Anant Ambani-Radhika Merchant Wedding Live Updates : राजेशाही सोहळ्याचा अनोखा साज, अनंत-राधिका लग्नबंधनात

Anant-Radhika Wedding Live : उद्योजक मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा लेक अनंत अंबानी आणी राधिका मर्चंट यांच्या शाही विवाह सोहळा 12 जुलै रोजी पार पडला.

जयदीप मेढे Last Updated: 13 Jul 2024 03:55 PM
Anant Ambani-Radhika Merchant Wedding Live Updates : पार पडणार राधिका-अनंतचा शुभ आशीर्वाद सोहळा, पंतप्रधान मोदी राहणार उपस्थित

Anant Ambani-Radhika Merchant Wedding Live Updates : लग्नसोहळ्यानंतर आता राधिका आणि अनंतचा शुभ आशीर्वाद सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील नवविवाहितांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. 

Anant Ambani-Radhika Merchant Wedding Live Updates : माधुरीनं वरमाईसोबत धरला ठेका तर रितेश-जनेलियाच्या एन्ट्रीची चर्चा; अंबानींच्या लग्नात मराठमोळ्या वऱ्हाडींचा भन्नाट डान्स

Anant Ambani-Radhika Merchant Wedding Live Updates :  अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नामध्ये अनेक मराठमोळ्या दिग्गजांनी हजेरी लावली. इतकंच नव्हे तर या वऱ्हाडी मंडळींनी चांगलाच ठेका धरला. माधुरी दीक्षित आणि रितेश देशमुख अनंत अंबानींच्या वरातीमध्ये थिरकताना दिसले. सध्या सोशल मीडियावर या दोघांचेही व्हिडीओ बरेच चर्चेत आले आहेत. अनंत राधिकाच्या लग्नासाठी संपूर्ण बॉलीवूड उपस्थित राहिलं होतं. 

Anant Ambani-Radhika Merchant Wedding Live Updates : मुकेश अंबानींची लेक ईशा अंबानीचा रॉयल ट्रेडिशनल लूक

Anant-Radhika Wedding Live : मुकेश अंबानींची लेक ईशा अंबानीचा रॉयल ट्रेडिशनल लूक


 





Radhika Merchant Bridal Look : राधिका मर्चंटचा रॉयल ब्रायडल लूक

Anant Ambani Radhika Merchant Wedding : राधिका मर्चंटचा ब्रायडल लूकमधील पहिला फोटो समोर आला आहे. लग्नासाठी राधिकाने गुजराती लूकला पसंती दिली आहे.


सविस्तर बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Anant Ambani-Radhika Merchant's wedding : गायिका आशा भोसले यांची हजेरी

Anant Ambani-Radhika Merchant's wedding : अनंत-राधिकाच्या लग्नाला गायिका आशा भोसले यांनी हजेरी लावली.


 





Anant Ambani-Radhika Merchant's wedding : अनंतच्या लग्नाला गौतम गंभीरची सपत्नीक हजेरी

Anant Ambani-Radhika Merchant's Wedding Live : अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नात भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर पत्नीसह मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पोहोचले.


 





Anant Ambani-Radhika Merchant's Wedding Live : अनंत-राधिकाच्या लग्नात सुपरस्टार रजनीकांतचा डान्स

Anant Ambani-Radhika Merchant's Wedding Live : अनंत-राधिकाच्या लग्नात सुपरस्टार रजनीकांत यांनी डान्स केला. त्याचा व्हिडीओ समोर आला आहे.





Anant Ambani-Radhika Merchant's Wedding : बच्चन परिवाराची अंबानींच्या लग्न समारंभाला हजेरी

Anant Ambani-Radhika Merchant's Wedding Live : ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक बच्चन आणि नातवंडांसह अनंत-राधिकाच्या लग्नाला पोहोचले.





