Suraj Chavan, Ankita Walawalkar, Bigg Boss Marathi 5: सूरज चव्हाणची लगीनघाई! अंकिताताईच्या घरी पार पडलं केळवण; गुलिगत स्टारची होणारी बायको पाहिली का?
Suraj Chavan, Ankita Walawalkar, Bigg Boss Marathi 5: गेल्या बऱ्याच दिवसांपासून सूरज चव्हाणच्या लग्नाच्या चर्चा रंगलेल्या. अशातच आता त्याच्या होणाऱ्या बायकोची झलक पाहायला मिळाली आहे.

Suraj Chavan, Ankita Walawalkar, Bigg Boss Marathi 5: बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण (Suraj Chavan) म्हणजे, चाहत्यांचा लाडका गुलिगत स्टार. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर सूरजनं शेअर केलेल्या पोस्टनं चर्चांना उधाण आलेलं. सूरजनं त्याच्या होणाऱ्या बायकोसोबतचा फोटो शेअर केलेला. त्यानं केलेली पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेली आणि सूरजची बायको कोण असेल? याच्या चर्चा रंगलेल्या. त्यानंतर अंकिता वालावलकरही (Ankita PrabhuWalawalkar) सूरजच्या गावी गेलेली. त्यावेळी तिनं सूरज आणि त्याच्या होणाऱ्या बायकोची भेट घेतलेली. अंकितानं आपल्या इन्स्टा स्टोरीला सूरजच्या होणाऱ्या बायकोसोबतचा फोटो शेअर केलेला. पण, तिच्या चेहऱ्यावर हॉर्ट इमोजी लावलेला. पण, आता अंकितानं शेअर केलेल्या पोस्टवरुन सूरजची लगीनघाई सुरू झालंय. अंकितानं सूरजच्या केळवणाचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये त्याच्या बायकोची झलक पाहायला मिळतेय.
View this post on Instagram
कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरनं एक व्हिडीओ शेअर केलाय, त्यात लिहिलंय की, "लग्नाची तयारी सुरू झालीये, मग केळवण तर असणारच ना! बघायचंय कोणाचं आहे, चला!" आता अंकितानं सूरज चव्हाणच्या पत्नीची झलक दाखवली आहे. सूरजच्या होणाऱ्या बायकोचं नाव संजना आहे. यावेळी सूरजने संजनासाठी आणि संजनाने सूरजसाठी उखाणा घेतला आहे.
व्हिडीओमध्ये सूरज चव्हाण उखाणा घेताना म्हणतो की, ''बिग बॉस' जिंकून झालं माझं पूर्ण स्वप्न… संजनाचं नाव घेतो आता करेन लग्न!' पुढे सूरजची होणारी बायको संजना सूरजसाठी उखाणा घेताना म्हणते की, ''बिग बॉसचा विनर झाला माझ्या प्रेमात सायको… सूरज रावांचं नाव घेते मीच त्यांची होणारी बायको!'
दरम्यान, अंकितानं शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला जातोय. सूरजचे चाहते त्याला त्याच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत. कमेंटबॉक्समध्ये सर्वांनी सूरजवर अभिनंदनाचा वर्षाव केलाय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























