Anushka Sharma Birthday Picture : विराटनं बायकोला दिलं बर्थडे स्पेशल सरप्राईज, प्रेग्नंसीनंतरच्या अनुष्काच्या फोटोनी वेधलं साऱ्यांचं लक्ष
Anushka Sharma Birthday Picture : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या दोघांनी काही महिन्यांपूर्वी दुसऱ्या बाळाला जन्म दिला. तिच्या प्रेग्नंसीनंतर अनुष्काने तिचा वाढदिवस साजरा केला आहे.
Anushka Sharma Birthday Picture : अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) हे सेलिब्रिटी कपलपैकी एक आहे. या दोघांनी 2017 मध्ये लग्नगाठ बांधली. त्यानंतर 2021 त्यांनी त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म दिला. विराट आणि अनुष्काने मुलीला जन्म दिला असून त्यांनी तिचं नाव वामिका असं ठेवलं आहे. त्यानंतर आता काही महिन्यांनी त्यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाचेही स्वागत केले. दुसऱ्या मुलाचे नाव अकाय आहे. पण अनुष्काने दुसऱ्या मुलाला जन्म दिल्यापासून ती लाईमलाईटपासून लांबच गेली होती. आता वाढदिवसाच्या निमित्ताने तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.
अनुष्का शर्मा 1 मे 2024 रोजी 36 वर्षांची झाली. अभिनेत्रीच्या 36 व्या वाढदिवसाच्या पार्टीचे फोटो समोर आले, ज्यात ती सर्वांसोबत एन्जॉय करताना दिसली. विराटने तिच्या बर्थडेसाठी स्पेशल सरप्राईजचं आयोजन केलं होतं. नुकतच अनुष्काच्या वाढदिवसाचे अनेक फोटो समोर आले आहेत. विराट कोहलीच्या एका फॅन पेजने नुकतेच अनुष्काच्या 36व्या वाढदिवसाचे काही फोटो शेअर केले आहेत. अनुष्काने तिचा हा वाढदिवस भारतातच साजरा केला. बंगळूरमध्ये तिने हा वाढिदिवस साजरा केला.
अनुष्काचा बर्थडे लूक
अनुष्काने तिच्या बर्थडेसाठी अगदी साधा लूक केला होता. फोटोमध्ये, अभिनेत्री जांभळ्या रंगाच्या सॅटन शर्टमध्ये पाहायला मिळाली. अनेक खेळाडू मंडळी देखील अनुष्काच्या या बर्थडेसाठी हजर असल्याचं पाहायला मिळालं. फाफ डू प्लेसिसने हे फोटो त्याच्या सोशल मीडियावरुन शेअर केले होते. यामध्ये मॅक्सवेल देखील दिसला होता.
विरुष्काची दोन अपत्य, दोन नावाचा अर्थ काय?
'अकाय'चा अर्थ काय? (Akaay Meaning)
विरुष्काने 'अकाय' हे नाव खूप विचार करुन ठेवलं आहे. हिंदी शब्दकोशानुसार, 'अकाय' म्हणजे 'निराकार'. कोणताही आकार, रूप नसलेल्याला निराकार म्हणटलं जातं. 'अकाय'चा एक अर्थ चंद्राचा प्रकाश असाही होतो. एकंदरीतच विरुष्काचं आयुष्य प्रकाशमय करणारा 'अकाय' आहे.
वामिकाचा अर्थ काय? (Vamika Meaning)
विराट-अनुष्काने आपल्या पहिल्या लेकीचं नाव 'वामिका' असं ठेवलं आहे. वामिका हे नाव विराट आणि अनुष्का या दोन नावांचे एकत्रिकरण आहे. तसेच या नावाचा खास अर्थदेखील आहे. 'वामिका' या नावाचा संस्कृतमध्ये अर्थ होतो 'देवी दुर्गा'.
लग्नानंतर निर्मितीमध्ये ठेवले पाऊल...
लग्नानंतर अनुष्काने चित्रपटांमध्ये काम करणे कमी केले होते. वैयक्तिक आयुष्यावर तिने लक्ष केंद्रीत केले होते. त्याच दरम्यान तिने बुलबुल आणि पाताल लोक सारख्या प्रोजेक्टची निर्मिती केली. वामिकाच्या जन्मानंतर अनुष्का रुपेरी पडद्यापासून काहीशी दूर झाल्याचे चित्र होते.