Anant Radhika Wedding Live : ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचीही अनंतच्या लग्नाला हजेरी

Anant Radhika Wedding Live : ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही अनंत-राधिकाच्या लग्नाला हजेरी लावली. पीटीआयच्या एक्स अकाऊंटवर अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये त्याच्यासोबत मुलेही दिसत आहेत.





Anant Radhika Wedding Live : अनंत - राधिकाच्या लग्नात करण जोहर आणि ओरीची हजेरी

Anant Radhika Wedding Live : अनंत - राधिकाच्या लग्नात करण जोहर आणि ओरीही पोहोचले.



दिग्दर्शक करण जोहर



ओरी

Anant Radhika Wedding Live : अनंत-राधिकाच्या लग्नात शाहरुख खान

Anant Radhika Wedding Live : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात शाहरुख खान पोहोचला. शाहरुख पत्नी गौरी खानसोबत पापाराझींसाठी पोज देताना दिसला. 


Anant Radhika Wedding Live : अंबानी कुटुंबाच्या सेलिब्रेशनला बाबा रामदेव यांची हजेरी

Anant Radhika Wedding Live : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट या जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी योगगुरू बाबा रामदेव मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पोहोचले आहेत. त्यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.


Anant Radhika Wedding Live : अनंत-राधिकाच्या लग्नात जॉन अब्राहम पत्नीसह पोहोचला

Anant Radhika Wedding Live : अनंत-राधिकाच्या लग्नाला अभिनेता जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रिया रुंचाल यांनीही हजेरी लावली होती.


Anant Radhika Wedding Live : अनंतच्या लग्नात हजेरी लावण्यासाठी सलमान-अर्पिता पोहोचले

Anant Radhika Wedding Live : अनंत-राधिकाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी सलमान खान त्याची बहीण अर्पितासोबत पोहोचला आहे.


Anant Ambani-Radhika Merchant Wedding Live Updates : जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये सेलिब्रिटींची मांदियाळी

Anant Ambani-Radhika Merchant Wedding Live Updates : अनंत-राधिकाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी बॉलीवूड आणि हॉलिवूड स्टार्सही जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पोहोचले आहेत. 






 






 


 

Anant-Radhika Wedding Live Updates :हार्दिक पांड्या भाऊ कृणाल पंड्या आणि ईशान किशनसोबत पोहोचला

Anant-Radhika Wedding Live Updates : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात सहभागी होण्यासाठी क्रिकेटपटू हार्दिक पांड्या, कृणाल पंड्या आणि ईशान किशन मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पोहोचले.





Anant Ambani-Radhika Merchant Wedding Live Updates : भाईजानचा डॅशिंग अंदाज

Anant Ambani-Radhika Merchant Wedding Live Updates : अनंत-राधिकाच्या लग्नात बॉलिवूडचा भाईजान सलमान खानही पोहोचला आहे.


VIDEO : सेलिब्रिटींसह नवरदेव अनंत अंबानीची ग्रँड एन्ट्री

Anant Ambani Barat Dance : अनंत अंबानीची वरात बीकेसीमध्ये पोहोचली आहे. यावेळी बॉलिवूडच्या कलाकार मंडळी अनंत अंबानीच्या लग्नात कल्ला करताना दिसत आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Anant Ambani-Radhika Merchant Wedding Live Updates : अनंत अंबानीच्या वरातीत प्रियंका चोप्राचे ठुमके

Anant Ambani-Radhika Merchant Wedding Live Updates : अनंतच्या वरातील देसी गर्ल प्रियंका चोप्राचा डान्स लक्ष वेधून घेत आहे.


 


Anant Ambani-Radhika Merchant Wedding Live Updates : बीकेसीमध्ये पोहोचली अनंत अंबानीची वरात

 Anant Ambani Barat Live Updates : अनंत अंबानीची वरात बीकेसीमध्ये पोहोचली आहे.









 

Anant-Radhika Wedding Live : अनंत-राधिकाच्या लग्नात निक-प्रियांका पोहोचले

Anant-Radhika Wedding Live Updates : अनंत-राधिकाच्या लग्नात अभिनेत्री प्रियांका चोप्रा पती निक जोनास याच्यासोबत पोहोचली आहे. 



