Gautami Patil Entry In Zee Marathi Serial Devmanus: 'देवमाणूस- मधला अध्याय'मध्ये गौतमी पाटीलची एन्ट्री; अजित कुमारची पुढची शिकार ठरली? प्रोमो पाहिलात?
Gautami Patil Entry In Zee Marathi Serial Devmanus: 'देवमाणूस- मधला अध्याय'मध्ये गौतमी पाटील झळकणार असल्याचा झी मराठीचा प्रोमो व्हायरल झाला आणि चाहत्यांमधला उत्साह शिगेला पोहोचला.

Gautami Patil Entry In Zee Marathi Serial Devmanus: झी मराठीवर (Zee Marathi) बहुचर्चित 'देवमाणूस- मधला अध्याय' (Devmanus Madhla Adhyay) मालिका सुरू झाली आणि चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली. किरण गायकवाडची (Kiran Gaikwad) 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका 2 जूनपासून सुरू झाली. बऱ्याच दिवसांपासून या मालिकेच्या समोर आलेल्या प्रोमोंनी प्रेक्षकांची उत्सुकचा शिगेला पोहोचवली होती. तसेच, मालिकेनं टीआरपीच्या (Zee Marathi TRP) यादीतही सर्वोच्च स्थान पटकावलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, या यादीत आता प्रसिद्ध नृत्यांगणा आणि आपल्या अदांनी अनेकांना घायाळ करणाऱ्या गौतमी पाटीलची (Gautami Patil) लवकरच एन्ट्री होणार आहे. झी मराठीच्या ऑफिशिअल पेजवरुन यासंदर्भातला प्रोमो शेअर करण्यात आला आहे.
'देवमाणूस- मधला अध्याय'मध्ये गौतमी पाटील झळकणार असल्याचा झी मराठीचा प्रोमो व्हायरल झाला आणि चाहत्यांमधला उत्साह शिगेला पोहोचला. मालिकेतील गौतमीच्या एन्ट्रीची सर्वांना उत्सुकता लागली आहे. नेहमीच आपल्या दिलखेचक अदा आणि लटक्या-झटक्यांनी अवघ्या महाराष्ट्रातील तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेली गौतमी पाटील आता यानिमित्तानं छोट्या पडद्यावर डेब्यू करणार आहे. काही तासांपूर्वीच गौतमी पाटीलच्या एन्ट्रीचा टीझर झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोवर प्रेक्षकांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.
गोपाळ आणि गौतमी या जोडीत नक्की कोण कोणाला घायाळ करणार, असा सवाल प्रोमोमध्ये विचारण्यात आला आहे. वाहिनीकडून प्रोमो शेअर करताना असे कॅप्शन दिले आहे की, ''सबसे कातिल' गौतमी पाटील अजित कुमारची करणार का शिकार?' सोशल मीडियावर या व्हिडिओवर असंख्य कमेंट आल्या आहेत.
View this post on Instagram
यापूर्वी प्रमोशनसाठी सई ताम्हणकर, अलका कुबल यांची एन्ट्री
यापूर्वी 'देवमाणूस- मधला अध्याय' सुरू होण्यापूर्वी प्रमोशनसाठी अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेत्री अलका कुबल यांनी एन्ट्री केली होती. आता आगामी भागामध्ये गौतमीची एन्ट्री होणार आहे. गौतमी देवमाणूस गोपाळ टेलरकडे ब्लाऊज शिवायला येत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. झी मराठी वाहिनीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरुन गौतमीच्या एन्ट्रीचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. हा प्रोमो तुफान व्हायरल होत आहे.
काहींना पटलं, काहींना खटकलं; गौतमी प्रोमोमध्ये झळकल्यावर कोण-कोण काय-काय म्हणालं?
आपल्या अदाकारीनं संपूर्ण महाराष्ट्राला ठेका धरायला भाग पाडणारी गौतमी आता लवकरच झी मराठीच्या 'देवमाणूस- मधला अध्याय'मध्ये झळकणार आहे. याबाबत चाहत्यांकडून वेगवेगळ्या कमेंट केल्या जात आहेत. काहींनी गौतमीचं अभिनंदन केलं आहे. तर, काहींनी वाहिनी आणि निर्मात्यांना फैलावर घेतलं आहे.
एका युजरनं लिहिलंय की, "टीआरपीसाठी कितीही प्रसिद्ध चेहरे आणा, पण पहिला भाग ब्लॉकबस्टर होता. शेवट दाखवला, तिथेच दुसरा भाग फ्लॉप होता आणि तसंच झालं. मग हे मधला अध्याय कोणाला सूचलं, त्यापेक्षा नवीन मालिका आणायला हवी होती." आणखी एका युजरनं लिहिलंय की, "सीरियल चालावी म्हणून अजून कोणत्या थराला जातील, देवजाणे". तर एका युजरचं म्हणणं आहे की, "मालिकेसाठी छपरीपणा सुरू आहे." काहींनी "गौतमीला का घेतलं?", असं विचारलं आहे.
दरम्यान, 'सबसे कातिल गौतमी पाटील' म्हणून प्रसिद्ध असलेली नृत्यांदणा गौतमी पाटीलनं यापूर्वीच फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केला आहे. गौतमीने यापूर्वी अल्बम साँग, 'घुंगरू' चित्रपट आणि रिॲलिटी शोमध्ये काम केलं आहे. पण, एखाद्या मालिकेत काम करण्याची गौतमीची ही पहिलीच वेळ आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























