Badshah And Dua Lipa Controversy: 'दुआ लिपासोबत मूलं जन्माला घालायचीत...', बादशाहाचं स्वतःच्याच वक्तव्यावर स्पष्टीकरण, म्हणतोय, 'तारीफ करत होतो...'
Badshah And Dua Lipa Controversy: बादशाहानं ट्विटरवर दुआ लिपाबद्दल एक वक्तव्य केलं आणि काही काळातच तो जोरदार ट्रोल झाला. आता अनेकजण गायक-रॅपरच्या या वक्तव्याचा निषेध करत आहेत.

Badshah And Dua Lipa Controversy: बॉलिवूडचा दिग्गज रॅपर बादशाह (Bollywood's Legendary Rapper Badshah) सध्या सोशल मीडियावर (Social Media) भलताच चर्चेत आहे. पण, यावेळी तो चर्चेत येण्याचं कारण त्याचं कोणतंही गाणं किंवा कोणताही म्युझिक व्हिडीओ (Music Video) नाही, भलतंच काहीतरी आहे. अलिकडेच बादशाहाची एक पोस्ट व्हायरल झाली. बादशाहानं गायिका दुआ लिपावर (Dua Lipa) एक खास कमेंट केली होती. बादशाहाच्या कमेंट नेटकऱ्यांच्या नजरेत भरली आणि त्याच्यावर टीकेची झोड उठली. बादशाहची दुआ लिपावरची कमेंट व्हायरल होताच, त्याच्यावर टीकेची झोड उठली. त्याची कमेंट व्हायरल होताच जोरदार ट्रोलिंग सुरू झालं. याबाबत बादशाहानं आता समोर येत स्पष्टीकरण दिलं आहे.
बादशाहानं काय केलेली कमेंट?
गायक आणि रॅपर बादशाहानं ट्विटरवरच्या एका पोस्टवर केलेल्या कमेंटमध्ये लिहिलेलं की, त्याला दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायची आहेत. ही कमेंट समोर येताच, बादशाहावर नेटकऱ्यांकडून टीकेची झोड उठवली गेली.
6 जून रोजी बादशाहानं दुआ लिपाचं नाव लिहून एक पोस्ट केली, ज्यामध्ये रेड हार्टचं इमोजी पोस्ट केलं होतं. एका युजरनं प्रश्न उपस्थित केलेला की, बादशाहा दुआ लिपासोबत कोलॅबोरेशन करणार आहेस? याचं उत्तर देताना बादशाहानं एक कमेंट केली, जी चर्चेचा विषय ठरली. बादशाहानं म्हटलेलं की, 'I'd rather make babies with her bro' (मला तिच्यासोबत मूलं जन्माल घालायचीत...).
Dua lipa ❤️
— BADSHAH (@Its_Badshah) June 5, 2025
ट्रोल झाल्यानंतर बादशाह काय म्हणाला?
दुआ लिपाबाबत केलेली कमेंट व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद सुरू झाला. बादशाहानं आपल्या बचावात म्हटलं की, त्यानं फक्त आणि फक्त दुआ लिपाची तारीफ केली होती. त्याचं म्हणणं होतं की, एका महिलेसाठी सर्वात सुंदर कौतुकाचे शब्द हेच असतील. बादशाहानं पुढच्या पोस्टमध्ये लिहिलं की, "माझ्या मते एखाद्या स्त्रीला सर्वात सुंदर कौतुकाची थाप हीच असू शकते की, "तुम्हाला तिला तुमच्या मुलांची आई बनवायचं आहे. माझ्या या वक्तव्यानंतर माझे विचार नाहीतर, तुमचे विचार समोर येतात."
दरम्यान, गेल्या बऱ्याच काळापासून बादशाहा आपल्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आहे. तसेच, पर्सनल लाईफबाबत बोलायचं झालं तर, बादशाह आणि तारा सुतारियाच्या डेटिंगच्या चर्चांनी जोर धरला आहे. मीडिया रिपोर्ट्सनी केलेल्या दाव्यानुसार, दोघेही एकमेकांना डेट करत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