Anant Ambani-Radhika Merchant Wedding Live Updates : सारा अली खानचा ट्रेडिशनल लूक

Sara Ali Khan in Anant-Radhika Wedding : अभिनेत्री सारा अली खान भाऊ इब्राहिम खानसोबत अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्याला पोहोचली आहे. यावेळी दोघेही ट्रेडिशनल लूकमध्ये दिसले.


 





Dhoni at Anant-Radhika Wedding : 'कॅप्टन कूल' धोनीचा ट्रेडिशनल स्वॅग

Anant Ambani-Radhika Merchant Wedding Live Updates : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी पत्नी आणि मुलीसह अनंत-राधिकाच्या लग्न समारंभाला पोहोचला आहे. यावेळी धोनीने गोल्डन रंगाची शेरवानी घातली होती, तर साक्षी धोनीने पोपटी रंगाच्या लेहेंगा आणि मुलगी झिवा पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली.





Anant Radhika Wedding Live : साऊथ सुपरस्टार रजनीकांतची ग्रँड एन्ट्री

Anant Radhika Wedding Live Updates : अनंत-राधिकाच्या लग्नात साऊथ सुपरस्टार रजनीकांतची ग्रँड एन्ट्री झाली आहे. यावेळी रजनीकांत साऊथ इंडियन लूकमध्ये दिसले. रजनीकांत यांनी कुटुंबियांसह या सोहळ्याला हजेरी लावली. 





Anant-Radhika Wedding Live Updates : बॉलिवूड अभिनेता संजय दत्तची लग्नसोहळ्याला हजेरी

Actor Sanjay Dutt in Anant-Radhika Wedding Live Updates : अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्याला बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने हजेरी लावली आहे.





Anant Radhika Wedding Live : अनंत राधिकाच्या लग्नात WWE सुपरस्टार जॉन सिनाचा ट्रेडिशनल लूक

Anant Radhika Wedding Live : WWE सुपरस्टार जॉन सिना लग्नस्थळी पोहोचला. यावेळी त्याने कॅमेऱ्यासोबत त्याची U Can't See Me पोझ दिली. यावेळी जॉन सिना आकाशी रंगाच्या शेरवानीमध्ये ट्रेडिशनल अंदाजात दिसला.



Anant-Radhika Wedding Live Updates :

Anant Ambani-Radhika Merchant Wedding Live Updates : मुकेश अंबानी त्यांच्या कुटुंबासह जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पोहोचले आहेत. नवरदेव अनंत अंबानी, मुलगा आकाश अंबानी पत्नी श्लोकासोबत पोहोचले. यावेळी मुलगी ईशा पती आनंद पिरामलसोबत दिसली. 



Anant Ambani Wedding Live : अभिनेत्री अनन्या पांडेचा ग्लॅमरस अंदाज

Anant Ambani Wedding Live Update : अनंत-राधिकाच्या वरातीसाठी अभिनेत्री अनन्या पांडे लग्नस्थळी पोहाचली आहे.


 





Anant Radhika Wedding Live : अनंत अंबानी वरात घेऊन अँटिलिया बाहेर पडले

Anant Radhika Wedding Live : अनंत अंबानी सजवलेल्या गाडीतून आणि ढोल-ताशांसह जिओ वर्ल्ड सेंटरसाठी वरात घेऊन निघाला आहे. वरातीचा व्हिडीओही समोर आला आहे.





Mukesh Ambani Meet Mamta Banerjee : मुकेश अंबानी यांनी ममता बॅनर्जी यांची भेट घेतली

Anant-Radhika Wedding Live Updates : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममत बॅनर्जी याही अनंत अंबानीच्या लग्नासाठी  मुंबईत पोहोचल्या आहेत. गुरुवारी संध्याकाळी मुकेश अंबानी यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांचं स्वागत केलं होतं.

