Arjun Kapoor : अर्जुन कपूरनं घेतली नवी बाईक; किंमत माहितीये?
Arjun Kapoor : अर्जुननं त्याच्या नव्या बाईकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला
Arjun Kapoor : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अर्जुन कपूरच्या (Arjun Kapoor) चित्रपटांना त्याच्या चाहत्यांची पसंती मिळते. अर्जुन सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असतो. वेगवेगळ्या पोस्ट अर्जुन सोशल मीडियावर शेअर करतो. त्याला वेगवेगळ्या बाईक्सचं कलेक्शन करायला देखील आवडतं. नुकताच अर्जुननं त्याच्या नव्या बाईकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या बाईकचं नाव Ducati Scrambler 1100 असं आहे.
अर्जुननं नव्या बाईकचा फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, 'हा माझा नवा मित्र. मी वीकेंडला या मित्राला भेटायला येतो. ' अर्जुनच्या या नव्या बाईकची किंमत आणि खास गोष्टी जाणून घेऊयात-
अर्जुननं घेतलेल्या Ducati Scrambler 1100 या बाईकची किंमत तेरा लाख रूपये आहे. या बाईकमध्ये 1079 सीसी, एयर-कूल्ड, ट्विन-सिलेंडर इंजन आहे. हे इंजन 84.48 बीएचपी मॅक्सिमम पावर आणि 88 एनएम पीक टार्क जनरेट करू शकते. बाईकमध्ये 6-स्पीड गियरबॉक्स देखील असते.
View this post on Instagram
अर्जुननं 'इश्कजादे' या चित्रपटामधून अर्जुननं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. लवकरच त्याचा एक व्हिलन रिटर्न्स हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अर्जुनच्या गुंडे,तेवर आणि हाल्फ गर्लफ्रेंड या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
महत्वाच्या बातम्या :
Parineeti Chopra, Arjun Kapoor : 'तुझा आवाज...', अर्जुननं केलं ट्रोल, परिणीतीनं दिली रिअॅक्शन
Arjun Kapoor : ' ती मला पाहतेय'; अर्जुनला येते आईची आठवण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha