एक्स्प्लोर

100 खासगी प्लेन, 3 फाल्कन जेट, 2500 नामवंत पाहुणे, अनंत-राधिका यांच्या लग्नाचा खर्च किती? 

Anant Ambani-Radhika Merchant Wedding : 12 जुलै रोजी मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये लग्नाची धामधूम असेल. त्याआधी लग्नाच्या विधी सुरु झाल्या आहेत. सर्व फंक्शन शाही अंदाजात झाले आहेत. पण या लग्नासाठी मुकेश अंबानी किती रुपये खर्च करत आहेत?  

Anant Ambani-Radhika Merchant Wedding Cost : आघाडीचे उद्योजक आणि रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचा शाही विवाह सोहळा (Anant Ambani-Radhika Merchant Wedding) मुंबईत पार पडणार आहे. शुक्रवारी, 12 जुलै रोजी मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये लग्नाची धामधूम असेल. त्याआधी लग्नाच्या विधी सुरु झाल्या आहेत. सर्व फंक्शन शाही अंदाजात झाले आहेत. पण या लग्नासाठी मुकेश अंबानी किती रुपये खर्च करत आहेत?  

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्नाआधी सर्व विधी झाल्या आहेत. आतापर्यंत संगीत, हळदी, साखरपुडा, ग्रँड प्री-वेडिंग सोहळा यासारखे कार्यक्रम पार पडले आहेत. या सोहळ्यात देश-विदेशातील अनेक  सेलिब्रिटी, राजकारणी, उद्योजक सहभागी झाले होते. प्रसिद्ध कॅनेडियन पॉप गायक  जस्टिन बीबर (Justin Bieber In Mumba) यानं फरफॉर्म करत उपस्थित पाहुण्यांचं मनोरंजन केले. 12 जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट विवाहबंधनात अडकणार आहेत. 13 जुलै रोजी शुभ आशीर्वादचा कार्यक्रम आहे.  ज्येष्ठ मंडळी सहभागी होऊन नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देतील. या ग्रॅण्ड वेडिंगचे ग्रॅण्ड रिसेप्शन 14 जुलै रोजी आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये देशातील आणि जगातील बड्या व्यक्ती सहभागी होणार आहे

शाही लग्नात 350 मिलियन डॉलरचा खर्च !

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या शाही विवाहसोहळ्यासाठी 250 पेक्षा जास्त नामंवत पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आलेय. पाहुण्यांना येण्या-जाण्यासाठी अंबानी कुटुंबांने तीन फाल्कन-2000 जेट रेंटवर घेतले आहेत. या कार्यक्रमासाठी 100 हून अधिक खासगी विमाने वापरण्यात येऊ शकतात, असे क्लब वन एअरचे सीईओ राजन मेहरा यांनी हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना सांगितले.  डेली मेलच्या रिपोर्टनुसार, अनंत अंबानींच्या या शाही लग्नासाठी मुकेश अंबानींनी 350 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 2500 कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च केली आहे.  

विवाह सोहळ्यात कोण उपस्थित राहणार?

ग्रँड विवाह सोहळ्यानिमित्ताने देशातील अनेक दिग्गज राजकारणी उपस्थित राहणार आहेत. काही मुख्यमंत्री, राजकीय नेत्यांना व्यक्तीश: भेट घेत मुकेश  अंबानी यांनी आमंत्रण दिले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड,  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, आंध्र प्रदेशचे  मुख्यमंत्री  चंद्राबाबू नायडू, आसामचे मुख्यमंत्री हिंमता बिश्वास आदी उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय, केंद्रीय मंत्री यांच्यासह विविध देशांचे राजनयिक उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. 

प्री-वेडिंगमध्ये 1200 पाहुण्यांची उपस्थिती -

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्नाआधी दोन प्री-वेडिंग फंक्शन्स झाले होते. गुजरातमधील जामनगर येथे पहिला कार्यक्रम पार पडला होता. ज्यामध्ये 1200 पाहुणे उपस्थित होते. मेटाचे मार्क झुकेरबर्ग, मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स आणि इवांका ट्रम्प यांसारखे परदेशातील श्रीमंत लोकही सहभागी झाले होते. पॉप सिंगर रिहानानेही आपला परफॉर्मन्स या कार्यक्रमात केला होता. 3 दिवस चाललेल्या या प्री-वेडिंग फंक्शनला बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांनीही हजेरी लावली.

अनंत अंबानी आणि राधिका यांचे दुसरे प्री-वेडिंग इटली आणि फ्रान्स दरम्यानच्या क्रूझवर झाले. बॅकस्ट्रीट बॉईज, कॅटी पेरी आणि अँड्रिया बोसेली यांनी 800 हून अधिक पाहुण्यांनी हजेरी लावली होती.  

आणखी वाचा :

Anant -Radhika Wedding Mumbai Traffic : अनंत-राधिकाच्या लग्नाची लगबग, मुंबईत VVIP ची वर्दळ; ट्राफिकमधील बदल घ्या जाणून...

Anant Ambani-Radhika Merchant Wedding : अनंत-राधिकाच्या लग्नाला VVIP मंडळींची मांदियाळी, विविध राज्यांचे मुख्यमंत्री हजेरी लावणार

नामदेव कुंभार हे मागील नऊ ते दहा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. क्रीडा, राजकारण, समाजकारण, शेती, चित्रपट, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये आवड आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली

व्हिडीओ

Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Embed widget