Anant Ambani-Radhika Merchant Wedding Live Updates : अनंत अंबानीची वरात निघाली

Anant Ambani-Radhika Wedding Live : अनंत अंबानीची वरात निघाली. अँटिलियाहून वाजत-गाजत अनंत अंबानीची वरात जिओ वर्ल्ड सेंटरकडे रवाना झाली आहे.



Anant-Radhika Wedding : अनंत, आकाश की ईशा, अंबानी कुटुंबातील कुणाच्या लग्नात सर्वाधिक खर्च?

Anant Radhika Wedding : अनंत अंबानी, आकाश अंबानी की ईशा अंबानी, अंबानी कुटुंबाने कुणाच्या लग्नात सर्वाधिक खर्च केला आणि किती ते जाणून घ्या.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अनंत-राधिकाच्या लग्नात KGF स्टार यश पोहोचला

Anant Ambani-Radhika Merchant Wedding Live Updates : KGF स्टार रॉकी म्हणजेच यश अनंत अंबानींच्या शाही लग्नात सहभागी होण्यासाठी मुंबईत पोहोचला आहे. काळ्या टी-शर्टमध्ये तो फार हँडसम दिसत होता. त्याच्यासोबत पत्नी राधिका पंडित मुंबईत पोहोचली आहे.

Anant Ambani Radhika Merchant Wedding Live : 3 वाजता वरात घेऊन येणार अनंत अंबानी

Anant Ambani Radhika Merchant Wedding Live : अनंत अंबानी 3 वाजता वरात घेऊन जियो वर्ल्ड सेंटरमध्ये पोहोचणार आहे. या लग्नासाठी देश-विदेशातील सेलिब्रिटींटी मांदियाळी पाहायला मिळत आहे.

Anant Ambani Radhika Merchant Wedding Live: अंबानींच्या सुनांचा विषयच लय भारी! आई आणि आजीचे दागिने घालून मिरवलं, राजेशाही अंदाज एकदा पाहाच..

Anant Ambani Radhika Merchant Wedding Live:  एकीकडे अवघं बॉलीवूड अभिनेत्री सुंदर पोशाखात कार्यक्रमांना पोहोचत असतानाच, दुसरीकडे अंबानी कुटुंबातील महिलाही आपली शाही स्टाईल दाखवण्यात कुणापेक्षा कमी नाहीत. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Anant Ambani Radhika Merchant Wedding Live: अनंत-राधिकाच्या लग्नाचे संपूर्ण शेड्यूल कसे असणार?

Anant Ambani Radhika Merchant Wedding Live : अनंत राधिकाचे आज लग्न होणार आहे. हा शाही विवाह जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये होणार आहे. अनंत-राधिकाच्या लग्नाचे संपूर्ण शेड्यूल पुढील प्रमाणे.. 


- दुपारी 3 वाजता वरात एकत्र येणार असून पगडी बांधण्याचा सोहळा पार पडणार आहे.  
- रात्री 8 वाजता वरमाला सोहळा होईल.
- लग्न, सात फेरे आणि सिंदूर दान सोहळ्याची वेळ रात्री 9.30 पासून सुरू होईल.
-  लग्नासाठी पाहुण्यांना पारंपारिक ड्रेस कोडमध्ये उपस्थित राहावे लागेल.
- 13 आणि 14 जुलै असे दोन दिवस वेगवेगळ्या लोकांसाठी रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे.

Anant Ambani Radhika Merchant Wedding Live: अनंत-राधिकाच्या लग्नाचे संपूर्ण शेड्यूल कसे असणार आहे...

Anant Ambani Radhika Merchant Wedding Live : अनंत राधिकाचे आज लग्न होणार आहे. हा शाही विवाह जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये होणार आहे. अनंत-राधिकाच्या लग्नाचे संपूर्ण शेड्यूल पुढील प्रमाणे.. 


