण सुरु झाली. खूप त्रासलो होतो, तेव्हा स्वत:ला संपवण्याचा निर्णय घेतला. कारण मुलाचं दु:ख पाहू शकत नव्हतो आणि त्याला काहीच देऊ शकत नव्हतो, याचं दु:ख होतं. मग एक दिवस ठरवलं की, हे सगळं संपवण्यासाठी स्वत:लाच संपवून टाकूया.'

ही बातमी वाचा : 

Bhushan Kadu :'आमची "कादंबरी" वाचायची अर्धीच राहिली', मुलाची जबाबदारी अन् आयुष्य संपवण्याचा निर्णय; भूषण कडू पहिल्यांदाच झाला व्यक्त

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Harsha Bhogle: 'पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची, आता भारत-पाकिस्तान सामन्यांना पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलं' हर्षा भोगलेंची सडकून टीका
'पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची, आता भारत-पाकिस्तान सामन्यांना पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलं' हर्षा भोगलेंची सडकून टीका
Ishan Kishan: इशान किशनची माॅडेल गर्लफ्रेंड अदिती आहे तरी कोण? आजोबा म्हणाले, नातवाची पसंती तीच आमची पसंती!
इशान किशनची माॅडेल गर्लफ्रेंड अदिती आहे तरी कोण? आजोबा म्हणाले, नातवाची पसंती तीच आमची पसंती!
पहिल्यांदा शरीराला लकवा अन् मग भयावह पद्धतीने मृत्यू! दक्षिण अमेरिकेतील डार्ट बेडकांच्या कातडीचा वापर; पुतीन यांनी कट्टर राजकीय विरोधकाला कसं संपवलं? पाच देशांनी थरकाप उडवणारी कहाणी सांगितली
पहिल्यांदा शरीराला लकवा अन् मग भयावह पद्धतीने मृत्यू! दक्षिण अमेरिकेतील डार्ट बेडकांच्या कातडीचा वापर; पुतीन यांनी कट्टर राजकीय विरोधकाला कसं संपवलं? पाच देशांनी थरकाप उडवणारी कहाणी सांगितली
Pune BJP Congress Rada: पुण्यात भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले; आंदोलन अन् दगडफेक, कार्यकर्ते रक्तबंबाळ, गाड्या फुटल्या, आता काँग्रेसही आक्रमक
पुण्यात भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले; आंदोलन अन् दगडफेक, कार्यकर्ते रक्तबंबाळ, गाड्या फुटल्या, आता काँग्रेसही आक्रमक

व्हिडीओ

Sharad Ponkshe on Muslim : प्लंबर असो वा सुतार, हिंदूच हवा, शरद पोंक्षेंचे वादळी विधान
Pune BJP Congress Protest Update : काँग्रेस-भाजप राड्यादरम्यान दगडफेक, महिला पोलीस जखमी
Akbaruddin Owaisi : हा देश कोणाच्या बापाचा नाही, अकबरुद्दीन ओवैसींचा मोदींवर निशाणा
Sanjay Raut PC : पाकिस्तान टिपू सुलतानाला हिरो मानतं तर त्यांच्यासोबत क्रिकेट कसं खेळू शकता
Raghuvir Khedkar Majha Katta: डीजे,लावण्यांचं आक्रमण तमाशाच्या मुळावर? रघुवीर खेडकरांचा 'माझा कट्टा'

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harsha Bhogle: 'पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची, आता भारत-पाकिस्तान सामन्यांना पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलं' हर्षा भोगलेंची सडकून टीका
'पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची, आता भारत-पाकिस्तान सामन्यांना पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलं' हर्षा भोगलेंची सडकून टीका
Ishan Kishan: इशान किशनची माॅडेल गर्लफ्रेंड अदिती आहे तरी कोण? आजोबा म्हणाले, नातवाची पसंती तीच आमची पसंती!
इशान किशनची माॅडेल गर्लफ्रेंड अदिती आहे तरी कोण? आजोबा म्हणाले, नातवाची पसंती तीच आमची पसंती!
पहिल्यांदा शरीराला लकवा अन् मग भयावह पद्धतीने मृत्यू! दक्षिण अमेरिकेतील डार्ट बेडकांच्या कातडीचा वापर; पुतीन यांनी कट्टर राजकीय विरोधकाला कसं संपवलं? पाच देशांनी थरकाप उडवणारी कहाणी सांगितली
पहिल्यांदा शरीराला लकवा अन् मग भयावह पद्धतीने मृत्यू! दक्षिण अमेरिकेतील डार्ट बेडकांच्या कातडीचा वापर; पुतीन यांनी कट्टर राजकीय विरोधकाला कसं संपवलं? पाच देशांनी थरकाप उडवणारी कहाणी सांगितली
Pune BJP Congress Rada: पुण्यात भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले; आंदोलन अन् दगडफेक, कार्यकर्ते रक्तबंबाळ, गाड्या फुटल्या, आता काँग्रेसही आक्रमक
पुण्यात भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले; आंदोलन अन् दगडफेक, कार्यकर्ते रक्तबंबाळ, गाड्या फुटल्या, आता काँग्रेसही आक्रमक
Ishan Kishan: संधी मिळताच इशान किशन मैदानात धुमाकूळ घालत असतानाच आता लग्नाची बातमी धडकली! त्या माॅडेलचं नाव समोर येताच आजोबा नातवाला म्हणाले...
संधी मिळताच इशान किशन मैदानात धुमाकूळ घालत असतानाच आता लग्नाची बातमी धडकली! त्या माॅडेलचं नाव समोर येताच आजोबा नातवाला म्हणाले...
Bangladesh Election Result 2026: इकडं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन भारतात अन् तिकडं तारिक रहमान यांच्या शपथविधीला पीएम मोदी बांगलादेशला जाणार की नाहीत?
इकडं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन भारतात अन् तिकडं तारिक रहमान यांच्या शपथविधीला पीएम मोदी बांगलादेशला जाणार की नाहीत?
Akola Crime: संतापजनक! रस्त्यावरून जाणाऱ्या मुली पाहून नजर फिरली, दुचाकीस्वाराने मागून येत केला छातीला स्पर्श अन्...CCTV समोर
संतापजनक! रस्त्यावरून जाणाऱ्या मुली पाहून नजर फिरली, दुचाकीस्वाराने मागून येत केला छातीला स्पर्श अन्...CCTV समोर
आयोजकांकडून 17 दिवसांच्या गेमसाठी 10 हजार मोफत कंडोमची विशेष सोय, पण तीन दिवसात अख्खा स्टाॅक संपला!
आयोजकांकडून 17 दिवसांच्या गेमसाठी 10 हजार मोफत कंडोमची विशेष सोय, पण तीन दिवसात अख्खा स्टाॅक संपला!
Embed widget