प्रसिद्ध TV अभिनेत्याच्या सासऱ्याची तब्येत बिघडली; तातडीने ICUमध्ये दाखल, प्रकृती गंभीर
Arjun Bijlani Cancels Dubai Vacation After Family Health Emergency: अर्जून बिजलानी याच्या सासऱ्याची अचानक तब्येत बिघडली. गंभीर प्रकृतीमुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Arjun Bijlani Cancels Dubai Vacation: प्रसिद्ध टीव्ही अभिनेता अर्जून बिजलानी सध्या कौटुंबिक कारणांमुळे चिंतेत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्जूनच्या सासऱ्यांची तब्येत बिघडली आहे. त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने रूग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अर्जून आणि त्याची पत्नी नेहा बिजलानी दुबईच्या सहलीला गेले होते. नव वर्षाचं स्वागत करण्यासाठी दोघेही कपल दुबईला गेले होते. मात्र, नेहा बिजलानी हिच्या वडिलांची अचानक तब्येत बिघडली. याची माहिती कळताच ही सहल अर्ध्यावरच सोडून बिजलानी कुटुंब मुंबईला परतले.
अर्जूनच्या सासऱ्याची अचानक तब्येत बिघडली
मिळालेल्या माहितीनुसार, अर्जून बिजलानी पत्नी नेहा आणि मुलासह ख्रिसमस आणि नव वर्षनिमित्त दुबईला गेले होते. बिजलानी दुबईमध्ये एन्जॉय करत होते. तिथेच त्यांनी न्यू इअर साजरे करण्याचा प्लान आखला होता. मात्र, नेहा बिजलानी हिच्या वडिलांची तब्येत बिघडली. अर्जून आणि नेहा यांना याची माहिती देण्यात आली. अर्जून आणि नेहा तातडीने मुंबईला परतले. अर्जूनला त्याचे सासरे आजारी असल्याची बातमी मिळताच त्यांनी दुबईची सहल अर्धवट सोडली. तसेच अर्जून बिजलानी आपली पत्नी आणि मुलासह मुंबईला परतले.
अभिनेत्याकडून अधिकृत विधान जारी नाही
दरम्यान, या प्रकरणाबाबत अभिनेत्याकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही. टेली चक्करमधील रिपोर्ट्सनुसार, अर्जूनची पत्नी नेहाचे वडील सध्या आयसीयूमध्ये दाखल आहेत. अर्जून आणि नेहा दुबईमध्ये होते. दोघेही तिथे व्हॅकेशन एन्जॉय करत होते. परंतु, अर्जूनला त्याच्या सासऱ्याच्या प्रकृतीबाबत माहिती मिळताच त्याने आपल्या परिवारासोबत थेट मुंबई गाठली.
अर्जून बिजलानीचे सासऱ्यसोबत घट्ट नाते
अर्जून बिजलानीचे त्याच्या सासऱ्यांशी घट्ट नाते आहे. अर्जून फक्त 19 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. अर्जूनने आपल्या आयुष्यात बरेच चढ उतार अनुभवले. दरम्यान, नेहाचे वडील त्याच्यासाठी वडिलांसारखे आहेत. ही बातमी समोर येताच चाहते अर्जून बिजलानीच्या सासऱ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करीत आहेत. लवकर बरे होण्यासाठी त्यांच्यासाठी प्रार्थना करीत आहेत.
