- दुपारी 3 वाजता वरात एकत्र येणार असून पगडी बांधण्याचा सोहळा पार पडणार आहे.  
- रात्री 8 वाजता वरमाला सोहळा होईल.
- लग्न, सात फेरे आणि सिंदूर दान सोहळ्याची वेळ रात्री 9.30 पासून सुरू होईल.
-  लग्नासाठी पाहुण्यांना पारंपारिक ड्रेस कोडमध्ये उपस्थित राहावे लागेल.
- 13 आणि 14 जुलै असे दोन दिवस वेगवेगळ्या लोकांसाठी रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे.

Anant Ambani Radhika Merchant Wedding Live: अनंत-राधिकाच्या लग्नासाठी WWE सुपरस्टार जॉन सीना मुंबईत दाखल

Anant Ambani Radhika Merchant Wedding Live:  अनंत अंबानी- राधिका मर्चंटच्या शाही विवाह सोहळ्यात हजेरी लावण्यासाठी WWE सुपरस्टार जॉन सीना मुंबईत दाखल झाला आहे. 

Anant Ambani Radhika Merchant Wedding Live: अनंत-राधिकाच्या शाही विवाह सोहळ्यात 2500 खाद्यपदार्थांची रेलचेल

Anant Ambani Radhika Merchant Wedding Live:  अनंत अंबानी- राधिका मर्चंटच्या शाही विवाह सोहळ्यात मेजवानीचा खास बेत असणार आहे. या विवाह सोहळ्यात 2500  खाद्यपदार्थांची रेलचेल असणार आहे. यातील 100 हून अधिक खाद्यपदार्थ हे  नारळापासून तयार करण्यात येणार आहेत. इंडोनेशियातील एका कॅटरिंग कंपनी हे खाद्यपदार्थ तयार करणार आहेत. त्याशिवाय, 10 आंतरराष्ट्रीय शेफ देखील असणार आहेत. लग्नात काशीतील चाट, मद्रास कॅफेमधील फिल्टर कॉफी देखील असणार आहे. त्याशिवाय, इटालियन आणि युरोपीयन खाद्यपदार्थ असणार आहेत. 

Anant Radhika Wedding Live: व्हीव्हीआयपी पाहुण्यांसाठी महागडे गिफ्टस

Anant Radhika Wedding Live: अनंत-राधिकाच्या शाही विवाह सोहळ्यासाठी देशभरातूनच नव्हे तर जगभरातून अनेक दिग्गज, सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. अंबानी कुटुंबाकडून पाहुण्यांची बडदास्त ठेवली जात आहे. व्हीव्हीआयपी मंडळींसाठी खास महागडं गिफ्ट देण्यात येणार आहे. कोट्यवधी किंमतीचे घड्याळ देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. तर, इतर पाहुण्यांना काश्मीर, राजकोट, बनारस येथून मागवण्यात आलेले गिफ्ट देण्यात येणार आहे. 

Anant Radhika Wedding Live: मनीष मल्होत्राने तयार केलाय, राधिका मर्चंटसाठी खास आउटफिट

Anant Radhika Wedding Live : डिझायनर मनीष मल्होत्रा ​​यांनी नववधू राधिका मर्चंटसाठी खास पोशाख तयार केला आहे. त्यांनी व्हॅनिटी फेअरला सांगितले की त्यांनी राधिकासाठी एक संपूर्ण ‘कलेक्शन’ तयार केले आहे. 

Anant Ambani Radhika Merchant Wedding : VIDEO: राजेशाही थाट, फुलांनी सजला हॉल, त्याला रोषणाईचा साज; अनंत-राधिकाच्या लग्नासाठी कसं सजलं 'जियो वर्ल्ड'?

Anant Ambani Radhika Merchant Wedding : भारतातूनच नव्हे तर जगभरातूनही पाहुणे मंडळी या शाही विवाह सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. विवाह सोहळा ज्या ठिकाणी रंगणार आहे, त्या ठिकाणचा व्हिडीओ समोर आला आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...


