Radhika Merchant Bridal Look : गोल्डन लेहेंगा, लाल ओढणी; राधिका मर्चंटचा रॉयल ब्रायडल लूक
Radhika Merchant Bridal Look : राधिका मर्चंटला रॉयल ब्रायडल लूक समोर आला आहे. ज्यामध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.
Anant Ambani Radhika Merchant Wedding : राधिका आणि अनंत अंबानी अवघ्या काही तासांतच सात जन्माच्या बंधनात बांधले जाणार आहे. अनंत आणि राधिकाचा राजेशाही विवाहसोहळा सध्या पार पडत आहे. या स्पेशल दिवसासाठीचा राधिका मर्चंटचा खास लूक समोर आला आहे. नवरी राधिका मर्चंटचा ब्रायडल लूकमधील पहिला फोटो समोर आला आहे. लग्नासाठी राधिकाने गुजराती लूकला पसंती दिली आहे.
View this post on Instagram
सोनेरी लेहेंगा आणि लाल ओढणी असा राधिका मर्चंट गुजराती नववधू लूक पाहायला मिळत आहे. रॉयल ब्राइडल लूकमध्ये राधिका फारच सुंदर दिसत आहे. अनंत अंबानींची वधू राधिका मर्चंटचा ब्रायडल लूक समोर आला आहे. अंबानी कुटुंबातील भावी सुनेने तिच्या खास दिवसासाठी गुजराती वधूचा लूक निवडला आहे. अंबानी आणि मर्चंट दोन्ही कुटुंब गुजराती आहेत. या लग्नाच्या सर्व विधीही गुजराती पद्धतीने पार पडत आहेत. त्यामुळे लूकसाठीही राधिकाने गुजराती स्टाईलला पसंती दिली आहे.
राधिका मर्चंटने गुजराती स्टाईल डिझायनर लेहेंगा परिधान केला आहे. हा लेहेंगा ऑफ व्हाईट आणि गोल्डल कलर कॉम्बिनेशनमध्ये आहे. ऑफ व्हाईट लेहेंग्यावर गोल्डन आणि लाल रंगामध्ये नक्षीकाम केलेलं आहे. यासोबत राधिकाने हेवी ज्वेलरी घातली आहे. लाल रंगाचा चुडा तिच्या हातात फार उठून दिसत आहे. सिंपल मेकअप अन रेड लिपस्टिकने तिने हा लूक पूर्ण केला आहे.
View this post on Instagram
यासोबतच राधिकाने अतिशय सुंदर लाल रंगाची ओढणी घेतली आहे. राधिकाचा संपूर्ण लूक अतिशय रॉयल असल्याचं दिसून येत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :