भारतातलं शाही लग्न ! अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या भव्य विवाहसोहळ्याला एक वर्ष पूर्ण; आठवणींना उजाळा
Anant Ambani Radhika merchant wedding anniversary:आज त्या ऐतिहासिक विवाहाला एक वर्ष पूर्ण होतंय आणि पहिल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करताना पुन्हा एकदा त्या भव्य क्षणांच्या आठवणींना उजाळा दिला जातोय .

Anant Ambani Radhika merchant wedding anniversary: 12 जुलै 2024. मुंबईच्या भव्य जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेला अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा हा केवळ एका जोडप्याच्या आयुष्यातला खास दिवस नव्हता, तर तो भारताच्या सांस्कृतिक वैभवाचा, पारंपरिक परंपरांचा आणि आधुनिकतेच्या मिश्रणाचा साक्षात्कार होता. आज त्या ऐतिहासिक विवाहाला एक वर्ष पूर्ण होतंय आणि पहिल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करताना पुन्हा एकदा त्या भव्य क्षणांच्या आठवणींना उजाळा दिला जातोय .
जगाने पाहिलं भारताचं ‘रॉयल वेडिंग’
मुकेश आणि नीता अंबानी यांचा धाकटा पुत्र अनंत आणि वीरेन व शीला मर्चंट यांची कन्या राधिका यांचा विवाह म्हणजे फक्त सेलिब्रिटींचा मेळा नव्हता, तर तो एका पिढीला परिभाषित करणारा उत्सव ठरला. लाखो डोळ्यांचे लक्ष या विवाहाकडे लागले होते. भारतातील प्रतिष्ठित व्यक्तींपासून ते आंतरराष्ट्रीय राजकारणी आणि सेलिब्रिटींपर्यंत अनेक दिग्गजांनी या समारंभाला उपस्थिती लावली.
सेलिब्रेटिंची उपस्थिती
बॉलीवूडचे खान – शाहरुख, सलमान, अमिताभ बच्चन, प्रियांका चोप्रा यांच्यासह हॉलीवूडची कार्दशियन भगिनी – किम आणि क्लो, तसेच जॉन केरी, टोनी ब्लेअर, बोरिस जॉन्सन यांची उपस्थिती या सोहळ्याला केवळ राष्ट्रीय नाही, तर आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त करून देणारी ठरली. या लग्नाने ग्लोबल स्टेजवर भारताच्या पारंपरिक लग्नसंस्कारांची ओळख नव्याने करून दिली.
बनारसच्या चवीनं पाहुण्यांचं मन जिंकलं
या शाही विवाहात जेवणही तितकंच खास होतं. विविध भारतीय खाद्यपदार्थांचा आस्वाद पाहुण्यांना मिळावा, यासाठी खास वाराणसीहून ‘काशी चाट भंडार’ला पाचारण करण्यात आलं. नीता अंबानी यांनी स्वतः २४ जून रोजी या प्रसिद्ध ठिकाणाला भेट दिली होती आणि तिथल्या चविष्ट टिक्की चाट, टोमॅटो चाट, पालक चाट आणि कुल्फी फालुद्याचा आस्वाद घेतला होता.
काशी चाट भंडारचे मालक राकेश केशरी यांनी ANI ला सांगितलं की, “नीता अंबानी आमच्या दुकानात आल्या, त्यांनी चाट खाल्ली आणि खूप खूश झाल्या. त्यांनी म्हटलं की बनारसची चाट प्रसिद्ध आहे आणि तिला वाढवणं ही अभिमानाची गोष्ट आहे.” मेनूमध्ये चना कचोरी, दही पुरी, टोमॅटो चाट, पालक चाट आणि पारंपरिक कुल्फी फालुदा यांसारखे पदार्थ पाहुण्यांच्या जिभेवर लज्जतदार चव सोडून गेले.
सांस्कृतिक परंपरा आणि आधुनिकतेचा मिलाफ
या विवाहसोहळ्याला केवळ लग्न मानता येणार नाही, तो भारताच्या सांस्कृतिक आणि सामाजिक समृद्धतेचं प्रतीक ठरला. भारतीय परंपरांना साजेसं वैवाहिक विधी आणि एकाच वेळी आधुनिक डिझाईन, कलात्मक सादरीकरण, ग्लॅमर आणि ग्लोबलायझेशनचा मिलाफ – या सगळ्याच गोष्टींनी या विवाहसोहळ्याला ‘शाही’ बनवलं.
न्यू यॉर्क टाईम्सने या विवाहाचं वर्णन करताना लिहिलं की, “या विवाहाने जगाला भारताच्या नव्या सुवर्णयुगाची ओळख करून दिली.” केवळ एक लग्न नव्हे, तर ते एका संपूर्ण राष्ट्राच्या आत्मविश्वासाचं आणि ओळखीचं प्रतिबिंब ठरलं.
एक वर्ष उलटूनही राहिलेली आठवण
आज, एक वर्षानंतर, अनंत आणि राधिका यांनी त्यांचा पहिला दिन साजरा करताना या खास क्षणांना उजाळा दिला आहे. हा वाढदिवस केवळ एक खास दिवशीच नाही, तर त्या सर्व आठवणींमध्ये आहे ज्यांनी ‘भारतीय लग्न’ या संकल्पनेला नव्यानं परिभाषित केलं. रंग, उत्साह, प्रेम, परंपरा आणि गर्व – या साऱ्यांचं मिश्रण असलेल्या त्या विवाहाने एक असा ठसा उमटवला की तो अजूनही लोकांच्या मनात जिवंत आहे.
हा विवाहसोहळा हा एक सामूहिक आनंदाचा सोहळा ठरला – अस्सल भारतीयतेचा अभिमान बाळगणारा आणि जागतिक स्तरावर आपली सांस्कृतिक समृद्धी ठळकपणे दाखवणारा. भारताने या लग्नाद्वारे जगाला एक गोष्ट सांगितली – आपली संस्कृती केवळ भूतकाळात रमणारी नाही, तर ती आजही जितकी भव्य आहे, तितकीच आधुनिक आणि वैश्विकही आहे.



















