Aniket Vishwasrao : चार वर्षांनी अनिकेत विश्वासराव मोठ्या पडद्यावर, आषाढी एकादशीनिमित्त रसिक प्रेक्षकांसाठी घेऊन येणार खास भेट
Aniket Vishwasrao : अभिनेता अनिकेत विश्वासराव हा मोठ्या पडद्यावर दिसणार असून तो नव्या सिनेमातून एका आगळ्यावेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
![Aniket Vishwasrao : चार वर्षांनी अनिकेत विश्वासराव मोठ्या पडद्यावर, आषाढी एकादशीनिमित्त रसिक प्रेक्षकांसाठी घेऊन येणार खास भेट Aniket Vishwasrao come back in Cinema after 4 years in Danka Harinamacha Movie Entertainment latest update detail marathi news Aniket Vishwasrao : चार वर्षांनी अनिकेत विश्वासराव मोठ्या पडद्यावर, आषाढी एकादशीनिमित्त रसिक प्रेक्षकांसाठी घेऊन येणार खास भेट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/18/3a8d5a073d878aca1414160886996b331718720174210720_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Aniket Vishwasrao : अभिनेता अनिकेत विश्वासराव (Aniket Vishwasrao) हा मालिका, नाटकं सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्याच्या अभिनयाने तो प्रेक्षकांच्या पसंतीस देखील उतरल्याचं पाहायला मिळालं. पण चार वर्ष जवळपास अनिकेत मोठ्या पडद्यापासून लांब होता. पण आता तो मोठ्या पडद्यावर परत येत असून तो एक आगळी वेगळी भूमिका साकारणार आहे.
‘डंका…हरीनामाचा’ या सिनेमाच्या माध्यमातून अनिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.या सिनेमात अनिकेत विश्वासराव हा मात्र या विठूरायाचा शोध घेताना दिसणार आहे. पण तो हा शोध कशासाठी घेतोय? हे जाणून घ्यायचं असेल तर रुद्र एंटरटेनमेंट स्टुडिओज् आणि गणराज स्टुडिओज् प्रस्तुत ‘डंका…हरीनामाचा’ हा चित्रपट तुम्हाला पहावा लागेल. हा मराठी चित्रपट 19 जुलै रोजी चित्रपटगृहात दाखल होतोय. रविंद्र फड निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन श्रेयश जाधव यांनी केले आहे.
चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
या चित्रपटाचा टीझर नुकताच समोर आला असून, ‘चला आपण आणू आपल्या विठुरायाला’... असं अनिकेत बोलताना दिसतोय. विठ्ठलाच्या शोधात असतांना अनिकेतच्या हाती काय येतं? आणि हा शोध नेमका कुठे संपतो ? याची उत्सुकता प्रदर्शित झालेल्या टीझर वरून निर्माण झाली आहे. अनिकेत विश्वासराव सोबत सयाजी शिंदे, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षया गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार,किरण भालेराव, कबीर दुहान सिंग, महेश जाधव या कलाकारांची झलकसुद्धा या टीझर मध्ये पहायला मिळतेय.
अनिकेत भूमिकेविषयी काय म्हणाला?
‘डंका…हरीनामाचा’ हा चित्रपट पांडुरंगाच्या निस्सीम भक्तीवर आधारित आहे. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना अनिकेत सांगतो, या चित्रपटात मी जना ही व्यक्तिरेखा साकारतोय. भक्तीत लीन होणारा, श्रद्धाळू, बापासाठीअगदी श्रावणबाळ असलेला जना परंपरागत विठ्ठल मंदिर वाचवण्याचा प्रश्न येतो, तेव्हा तो आपलं सर्वस्व पणाला लावतो. या चित्रपटाच्या निमित्ताने खूप सुंदर अनुभव मला घेता आला. उत्तम दिग्दर्शक, सहकलाकार आणि निर्मिती संस्थेसोबत काम करण्याचा आनंद नक्कीच आहे.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)