Kuttey first look : दमदार डायलॉग्स आणि जबरदस्त स्टारकास्टसह 'Kuttey' सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज; 'या' दिवशी होणार प्रदर्शित
Kuttey first look : अर्जुन कपूरच्या आगामी 'कुत्ते' या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. ज्यामध्ये तो एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसतोय.
![Kuttey first look : दमदार डायलॉग्स आणि जबरदस्त स्टारकास्टसह 'Kuttey' सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज; 'या' दिवशी होणार प्रदर्शित arjun kapoor naseeruddin shah tabu starrer kuttey movie first look out marathi news Kuttey first look : दमदार डायलॉग्स आणि जबरदस्त स्टारकास्टसह 'Kuttey' सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज; 'या' दिवशी होणार प्रदर्शित](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/17/6fcd8e2b43290ec9cac8b6dfa11c33461671260239631358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kuttey Movie First Look : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि तब्बू (Tabu) यांच्या आगामी 'कुट्टे' (Kuttey Movie First Look) या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर करण्यात आला आहे. यामध्ये अर्जुन कपूर पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. अर्जुन कपूरने सोशल मीडियावर एक छोटी क्लिप शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याच्याबरोबर तब्बू, नसीरुद्दीन शाह, राधिका मदन, शार्दुल भारद्वाज, कोंकणा सेन शर्मा यांचा लूक पाहायला मिळतोय.
पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत अर्जून कपूर
व्हिडीओ शेअर करताना अर्जुन कपूरने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'एक हड्डी और सात कुत्ते'. या क्लिपमध्ये अर्जुन कपूरचा आवाज ऐकू येतोय. अर्जुन म्हणतोय, 'गोलियों सर पर मार दे, मॅटर खत्म'. यावेळी तो पोलिसांच्या वेशात दिसतोय. त्याच्या हातात बंदूक आहे. यानंतर तब्बूचे डायलॉग्स ऐकायला मिळतायत. तब्बू म्हणते, 'शेर भुका है तो क्या जहर खा लेगा'.
View this post on Instagram
कलाकारांच्या संवादाने वाढवली उत्सुकता
शेअर करण्यात आलेल्या या क्लिपमध्ये नसीरुद्दीन शहांचा दमदार लूक दिसतोय. ते म्हणतात की, 'मुह मांगा दम दुंगा उससे उडाने का'. या सिनेमात कोंकणा सेन शर्मादेखील पाहायला मिळतेय. कोंकणा म्हणतेय, 'बकरी हम, कुत्ता तू और शेर तेरा मालिक'.
या दिवशी 'कुत्ते' प्रदर्शित होणार
लव फिल्म्स आणि विशाल भारद्वाज फिल्म्सच्या बॅनरखाली लव रंजन, विशाल भारद्वाज, अंकुर गर्ग, रेखा भारद्वाज यांनी 'कुत्ते' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. याचे संगीत विशाल भारद्वाज यांनी दिले असून गीत गुलजार यांनी लिहिली आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी 13 जानेवारी 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याआधी अर्जुन कपूर 'एक व्हिलन रिटर्न्स' या चित्रपटात दिसला होता, ज्यामध्ये त्याने जॉन अब्राहम, तारा सुतारिया आणि दिशा पटनीबरोबर स्क्रीन शेअर केली होती.
महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)