एक्स्प्लोर

Angelina Jolie : ‘मलाच नाही तर, मुलांनाही केली मारहाण’, हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोलीने पूर्वपती ब्रॅड पिटवर केला गैरवर्तनाचा आरोप!

Angelina Jolie : हॉलिवूडची प्रसिद्ध जोडी अभिनेत्री अँजेलिना जोली (Angelina Jolie) आणि अभिनेता ब्रॅड पिट (Brad Pitt) आता वेगळे झाले असले, तरी ते दोघेही नेहमीच चर्चेत असतात.

Angelina Jolie : हॉलिवूडची प्रसिद्ध जोडी अभिनेत्री अँजेलिना जोली (Angelina Jolie) आणि अभिनेता ब्रॅड पिट (Brad Pitt) आता वेगळे झाले असले, तरी ते दोघेही नेहमीच चर्चेत असतात. सध्या या जोडीमध्ये एका फ्रेंच वाईनरीवरून कायदेशीर लढाई सुरु आहे. 2008 मध्ये दोघांनी मिळून ही वाईनरी खरेदी केली होती. तर, नुकतीच ही केस अँजेलिनाने जिंकली आहे. पण, या निकालानंतर पुन्हा एकदा या प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. अभिनेत्रीच्या कंपनीने आता ब्रॅड पिट विरुद्ध 250 दशलक्ष डॉलरचा खटला दाखल केला आहे. अँजेलिना जोलीने पूर्व पती आणि अभिनेता ब्रॅड पिटवर फसवणूक आणि चोरीचा आरोप केला आहे.

अँजेलिनाच्या कंपनीने ब्रॅड पिटवर 250 दशलक्ष डॉलर्सचा दावा ठोकला. अँजेलिनाची कंपनी, नोव्हेल एलएलसीने म्हटले की, ब्रॅडने त्यांचा संयुक्त फ्रेंच वाईन व्यवसाय अँजेलिनाकडून काढून घेतला आणि नंतर अतिशय गुप्तपणे त्यातील मालमत्ता त्याच्या मित्रांकडे आणि काही 'व्हॅनिटी' प्रकल्पांकडे वळती केली. मात्र, या प्रकरणाने देखील आता एक नवे वळण घेतले आहे. या खटल्याच्या सुनावणी दरम्यान अभिनेत्रीने त्यांच्या नात्याबद्दल काही खुलासे केले आहेत. या नात्यात आपल्याला सतत अपमानास्पद वागणून मिळाल्याचे तिने म्हटले आहे.

अभिनेत्रीसह मुलांनाही केली मारहाण

अँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट यांनी 2016 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला होता. या जोडीला 6 मुले आहेत. हे प्रकरण 2016चे आहे.  या केसमध्ये आपली बाजू मांडताना अँजेलिनाने म्हटले होते की, एका खाजगी विमानात ब्रॅडने तिच्याशी गैरवर्तन केले होते. यावेळी दाम्पत्याची मुलेही त्याचा विमानात उपस्थित होती. रिपोर्ट नुसार, अँजेलिनाने एफबीआय अधिकाऱ्याला सांगितले की, ब्रॅडने तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. त्यावेळी त्यांची मुलेही त्यांच्यासमोर होती. ब्रॅडने अँजेलिनाला जबरदस्तीने विमानाच्या मागच्या बाजूला नेले आणि तिचा खांदा जोरात धरून म्हणाला की, तू संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त केले आहेस. इतकेच नव्हे तर, ब्रॅडने त्यांच्या एका मुलाचा गळा दाबण्याचा प्रयत्न करत, त्याला मारहाण केली होती, असे देखील तिने सांगितले.

अँजेलिनाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न

सदर प्रकरण लॉस एंजेलिसच्या न्यायालयात सुरु आहे, या प्रकरणात असा आरोप करण्यात आला आहे की, पिटने जोलीला वाईनरीमधील तिची भागीदारी ‘नॉनडिक्लोजर करारा’वर विकण्याची अट घालण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे ती आपल्यावर आणि आपल्या मुलांवर झालेले भावनिक आणि शारीरिक शोषण याबद्दल सार्वजनिकरीत्या आवाज उठवू शकणार नव्हती. वायनरीच्या मालकी हक्कावरून सुरु झालेला हा वाद आता अनेक नवी वळणे घेत आहे. दरम्यान अभिनेत्रीच्या या वक्तव्यांमुळे मनोरंजन विश्व हादरले आहे.

हेही वाचा :

Entertainment News Live Updates 5 October: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Surve : एकनाथ शिंदेंकडून अखेरच्या क्षणी मागाठाण्यात बदल, आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेची माघार, वॉर्ड 4 आणि 5 मधून कोण रिंगणात?
एकनाथ शिंदेंकडून अखेरच्या क्षणी मागाठाण्यात बदल, आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेची माघार
India Women vs Sri Lanka Women, 5th T20I: टीम इंडियानं श्रीलंकेचा धुव्वा उडवला; वर्ल्डकपपूर्वी 5-0 ने व्हाईटवाॅश देत निर्विवाद वर्चस्व
टीम इंडियानं श्रीलंकेचा धुव्वा उडवला; वर्ल्डकपपूर्वी 5-0 ने व्हाईटवाॅश देत निर्विवाद वर्चस्व
बांगलादेशच्या माजी पीएम खालिदा झिया यांचे निधन; पाकिस्तानात नजरकैद, गोळीबारात वाचल्या, पीएम होताच भारताचा विरोध
बांगलादेशच्या माजी पीएम खालिदा झिया यांचे निधन; पाकिस्तानात नजरकैद, गोळीबारात वाचल्या, पीएम होताच भारताचा विरोध
BMC Election: ठाकरे बंधूंच्या युतीत एकाच प्रभागात दोन महिला आमने-सामने अन् शिवसैनिकांसह मनसैनिकही संभ्रमात!
ठाकरे बंधूंच्या युतीत एकाच प्रभागात दोन महिला आमने-सामने अन् शिवसैनिकांसह मनसैनिकही संभ्रमात!

