(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Radhika Merchant : राधिकाच्या ओढणीवर तब्बल एवढ्या किंमतीचा 'मोगरा फुलला'; अंबानींच्या सुनेचा थाटच न्यारा
राधिकाच्या हळदीच्या लूकची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. दरम्यान तिच्या हळदीच्या लूकसाठी तिने घेतलेल्या ओढणीने विशेष लक्ष वेधून घेतलं आहे.
Radhika Merchant-Anant Ambani Wedding : शाही थाट, आलिशान पेहराव या सगळ्याच गोष्टी सध्या एका रॉयल लग्नात सगळ्यांना पाहायला मिळत आहे. मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांच्या धाकटा लेक अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांच्या लग्नाची तयारीने जगभरातील लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दोन प्री वेडिंग, संगीत, हळद या सगळ्याच सोहळ्यांना राजकीय नेत्यांपासून ते बॉलीवूडच्या कलाकारापर्यंत हजेरी लावली जातेय. नुकतच अनंत आणि राधिकचा हळदी सोहळा पार पडला.
या लग्नसराईतली प्रत्येक गोष्ट बरीच चर्चेचा विषय ठरतेय. त्यातच राधिकाचे ड्रेस हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा विषय ठरतोय. जवळपास कोट्यवधी रुपयांचे ड्रेस राधिका तिच्या लग्नाच्या समारंभासाठी घालतेय. पण सगळ्यात विशेष लक्ष वेधून घेतलं ते तिच्या हळदीच्या लूकने. अगदी सोज्वळ असं सोंदर्य साऱ्यांच्याच पसंतीस पडत आहे. या लूकसाठी तिने खास खऱ्या फुलांची निवड केली होती. त्यामुळे तिच्या या लूकच्या किंमतीची अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे.
राधिकाच्या हळदी लूकची चर्चा
राधिकाने तिच्या हळदी लूकसाठी पिवळ्या लेहंग्याची निवड केली होती. विशेष म्हणजे यावर तिने खऱ्या मोगऱ्यांच्या कळीची ओढणी परिधान केली होती. त्या ओढणीला खऱ्या झेंडूच्या फुलांचा काठ होता. त्याचप्रमाणे तिने खऱ्या फुलांचे दागिने देखील परिधान केले होते. इंडिया टाईम्सच्या वृत्तानुसार तिच्या या खास ओढणीसाठी जवळपास 1000 मोगऱ्याच्या कळींचा वापर केला आहे. त्याचप्रमाणे 90 च्या आसपास खऱ्या झेंडूची फुलं वापरण्यात आली आहे.
राधिकाच्या ओढणीची किंमत किती?
राधिकाने जी ओढणी घेतली आहे, त्याची साधारण किंमत ही 15 हजारांपासून सुरु होते. हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तानुसार, तिच्या फुलांच्या दागिन्यासह या ओढणीची किंमत सर्वसाधारणपणे 27,000 हजारांच्या आसपास असू शकते. दरम्यान तिच्या फक्त ओढणीची किंमत ही 30,000 हजारांच्या आसपास आहे. त्यामुळे सध्या राधिकाची ओढणी हा बराच चर्चेचा विषय ठरला आहे.
View this post on Instagram