Anant Ambani Radhika Merchant Wedding : VIDEO: राजेशाही थाट, फुलांनी सजला हॉल, त्याला रोषणाईचा साज; अनंत-राधिकाच्या लग्नासाठी कसं सजलं 'जियो वर्ल्ड'?

Anant Ambani Radhika Merchant Wedding : भारतातूनच नव्हे तर जगभरातूनही पाहुणे मंडळी या शाही विवाह सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. विवाह सोहळा ज्या ठिकाणी रंगणार आहे, त्या ठिकाणचा व्हिडीओ समोर आला आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...


Anant -Radhika Wedding Mumbai Traffic : अनंत-राधिकाच्या लग्नाची लगबग, मुंबईत VVIP ची वर्दळ; ट्राफिकमधील बदल घ्या जाणून...

Anant -Radhika Wedding Mumbai Traffic : देशभरातून उद्योगपती, व्यावसायिक, सेलिब्रिटी आणि राजकारणी यांची उपस्थिती असणार आहे. याचा परिणाम मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे. वाहतूक व्यवस्थेत मुंबई पोलिसांनी बदल केले आहेत. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.. 


Anant Ambani-Radhika Merchant Wedding: 100 खासगी प्लेन, 3 फाल्कन जेट, 2500 नामवंत पाहुणे, अनंत-राधिका यांच्या लग्नाचा खर्च किती?

Anant Ambani-Radhika Merchant Wedding: 12 जुलै रोजी मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये लग्नाची धामधूम असेल. त्याआधी लग्नाच्या विधी सुरु झाल्या आहेत. सर्व फंक्शन शाही अंदाजात झाले आहेत. पण या लग्नासाठी मुकेश अंबानी किती रुपये खर्च करत आहेत?  सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Anant Ambani-Radhika Merchant Wedding: आली लग्नघटिका समीप! अनंत अंबानी-राधिका मर्चंट कोणत्या पद्धतीने बांधणार लग्नगाठ?

Anant Ambani-Radhika Merchant Wedding: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे आज 12 जुलै रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. या दोघांच्या शाही विवाह सोहळ्यासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे.  सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...


पार्श्वभूमी

Anant Ambani-Radhika Merchant Wedding Live Updates : देशातील आघाडीचे उद्योजक आणि रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानींच्या (Anant Ambani) विवाह सोहळ्यात राजकीय मंडळी उपस्थित राहत आहेत. अनंत अंबानी-राधिका  मर्चंटच्या (Anant Ambani Radhika Merchant) लग्नसोहळ्यात विविध पक्षांच्या नेत्यांसह विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी देखील उपस्थिती लावली. 


मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचा शाही विवाह सोहळा मुंबईत 12 जुलै रोजी पार पडला.  त्याआधी अनंत-राधिकाचा ग्रँड प्री-वेडिंग सोहळा पार पडला होता. गुजरातमधील जामनगरमध्ये  आणि  परदेशात क्रूझवर प्री-वेडिंग फंक्शन पार पडले होते. या सोहळ्यात देश-विदेशातील अनेक  सेलिब्रिटी, राजकारणी, उद्योजक सहभागी झाले होते. आता, या दोघांच्या ग्रँड विवाह सोहळ्यानिमित्ताने देशातील अनेक दिग्गज राजकारणी उपस्थित राहिले. काही मुख्यमंत्री, राजकीय नेत्यांना व्यक्तीश: भेट घेत मुकेश अंबानी यांनी आमंत्रण दिले होते.


अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या विवाह सोहळ्यात राजकीय नेत्यांची गर्दी


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड,  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, आंध्र प्रदेशचे  मुख्यमंत्री  चंद्राबाबू नायडू, आसामचे मुख्यमंत्री हिंमता बिश्वास आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली होती. 


जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडणार विवाह सोहळा 


अनंत-राधिकाचा विवाहसोहळा 12 जुलै रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडला. जिओ वर्ल्ड सेंटर या शाही विवाह सोहळ्यासाठी सज्ज करण्यात आले.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.