Shah Rukh Khan : जेव्हा संपूर्ण बॉलीवूडसमोर अंबानींची नवी सून किंग खानला 'अंकल' म्हणते, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल; नेमकं काय घडलं?
Shah Rukh Khan and Radhika Merchant : शाहरुख खान आणि राधिका मर्चंट यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय.
Shah Rukh Khan and Radhika Merchant Viral Video : मागील अनेक दिवसांपासून अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांची लगीनघाई सुरु होती. शुक्रवार 12 जुलै रोजी हे जोडपं लग्नबंधनात अडकलं. जितकी चर्चा अनंत आणि राधिकाच्या लग्नाची झाली तितकीच किंबहुना त्यापेक्षाही जास्त चर्चा ही अनंत आणि राधिकाच्या प्री वेडिंगची झाली होती. लग्नसोहळ्यासारखाच त्यांचे प्री वेडिंगचे सोहळे पार पडले होते. या सोहळ्यांमध्येही संपूर्ण बॉलीवूड सहकुटुंब उपस्थित होतं.
अनंत आणि राधिकाचं पहिलं प्री वेडिंग हे गुजरातमधील जामनगर येथे पार पडलं. बॉलीवूडची अनेक दिग्गज मंडळी या सोहळ्याला हजर होती. इतकचं नव्हे तर शाहरुख, सलमान आणि आमिर या तिन्ही खाननी या सोहळ्यात एकाच मंचावर धमाकेदार फरफॉर्मन्स देखील केलाय. पण सध्या याच सोहळ्यातील राधिका आणि शाहरुखचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.
व्हिडीओत नेमकं काय?
अनंत आणि राधिकाच्या प्री वेडिंगसाठी शाहरुखही जामनगरला गेला होता. त्यावेळी मंचावर राधिका शाहरुखला अंकल म्हणते आणि सोहळ्यात एकच हशा पिकतो. त्यावर शाहरुखही राधिकाला मिश्लिक असं उत्तर देतो. तो राधिकाला म्हणतो की, या ठिकाणी जर अक्षय कुमार असता, तर अक्षय कुमारच म्हणाली असतीस. यावर राधिका देखील हसायला लागते. त्यानंतर ती अनंतसाठी शाहरुखच्या सिनेमातला एक डॉयलॉग म्हणते.
View this post on Instagram
प्री-वेडिंगचा नेत्रदीपक सोहळा
जगभरात सर्वात मोठं लग्न असलेल्या या लग्नाचे अनेक सोहळे पार पडले. अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगच्या सोहळ्यात कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला. अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगचा सोहळा गुजरातच्या जामनगरला तीन दिवस चालला. प्री-वेडिंगच्या सोहळ्यालाच 1 हजार कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज आहे. प्री-वेंडिंग सोहळ्याला मार्क झुकरबर्ग, बिल गेट्ससारखे पाहुणे निमंत्रित होते. प्री-वेडिंग सोहळ्यासाठी साडेतीनशे विमानांची वाहतूक झाली. प्री-वडिंग सोहळ्यात परफॉर्मन्ससाठी रिहानाला 74 कोटी, जस्टिन बिबरच्या परफॉर्मन्सला 83 कोटी रुपये देण्यात आले होते. इटलीत क्रुझवर झालेल्या प्री-वेडिंग सोहळ्यात जगभरातील 800 पाहुणे पोहोचले होते.