VIDEO : अशोक सराफ आणि वर्षा उसगांवकर पुन्हा एकत्र येणार, कलर्स मराठीने शेअर केला खास व्हिडीओ
Ashok Saraf and Varsha Usgaonkar : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि वर्षा उसगांवकर पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळणार आहेत.

Ashok Saraf and Varsha Usgaonkar : मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) आणि अभिनेत्री वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) ही प्रेक्षकांची आवडती जोडी म्हणून ओळखली जाते. ऐकाव ते नवलच, शेजारी शेजारी, सगळीकडे बोंबाबोंब, शुभ मंगल सावधान, अफलातून, तुझ्या वाचून करमेना, घनचक्कर, गम्मत जम्मत यासांरख्या अनेक चित्रपटांमध्ये वर्षा उसगावंकर (Varsha Usgaonkar) आणि अशोक सराफ (Ashok Saraf) एकत्र पाहायला मिळाले होते. दोघांचे अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर हिट ठरले होते. दोघांना प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसाद मिळायचा. दरम्यान ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळणार आहे. अशोक सराफ आणि वर्षा उसगावंकर कलर्स मराठीवरील एका मालिकेत एकत्र पाहायला मिळणार आहेत.
अशोक सराफ आणि वर्षा उसगांवकर यांना पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळणार
कलर्स मराठीने अशोक सराफ आणि वर्षा उसगावंकर यांचा मालिकेतील एक शॉर्ट व्हिडीओ शेअर केलाय. " मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट जोडी अशोक सराफ आणि वर्षा उसगांवकर पहिल्यांदाच स्मॉल स्क्रीनवर एकत्र येणार, तेही आपल्या आवडत्या कलर्स मराठीवर! 😍पहा, 'कलर्स मराठीची मंगळागौर', ‘अशोक मा. मा.’ रविवार 3 ऑगस्ट, संध्या. 7 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर.", असं कॅप्शन हा व्हिडीओ शेअर करताना देण्यात आलंय.
View this post on Instagram
कलर्स मराठीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अशोक सराफ आणि वर्षा उसगावंकर यांच्यामधील प्रेमळ वाद दाखवण्यात आलाय. संस्कृती आणि परंपरेचा घडणार सुंदर मेळ, वर्षाताई उसगांवकर आणि कलर्स मराठीच्या महानायिकांसोबत रंगणार मंगळागौरीचा महाखेळ... पहा, 'कलर्स मराठीची मंगळागौर', ‘अशोक मा. मा.’ मालिकेच्या विशेष भागात, रविवार 3 ऑगस्ट, संध्या. 7 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर.
View this post on Instagram
इतर महत्त्वाच्या बातम्या
1.5 कोटीचं बजेट अन् सिनेमाने कमावले होते 19 कोटी, शूटिंगवेळी दिग्दर्शक पालखीत बसून यायचा
























