1.5 कोटीचं बजेट अन् सिनेमाने कमावले होते 19 कोटी, शूटिंगवेळी दिग्दर्शक पालखीत बसून यायचा
ram teri ganga maili : हिंदी चित्रपटसृष्टीत आतापर्यंत अनेक हिट सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले. मात्र, काही चित्रपट असे आहेत जे प्रेक्षकांना नेहमीच पाहायला आवडतात.

ram teri ganga maili : हिंदी सिनेमात आजवर अनेक अजरामर चित्रपट आले आहेत. काही चित्रपट असे आहेत की, जे प्रेक्षक नेहमी पाहायला आवडतात. आज आपण अशाच एका बॉलिवूड चित्रपटाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याला 40 वर्षे पूर्ण झाली आहेत, पण आजही या चित्रपटाचं वेड प्रेक्षकांमध्ये कमी झालेलं नाही. या चित्रपटाचं नाव आहे "राम तेरी गंगा मैली". या चित्रपटाला 25 जुलै रोजी 40 वर्षे पूर्ण झाली आहेत. 1985 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं होतं. राज कपूर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाचं त्या काळात बजेट 1.44 कोटी रुपये इतकं होतं, आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 19 कोटी रुपयांची कमाई केली होती. हा चित्रपट कथा, गाणी आणि सामाजिक संदेशासाठी आजही पाहिला जातो.
पालखीत बसून का यायचे दिग्दर्शक? रझा मुराद यांचा खुलासा
अलीकडेच या चित्रपटातील अभिनेता रझा मुराद यांनी NDTV सोबत संवाद साधताना शूटिंगचे काही मजेदार किस्से सांगितले. त्यांनी सांगितले की, "राम तेरी गंगा मैली" या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दिग्दर्शक राज कपूर सेटवर पालखीत बसून यायचे. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण त्या काळात राज कपूर यांची तब्येत खालावलेली होती, त्यामुळे त्यांना जास्त चालायला जमत नसे. त्यामुळेच "राम तेरी गंगा मैली" च्या सेटवर राज कपूर पालखीतून यायचे.
मंदिकिनीचा सर्वात हिट सिनेमा
या चित्रपटात मंदाकिनी आणि राजीव कपूर मुख्य भूमिकांमध्ये होते. चित्रपटाची कथा गंगा नदीच्या पावित्र्याभोवती आणि एका महिलेच्या जीवनप्रवासाभोवती फिरते. या चित्रपटातील "सुन साहिबा सुन" आणि "एक राधा एक मीरा" यांसारखी गाणी आजही लोकांच्या ओठांवर आहेत. या चित्रपटाने केवळ कमाईच्या बाबतीतच नव्हे, तर सामाजिक मुद्द्यांना देखील अधोरेखित केलं. रझा मुराद यांनी या प्रसंगी या चित्रपटाशी जोडलेल्या आठवणींना उजाळा देत सांगितले की, हा चित्रपट त्याच्या कारकिर्दीतील एक सर्वात संस्मरणीय चित्रपट आहे. 40 वर्षांनंतरही हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात तितकाच जिवंत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या





















