Aniket Vishwasrao : घटस्फोटादरम्यान पत्नीने केले हिंसाचाराचे आरोप; अनिकेत विश्वासराव व्यक्त होत म्हणाला, 'जे झालं त्याचा अतिशय आनंद...'
Aniket Vishwasrao : अभिनेता अनिकेत विश्वासराव याने त्याच्या घटस्फोटावर भाष्य करत असून त्याचं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.

Aniket Vishwasrao : ऊन पाऊस, कळत नकळत या मालिकांमधून अभिनेता अनिकेत विश्वासराव (Aniket Vishwasrao) हा प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यानंतर मोठ्या पडद्यावरही अनिकेतने त्याच्या अभिनयाची छाप सोडली. पण काही वर्षांपूर्वी अनिकेत त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे फार चर्चेत आला होता. अनिकेतने 2018 मध्ये अभिनेत्री स्नेहा चव्हाणसोबत लग्नगाठ बांधली होती. पण त्यांचा हा संसार फक्त दोनच वर्ष टिकला.
दरम्यान घटस्फोटाच्या वेळी स्नेहाने अनिकेतवर अनेक गंभीर आरोप केले होते. तसेच तिने हिंसाचार, जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचीही आरोप केला होता. पण हे सगळं पोटगी मिळवण्यासाठी ती करत असल्याचा आरोप अनिकेतने केला होता. यासगळ्यावर अनिकेतने नुकतच भाष्य केलं आहे. प्लॅनेट मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनिकेतने स्पष्ट भावना व्यक्त केल्या आहेत.
ज्यांनी हे सगळं ते भोगतायत - अनिकेत
घटस्फोटावर बोलताना अनिकेतने म्हटलं की, अशा काही घटना घडतात आयुष्यात की, आपण काय आहोत, हे जाणवून देतात. आजही माझ्याकडे चांगुलपणा शोधण्याचा दृष्टीकोन आहे. चार वाईट लोकांमुळे मी माझ्या आयुष्यातल्या इतर लोकांनाही त्याच तराजूत नाही तोलणार. ज्यांनी ते सगळं ते भोगतायत, कर्म सगळ्यांचे असतात. या गोष्टीचा मानसिक त्रास नक्कीच झाला. जे झालं त्याचा अतिशय आनंद आहे. पण त्या कायदेशीर प्रक्रियेतून जावच लागतं. हायकोर्टाकडूनच निकाल देण्यात आला. त्यामुळे आता काय बोलणार यावर.
पुढे त्याने म्हटलं की, मला या गोष्टीविषयी काही बोलायचंच नव्हतं, कारण काय खरं होतं हे मला माहितेय. पण ही समाजाची एक विचारसरणी आहे, अशा गोष्टी झाल्या की, हा दु:खी होणार वैगरे. पण मी दु:खी नव्हतो आणि फाईट करत होतो. अनिकेत संपला हे मी ऊन पाऊस पासून ऐकतोय. त्यामुळे कोण काय बोलतं याचा मला अजिबात फरक पडत नाही.
डंका सिनेमातून अनिकेत येणार भेटीला
पोश्टर बॉईज, पोश्टर गर्ल, बघतोस काय मुजरा कर या सिनेमांमधून अनिकेत झळकला होता. आता त्याचा डंका हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने अनिकेत एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
