Lata Mangeshkar Award : लतादीदींची आठवण सांगताना आशा भोसले झाल्या भावूक
Lata Mangeshkar Award : गानसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर यांच्या नावाने पहिला 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पार पडला आहे.
Lata Mangeshkar Award : गानसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर यांच्या नावाने पहिला 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' (Lata Mangeshkar Award) मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पार पडला. यावेळी आशाताई भोसले या लतादीदींच्या आठवणींत भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. या पुरस्काराच्या दरम्यान मंचावर त्यांनी लतादीदींच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.
लतादीदींच्या आठवणीत रमताना आशाताई म्हणाल्या, "लता दीदींना काळा रंग, गुलाबी रंग खूप आवडायचा. परंतु, आपल्या इमेजला सांभाळण्याकरता त्यांनी पांढरा रंग निवडला. आणि तो कधीच सोडला नाही. तिने कधीच सलवार सूट किंवा पॅन्ट घातली नाही. नेहमीच ती साडीत दिसायची."
"1940 च्या दरम्यान चित्रपटांत रेकॉर्डवर गायकांचे नाव नाही यायचे. तेव्हा मी तिला विचारलं की, तुझं नाव का नाही? तेव्हा तिने माझ्याकडे पाहून म्हटलं, वेळ आल्यावर प्रत्येक गोष्ट सांगावी. आणि ती वेळ आली. वयाच्या सोळाव्या वर्षी "आयेगा...आयेगा आनेवाला" हे गाणं जेव्हा हिट झालं त्यानंतर लतादीदींनी प्रोड्युसरला माझं नाव रेकॉर्डवर आलं पाहिजे असं सांगितलं. आणि त्यानंतर स्क्रीनवर म्युझिक डायरेक्टर आधी गायकाचं नाव दिसू लागलं."
तसेच, लतादीदी आणि त्यांचे वडील आशाताईंना 'हब' या नावाने बोलवायचे. असे अनेक किस्से आशाताईंनी लतादीदींबद्दल सांगितले.
मुंबईतील षण्मुखानंद हॉल येथे हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले. यावेळी लतादीदींच्या आठवणीत पंतप्रधानही भावूक झालेले पाहायला मिळाले.
महत्वाच्या बातम्या :
- पहिल्यांदाच असं होईल रक्षाबंधनाला दीदी नसणार, पुरस्कार स्वीकारल्यानंतर मोदी झाले भावूक
- Lata Mangeshkar Award : पहिला 'लता दीनानाथ मंगेशकर' पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर
- Devendra Fadnavis : पहिला 'लता दीनानाथ मंगेशकर' पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल फडणवीसांनी केले पंतप्रधान मोदींचे अभिनंदन
- Lata Mangeshkar : दीनानाथ नाट्यगृहात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या फोटोचं अनावरण, आशा भोसलेंना अश्रू अनावर