एक्स्प्लोर

कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली! प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर दुखा:चा डोंगर

Bengali Actress Shraboni Banik Dies: बंगाली टेलिव्हिजन अभिनेत्री श्रबोनी बोनिक यांचे निधन वयाच्या 41व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. फुफ्फुसांच्या कॅन्सरशी दीर्घकाळ झुंज अपयशी ठरली.

Bengali Actress Shraboni Banik Dies: बंगाली सिनेसृष्टीतून एक दुख:द बातमी समोर येत आहे. टेलिव्हिजन अभिनेत्री श्रबोनी बोनिक  यांचे सोमवारी सकाळी निधन झाले आहे.  त्यांनी वयाच्या 41व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.  गेल्या काही दिवसांपासून त्यांची फुफ्फुसांच्या कॅन्सरसह झुंज सुरू होती. ही झुंज अखेर संपली. त्यांचे कोलकाता येथे निधन झाले. श्रबोनी बोनिक यांच्या निधनाची माहिती दिग्दर्शक बाबू बनिक यांनी दिली. श्रबोनी बोनिक यांच्या मृत्यूनंतर बंगाली टेलिव्हिजनसृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.

फुफ्फुसांच्या आजाराने त्रस्त

श्रबोनी बोनिक या गेल्या काही महिन्यांपासून फुफ्फुसांच्या अ‍ॅडेनोकार्सिनोमा या  आजारातून त्रस्त होत्या.   गेल्या आठवड्यात त्यांची प्रकृती अधिक  बिघडत गेली. त्यांना या आजाराचा प्रचंड त्रास झाला होता.  त्रास वाढल्यानंतर त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र,उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

जवळच्या मित्राकडून शोक व्यक्त

श्रबोनीचे जवळचे मित्र बाबू बनिक यांनी अभिनेत्रीच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.  "काही ओळखी कामातून होतात. तर काही ओळखी  इंटरेस्ट, परिस्थिती किंवा आवडी निवडीच्या पलिकडे जाऊन होतात. जे दोन   कुटुंबांना  एका अदृश्य धाग्याने  बांधते.  तेव्हाच त्याला खरी मैत्री म्हणतात.   आज श्रबोनीला  गमावल्यानंतर प्रचंड दु:ख झाले. ती इतक्या लवकर आयुष्यातून निघून जाईल, वाटले नव्हते. यावर माझा विश्वास बसत नाही.  श्रबोनीचे कार्य लोकांच्या मनात कायमचे राहील. तिच्या आत्म्याच्या शांतीसाठी मी प्रार्थना करतो", असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं. 

आईच्या उपचारासाठी सोशल मीडियावर आर्थिक मदत

दरम्यान,  या वर्षीच्या सुरूवातीला श्रबोनी यांचा मुलगा अच्युत आदर्श याने त्याच्या आईच्या उपचारासाठी सोशल मीडियावर आर्थिक मदत मागितली होती. त्यानं पोस्ट शेअर करून आईच्या उपचारासाठी आर्थिक मदत मागितली होती. श्रबोनीने बंगाली टिव्ही आणि चित्रपटांमधील एक परिचित चेहरा म्हणून ओळखली जात होती.  त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.  श्रबोनी  चांदेर बारी (2007) भुटू  (2016) आणि सोहाग चांद (2022) मधील तिच्या अभिनयासाठी ओळखली जात होती. दरम्यान, अभिनेत्रीच्या  निधनानंतर सिनेसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

गौतमीचा 'सपनो का राजकुमार' कोण? मुलाकडून तिच्या अपेक्षा काय? म्हणाली, 'असा मुलगा हवाय जो...

'अहो तात्या जरा कंट्रोलमध्ये, तुमच्या मुलीच्या..' लाईव्ह शोमध्ये अभिनेत्री भडकली, नेमकं घडलं काय? VIDEO व्हायरल

महत्त्वाच्या बातम्या

Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
ZEE5 Marathi: मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
Anurag Kashyap Shubhra Shetty: एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
Hrithik Roshans Dating App: हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
Embed widget