व्हिडीओ

Zero Hour Full : तिकीट न मिळाल्यानं कार्यकर्त्यांच्या नाराजीचा महापालिका निकालांवर किती परिणाम?
Chhatrapati SambhajiNagar BJP तिकीट का कापलं? निष्ठावंतांच्या भावनांचा कडेलोट, आयारामांना झुकतं माप?
BJP Elections Special Report तिकीट देताना निष्ठावंतांना डावललं? भाजप कार्यकर्त्यांचा संताप
Yogesh Gonnade आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करुन अर्ज,शिवसेनेकडून उमेदवाराला स्मशानभूमीत AB फॉर्म
Neelam Gorhe : भाजपा आम्हाला काहीही स्पष्ट करत नाही; आमची युती...; नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Surve : एकनाथ शिंदेंकडून अखेरच्या क्षणी मागाठाण्यात बदल, आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेची माघार, वॉर्ड 4 आणि 5 मधून कोण रिंगणात?
एकनाथ शिंदेंकडून अखेरच्या क्षणी मागाठाण्यात बदल, आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेची माघार
India Women vs Sri Lanka Women, 5th T20I: टीम इंडियानं श्रीलंकेचा धुव्वा उडवला; वर्ल्डकपपूर्वी 5-0 ने व्हाईटवाॅश देत निर्विवाद वर्चस्व
टीम इंडियानं श्रीलंकेचा धुव्वा उडवला; वर्ल्डकपपूर्वी 5-0 ने व्हाईटवाॅश देत निर्विवाद वर्चस्व
बांगलादेशच्या माजी पीएम खालिदा झिया यांचे निधन; पाकिस्तानात नजरकैद, गोळीबारात वाचल्या, पीएम होताच भारताचा विरोध
बांगलादेशच्या माजी पीएम खालिदा झिया यांचे निधन; पाकिस्तानात नजरकैद, गोळीबारात वाचल्या, पीएम होताच भारताचा विरोध
BMC Election: ठाकरे बंधूंच्या युतीत एकाच प्रभागात दोन महिला आमने-सामने अन् शिवसैनिकांसह मनसैनिकही संभ्रमात!
ठाकरे बंधूंच्या युतीत एकाच प्रभागात दोन महिला आमने-सामने अन् शिवसैनिकांसह मनसैनिकही संभ्रमात!
तर त्याला टायरीत घालतो म्हणणाऱ्या 'पालकमंत्री' अजितदादांकडून पुण्यात अट्टल गुन्हेगारांना रेड कार्पेट सुरुच! आंदेकर, गजा मारणेच्या बायकोनंतर आणखी एक गुन्हेगार शोधत उमेदवारीची 'बक्षिसी'
तर त्याला टायरीत घालतो म्हणणाऱ्या 'पालकमंत्री' अजितदादांकडून पुण्यात अट्टल गुन्हेगारांना रेड कार्पेट सुरुच! आंदेकर, गजा मारणेच्या बायकोनंतर आणखी एक गुन्हेगार शोधत उमेदवारीची 'बक्षिसी'
पुण्यात नऱ्हेजवळ भुमकर चौकात भयंकर ट्रॅफिक; नववर्षानिमित्त येणाऱ्या पर्यटकामुळे पुणेकर अडकले
पुण्यात नऱ्हेजवळ भुमकर चौकात भयंकर ट्रॅफिक; नववर्षानिमित्त येणाऱ्या पर्यटकामुळे पुणेकर अडकले
BMC Election: ठाकरेंच्या शिवसेनेतही बंडाची लागण! थेट पक्षप्रमुखांसमोर अनिल परबांनी ताकद लावलेल्या उमेदवारानं सुद्धा बंडाची मशाल पेटवली, वरुण सरदेसाईंना तगडा झटका?
ठाकरेंच्या शिवसेनेतही बंडाची लागण! थेट पक्षप्रमुखांसमोर अनिल परबांनी ताकद लावलेल्या उमेदवारानं सुद्धा बंडाची मशाल पेटवली, वरुण सरदेसाईंना तगडा झटका?
पहिल्यांदा नाशिकमध्ये भाजपचे AB फॉर्म घेऊन जाणाऱ्या गाड्यांचा चक्क पाठलाग, आता थेट आमदार सीमा हिरे आणि उमेदवाराच्या वादाचा व्हिडिओ व्हायरल!
पहिल्यांदा नाशिकमध्ये भाजपचे AB फॉर्म घेऊन जाणाऱ्या गाड्यांचा चक्क पाठलाग, आता थेट आमदार सीमा हिरे आणि उमेदवाराच्या वादाचा व्हिडिओ व्हायरल!
Embed widget