VIDEO : लाईव्ह शो सुरु असताना अभिनेत्याकडून वारंवार चुकीचा स्पर्श, अभिनेत्री अंजली राघव भडकली; थेट इंडस्ट्री सोडली
Anjali Raghav left bhojpuri industry serious allegations Pawan Singh : लाईव्ह शो सुरु असताना अभिनेत्याकडून वारंवार चुकीचा स्पर्श, अभिनेत्री अंजली राघव भडकली

Anjali Raghav left bhojpuri industry serious allegations Pawan Singh : भोजपुरी पॉवर स्टार पवन सिंह नेहमी वादात सापडलेला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा तो वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. अलीकडेच सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडिओ समोर आला. त्या व्हिडिओमध्ये ते एका लाईव्ह इव्हेंटमध्ये हरियाणाची अभिनेत्री अंजली राघवच्या कंबरेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करताना दिसली. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी पवन सिंह यांना ट्रोल केले, तर काहींनी अंजलीच्या चारित्र्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अखेर अभिनेत्रीने या संपूर्ण वादावर मौन तोडत आपली भूमिका मांडली आहे. एवढंच नाही तर त्यांनी इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतल्याचेही सांगितले.
वादाबाबत काय म्हणाल्या अंजली राघव?
अंजली राघव हे हरियाणाच्या म्युझिक इंडस्ट्रीतील लोकप्रिय नाव आहे. पवन सिंह यांनी त्यांना भोजपुरी म्युझिक व्हिडिओमध्ये काम करण्याची ऑफर दिली होती. पवन सिंह आणि अंजलीच्या गाण्याचं नाव होतं ‘सैयाँ सेवा करे’. या गाण्याच्या प्रमोशनसाठी लखनऊमध्ये एक इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमादरम्यान पवन सिंह अंजलीच्या कंबरेला हात लावताना कॅमेऱ्यात कैद झाले.
इस व्यक्ति का नाम पवन सिंह है जिसको देश के लोकतंत्र के मंदिर संसद में जाना है।लेकिन इस कृत्य से???
— Shivam Pandey 🇮🇳❤️ (@ShivamPandey__7) August 28, 2025
ये लड़की कितनी असहज महसूस कर रही है फिर भी मंच पर एक झापड़ नहीं मार रही पता है क्यों??क्योंकि काम नहीं मिलेगा और वहीं से ऐसे समाज के बलात्कारियों का मन बढ़ता है।भोजपुरी इंडस्ट्री… pic.twitter.com/TfoYoJwJDR
दरम्यान व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आणि नेटकऱ्यांनी ट्रोलिंग केल्यानंतर अंजलीने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत आपलं मत मांडलं. त्या म्हणाल्या –
“जेव्हा मला गाण्यासाठी कॉल आला, तेव्हा मी आधीच सगळ्या गोष्टी क्लिअर करून घेतल्या होत्या. यात कुठल्या डबल मीनिंग गोष्टी नसाव्यात, कपडे रिव्हिलिंग नसावेत, वाईट प्रकारचे सीन नसावेत, हे मी खात्री करून घेतलं. शूटदरम्यान सगळं नॉर्मल होतं. मला तिथे काहीच प्रॉब्लेम झाला नाही. नंतर इव्हेंटसाठी लखनऊला बोलावलं, तेव्हा मी होकार दिला.”
अंजली पुढे म्हणाल्या “स्टेजवर गेल्यावर पवन सिंह म्हणाले, इथे (कमरेला) काहीतरी लागलं आहे. माझी साडी नवी होती, म्हणून मला वाटलं टॅग राहिला असेल. मी साडीचा टॅग काढून टाकला होता. मग वाटलं की ब्लाउजचा टॅग राहिला असेल. मी प्रयत्न करत होते की ही गोष्ट पब्लिकसमोर येऊ नये, म्हणून मी ती लपवत होते. इव्हेंट संपल्यावर मी माझ्या टीमला विचारलं की खरंच काही लागलं होतं का, तर त्यांनी सांगितलं नाही. तेव्हा मला खूप राग आला, डोळ्यात पाणी आलं. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी मलाच चुकीचं ठरवलं. माझ्यावर मीम्स बनवले गेले, चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केले. म्हणाले त्या क्षणी मी काही का बोलले नाही.”
View this post on Instagram
“त्या वेळी मला काय करावं हेच कळत नव्हतं. कारण पवन सिंह तिथलेच होते. सगळे लोक त्यांना देवासारखं मानत होते, त्यांचे भक्त बनून पाय धरत होते. मला सांगितलं गेलं की मी या गोष्टीला ताण देऊ नये. कारण पवन सिंह यांची पीआर टीम खूप मजबूत आहे, आणि शेवटी दोष माझ्यावरच येईल. मला वाटलं ते या विषयावर काहीतरी बोलतील, पण ते शांत आहेत. म्हणून मी ठरवलं की मी भोजपुरी इंडस्ट्री सोडते. आता मी भोजपुरी सिनेमात काम करणार नाही.”, असंही अंजली यांनी स्पष्ट केलं.
ही गोष्ट सांगताना अंजलीच्या डोळ्यांत पाणी होतं. त्या भावूक झाल्या होत्या. मात्र चाहत्यांनी त्यांना आधार दिला. अंजलीचं म्हणणं आहे की त्या भोजपुरी सिनेमात काम करून काहीतरी वेगळं करायचं स्वप्न पाहत होत्या, पण ते शक्य झालं नाही.
View this post on Instagram
इतर महत्त्वाच्या बातम्या























