'शरीरात फक्त 5 टक्के रक्त, बाकी सगळं त्यांनी काढलं...'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या पत्नीचा धक्कादायक अनुभव
Anshuman Vichare Wife Shared Shocking Experience: प्रसिद्ध मराठी अभिनेता अंशुमन विचारेच्या पत्नीसोबत एक धक्कादायक प्रकार घडला. याबाबत तिनं युट्यूब चॅनलवरुन माहिती दिली असून हादरवणारा अनुभव सांगितला.

Anshuman Vichare Wife Shared Shocking Experience: नुकताच 'डॉक्टर्स डे' झाला, डॉक्टर म्हणजे, प्राण वाचवणारा देव. पण, कधीकधी रुग्णाचे प्राण वाचवणाऱ्या डॉक्टरांनी अर्धवट माहितीच्या आधारे, कोणतंही ज्ञान नसताना केलेल्या उपचारांमुळे रुग्णांचे जीव गेल्याची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. असाच काहीसा अनुभव प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या पत्नीला आलाय. मराठी अभिनेता अंशुमन विचारेची पत्नी पल्लवी आजारी असल्यामुळे आयुर्वेदिक उपचार घेत होती, पण त्या उपचारांदरम्यान पल्लवीला धक्कादायक अनुभव आला. याबाबत स्वतः पल्लवी विचारेनं खुलासा केला आहे. "मी मरता मरता वाचले", "माझा जीव गेला असता", अशा हादरवणाऱ्या शब्दांत पल्लवीनं आपला अनुभव सांगितला.
पल्लवी विचारे काय म्हणाली?
पल्लवीनं आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तिचा भयानक अनुभव शेअर केला. पल्लवी म्हणाली की, "हार्मोनल चेंजेसमुळे पल्लवी यांना काही त्रास होत होते. अलोपॅथिक गोळ्यांमुळे अधिक त्रास होऊन नये म्हणून तिने आयुर्वेदिक उपचार घेण्याचे ठरवले. ठाण्यातील एका आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेल्यानंतर पहिल्या व्हीजीटला 3500 हजार रुपये दिले, त्यात काही गोळ्या देण्यात आल्या. दुसऱ्या व्हिजिटला पंचकर्म ट्रीटमेंट करावी लागेल म्हणून 50-60 हजार रुपये घेतले. योग्य डाएट देण्यासाठी ब्लड टेस्ट करावी लागेल, असं पल्लविला सांगण्यात आलं. ब्लड टेस्टसाठी एक सुई लावण्यात आली आणि इंजेक्शननं ब्लड घेतील असं पल्लविला वाटलं पण 10 मिनिटं एका कॅप्सूल पॉटमध्ये ते रक्त काढण्यात आलं. या एवढ्या वेळात ते पॉट जवळपास पाऊणभर झालं होतं."
"एवढं रक्त काढताना ते डॉक्टर पल्लवीपासून ही गोष्ट लपवून ठेवत होते. त्यामुळे ही उपचाराची पद्धत चुकीची वाटते, असं जेव्हा वल्लविला जाणवलं, तेव्हा तिने अंशुमनला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये फोन करून बोलावलं. त्यादरम्यान मात्र पल्लवि बेशुद्ध पडली. ती महिला डॉक्टर पल्लवीच्या छातीवर दाब देऊन तिला उठवत होती. अंशुमन काळजीने डॉक्टरांना विचारू लागला तेव्हा ' ते रक्त पाहून पल्लवी घाबरली आणि बेशुद्ध पडली घाबरू नका ' एवढंच त्यांनी सांगितलं. पण यानंतर मात्र पल्लविला भरपूर उलट्या झाल्या. डॉक्टरांनी पल्लविला घरी न्यायला सांगितलं. तेव्हा रात्रभर तिची अवस्था अस्वस्थ करणारी होती. दुसऱ्या दिवशी पल्लवीने फॅमिली डॉक्टरकडे धाव घेतली. घडलेला प्रकार सांगितला. तेव्हा डॉक्टरांनी तिला शांत केले आणि 6 % एवढंच रक्त शरीरात असल्याचं टेस्टमध्ये कळलं. साधारण 5 टक्के पेक्षा कमी रक्त शरीरात असतं तेव्हा अटॅक येण्याची शक्यता असते. पण फॅमिली डॉक्टरांनी केलेल्या उपचारानंतर पल्लवी आता या संकटातून सुखरूप बाहेर पडली आहे.", असंही पल्लवीनं सांगितलं.
कुठलंही ज्ञान नसताना डॉक्टरांच्या त्या चुकीमुळे माझा जीव गेला असता अशी तक्रार पल्लवीनं सोशल मीडियावर केली आहे. गेले महिनाभर मी बेडवर पडून होते, पण अंशुमनने माझी खूप काळजी घेतली मला व्यवस्थित खाऊ घातलं आणि आता मी पूर्ण रिकव्हर होऊन व्यायाम करायला आलेय, असं पल्लवी सांगते. दरम्यान, पल्लवीला आलेल्या अनुभवावरुन एकंदरीतच आपल्याकडच्या वैद्यकीय सुविधांची दुरावस्था आणि वैद्यकीय सेवांचा सुरू असलेला भोंगळ कारभार समोर येत आहे.
पाहा व्हिडीओ :
महत्त्वाच्या इतर बातम्या :























