Anushka Sharma | गरोदरपणातही अनुष्काला आवरेना 'पिझ्झा'प्रेम
बाळाच्या जन्माआधीचे काही क्षण अनुष्का आणि विराट अतिशय आनंदात आणि मनमुरादपणे जगत आहेत. त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट पाहून हेच लक्षात येत आहे.
Anushka sharma म्हणजे सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक नाव. बॉलिवूड विश्वात नावारुपास आल्यानंतर अनुष्का शर्मानं खासगी जीवनाला प्राधान्य दिलं. आता अवघ्या काही दिवसांतच ती आणि पती विराट कोहली त्यांच्या सहजीवनाच्या नात्यात एका नव्या पाहुण्याचं स्वागत करणार आहेत.
बाळाच्या जन्माआधीचे काही क्षण अनुष्का आणि विराट अतिशय आनंदात आणि मनमुरादपणे जगत आहेत. त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट पाहून हेच लक्षात येत आहे. कधी अनुष्का शीर्षासन करतानाचे फोटो पोस्ट करते, तर कधी व्यायाम करतानाचे. गरोदरपणातही फॅशन गोल्स देणारी ही अभिनेत्री तिच्या खाण्यापिण्याच्या आवडीही जपताना दिसत आहे.
एका इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून हीच बाब स्पष्ट होत आहे. जिथं अनुष्कानं पिझ्झा खातानाचा फोटो पोस्ट केला आहे. तिच्याकडे असणाऱ्या एका प्लेटमध्ये आणि आजूबाजूलाही पिझ्झा दिसत आहे. आता पिझ्झा हा पदार्थच मुळात असा आहे, जो खाण्यावाचून कोणीच स्वत:ला रोखू शकत नाही. अगदी अनुष्काही याला अपवाद नाही.
तिनं या पिझ्झा ट्रीटचा फोटो पोस्ट करत त्यावर लिहिलं आहे, 'गो बिग ऑर गो होम...'. गरोदरपणात अनुष्कानं लिहिलेल्या या कॅप्शनचा, तिच्या खाण्यापिण्याच्या आवडींचा चांगलाच संदर्भ इथं लागत आहे.
Anushka Sharma | "...तरीही आमच्या प्रायव्हसीमध्ये डोकावलंच" ; फोटोग्राफरवर अनुष्का शर्मा संतापली
दरम्यान, बी- टाऊनची ही सेलिब्रिटी जोडी गुरुवारी मुंबईतील एका क्लिनिकबाहेर दिसली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघातून सुट्टी घेत (virat kohli) विराट कोहलीनं बाळाच्या जन्मापूर्वीच मायदेशी परतण्याचा पर्याय निवडला. सध्या तो सर्वतोपरी अनुष्काची काळजी घेताना दिसत आहे. अनुष्कानं गरोदरपणाची बातमी जाहीर करतेवेळी जानेवारी 2021 मध्ये बाळाला जन्म देणार असल्याचा उल्लेख केला होता. त्यामुळं आता पती विराटसह तिलं क्लिनिकबाहेर दिसणं अनेक चर्चांना वाव देऊन गेलं. पण, सध्यातही नियमित तपासणी अर्थात नॉर्मल रुटीन चेकअपसाठीच ती क्लिनिकमध्ये गेल्याचं म्हटलं जात आहे.