Anjali Varmora Suicide Case: दोन वर्षांपूर्वी साखरपुडा, लग्न जवळ येताच होणाऱ्या सासूचं निधन; प्रसिद्ध मॉडेलनं पंख्याला लटकून आयुष्य संपवलं, मृत्यूपूर्वीची गूढ पोस्ट व्हायरल
Anjali Varmora Suicide Case: सुरतमध्ये मॉडेल अंजली वरमोरानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंजलीनं तिच्या राहत्या घरात गळफास घेतला.

Anjali Varmora Suicide Case: गुजरातमधील (Gujarat) सुरतमध्ये (Surat) प्रसिद्ध मॉडेल अंजली वरमोरा (Anjali Varmora) हिनं गळफास घेऊन आत्महत्या केलीय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजलीनं तिच्या घरात पंख्याला लटकून आत्महत्या केली. अंजलीच्या मृतदेहाजवळ कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. सध्या अंजलीच्या कुटुंबीयांची चौकशी केली जात आहे. तसेच, तिचा फोन ताब्यात घेण्यात आला असून तिच्या फोनची चौकशी सुरू आहे. अंजलीच्या आत्महत्येनंतर तिचं एक रिल व्हायरल होत आहे. अंजलीनं मृत्यूपूर्वी पोस्ट केलेल्या रीलमुळे चर्चांना उधाण आलं आहे. अंजलीच्या व्हायरल होणाऱ्या रिलवरुन ती डिप्रेशनमध्ये असल्याचं बोललं जात आहे.
सुरतमध्ये मॉडेल अंजली वरमोरानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंजलीनं तिच्या राहत्या घरात गळफास घेतला. तिनं दुपट्ट्याच्या मदतीनं पंख्याला लटकून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मीडिया रिपोर्टनुसार, अंजली वरमोरा आत्महत्या प्रकरणात आतापर्यंत कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. अंजलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस अंजलीच्या कुटुंबियांची सतत चौकशी करत आहेत. दरम्यान, शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर अनेक गोष्टींचा उलगडा होईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजली वरमोरा (Anjali Varmora Suicide Case) नवसारी बाजाराजवळील कार्तिक अपार्टमेंटमध्ये तिच्या आईवडिलांसह आणि धाकट्या भावासोबत राहत होती. शनिवारी रात्री तिनं जेवण केलं आणि मध्यरात्रीपर्यंत तिच्या कुटुंबाशी नेहमीप्रमाणे गप्पा मारल्या. तिला सर्वांनी बाहेर फिरायला जाण्याचा आग्रह केला, पण तिनं तिथेच राहण्याचा निर्णय घेतला.
दोन वर्षांपूर्वी झालेला साखरपुडा
अंजली वरमोराचा साखरपुडा साधारणतः दोन वर्षांपूर्वीच झाला होता. तर, तिचं लग्न याच वर्षी होणार होतं. पण, काही दिवसांपूर्वीच तिच्या होणाऱ्या सासूचं निधन झाल्यामुळे लग्न पुढे ढकलण्यात आलेलं.
अंजलीला कुणी धोका दिलेला?
अंजलीनं सोशल मीडिया अकाउंट इन्स्टाग्रामवर काही अशा पोस्ट केलेल्या, ज्या पाहून कळतंय की, गेल्या काही दिवसांपासून ती डिप्रेशनमध्ये होती. अंजली वरमोराच्या मृत्यूनंतर तिचं इमोशनल रील व्हायरल होत आहे. या रीलचं कनेक्शन सारेच तिच्या आत्महत्येशी जोडत आहेत. मृत्यूपूर्वी अंजलीनं इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या भावूक पोस्ट शेअर केलेल्या. तिनं गुजरातीमध्ये लिहिलेलं.
अंजलीनं तिच्या एका पोस्टमध्ये लिहिलेलं ती, "तू मला हे जाणवून दिले की मी तुझ्यासाठी काहीच नाही..." आणखी एका पोस्टमध्ये तिनं लिहिलेलं की, "जर सगळेच निघून गेले असते, तर काही अडचण आली नसती, पण जेव्हा आपलं कुणीतरी निघून जातं, तेव्हा खूप त्रास होतो..." दरम्यान, मृत्यूपूर्वी अंजलीनं कुणा-कुणाशी बोललेली याचीही पोलीस चौकशी करत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























