एक्स्प्लोर

Maharaj Movie : आमिरच्या लेकाचा पहिलाच सिनेमा हिट, 'महाराज'विषयी दिग्दर्शक सिद्धार्थ मल्होत्रा म्हणाला...

Maharaj Movie : महाराज सिनेमाचा दिग्दर्शक सिद्धार्थ मल्होत्राने महाराज सिनेमा हिट झाल्यानंतरच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

Maharaj Movie : सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth  P Malhotra) दिग्दर्शित 'महाराज' (Maharaj) हा सिनेमा आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगलाच हिट झाला आहे. नेटफ्लिक्स आणि वायआरएफ एंटरटेनमेंटच्या पहिल्याच सिनेमाला प्रेक्षकांनी अगदी भरभरुन प्रेम दिलं. अनेक देशांमध्ये दोन आठवड्यांपासून नॉन-इंग्लिश टॉप टेन लिस्टमध्ये हा सिनेमा तिसऱ्या स्थानावर आहे. आमिर खानचा (Aamir Khan) लेक जुनैद खान या सिनेमा मुख्य भूमिकेत आहे. 

महाराज हा सिनेमा 21 जून रोजी नेटफिक्सवर प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये  जयदीप अहलावत, शालिनी पांडे आणि शर्वरी वाघ यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. सिद्धार्थ मल्होत्रा दिग्दर्शित हिचकी हा सिनेमा देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. या सिनेमात राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत आहे. हा सिनेमा देखील जागतिक स्तरावर हिट ठरला आणि या सिनेमाने 235 कोटींचा गल्ला जमवला. 

महाराजविषयी सिद्धार्थनं काय म्हटलं?

महाराजच्या यशाविषयी सिद्धार्थनं म्हटलं की, एक निर्माता म्हणून मी महाराज आणि हिचकी या दोन्ही सिनेमांमधून मानवी संघर्षाच्या कथा सांगण्यचा प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे या दोन्ही सिनेमांनी भारतातून जागतिक स्तरावर यश मिळवलंय. मी सगळ्या प्रेक्षकांचेही आभार मानतो की त्यांनी महाराज सिनेमावर इतकं प्रेम केलं. या सिनेमातून आम्ही भारताच्या एका महान समाजसुधारक करसनदास मुळजींचा सन्मान करण्याचा प्रयत्न केला आहे. 

पुढे त्याने म्हटलं की, एखादा सिनेमा अनेक देशांमध्ये हिट होणं ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे आणि मी हा क्षण माझ्या संपूर्ण टीमसोबत साजरा करतोय. आम्ही खूप मनापासून हा सिनेमा बनवला आहे आणि मला याचा आनंद होतोय की अनेकांच्या मनाला हा सिनेमा स्पर्शून जातोय. 

'महाराज'ची कथा काय?

'महाराज' हा चित्रपट एका सत्यकथेवर आधारित असून त्यात जुनैदसोबत जयदीप अहलावतची भूमिका आहे. हा चित्रपट 1862 च्या महाराज लिबेल केसवर आधारित आहे. हे प्रकरण भारतातील सर्वात महत्त्वाच्या कायदेशीर लढाईपैकी एक समजले जाते. चित्रपटात जुनैदने पत्रकार आणि समाजसुधारक करसनदास मुलजीची भूमिका साकारली आहे. तर अहलावतने वल्लभाचार्य पंथाचे प्रमुख जदुनाथजी बृजरतनजी महाराज यांची भूमिका साकारली आहे.                                                                      

ही बातमी वाचा : 

Mirzapur Season 4 :  'मुन्ना भैय्या'च्या एन्ट्रीचा मार्ग मोकळा! कसं होणार धमाकेदार कमबॅक? जाणून घ्या सविस्तर 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सलीम खान यांच्यावर कोणतीही शस्त्रक्रिया नाही, लीलावतीच्या डॉक्टरांची स्पष्टोक्ती, प्रकृती चिंताजनक, अजूनही व्हेंटिलेटरवर
सलीम खान यांच्यावर कोणतीही शस्त्रक्रिया नाही, लीलावतीच्या डॉक्टरांची स्पष्टोक्ती, प्रकृती चिंताजनक, अजूनही व्हेंटिलेटरवर
तुरुंगाबाहेर येताच राजपाल यादवची पहिली प्रतिक्रिया; सांगितला 11 दिवसांचा दिनचर्य, सकाळी अभिनेता काय करत होता?
तुरुंगाबाहेर येताच राजपाल यादवची पहिली प्रतिक्रिया; सांगितला 11 दिवसांचा दिनचर्य, सकाळी अभिनेता काय करत होता?
सलीम खान यांना हॉस्पिटलमध्ये दाखल का करण्यात आलं? त्यांची आता प्रकृती कशी? मोठी अपडेट समोर
सलीम खान यांना हॉस्पिटलमध्ये दाखल का करण्यात आलं? त्यांची आता प्रकृती कशी? मोठी अपडेट समोर
Rajpal Yadav News: राजपाल यादवला 5 कोटी रुपयांचे कर्ज दिले; कोण आहेत उद्योगपती माधव गोपाल अग्रवाल?
राजपाल यादवला 5 कोटी रुपयांचे कर्ज दिले; कोण आहेत उद्योगपती माधव गोपाल अग्रवाल?

व्हिडीओ

Mulund Metro Slab  : मुलुंडमधील मेट्रो स्लॅब अपघात प्रकरण, 2 कंपन्याना काळ्या यादीत टाकणार
Sanjay Raut PC : अजितदादांची 'ती' फाईल ते अमित शाहांवर निशाणा, राऊतांची स्फोटक पत्रकार परिषद
Asawari Jagdale Pune : एबीपी माझाच्या बातमीनंतर आसावरी जगदाळे यांना नोकरी मिळाली
Malegaon Tipu Sultan : टिपू सुलतानचा फोटो संविधानात आहे हे भाजपला माहितच नाही
Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ishan Kishan: मैदानात फटके देताच अन् इशान किशनची गर्लफ्रेंड सुद्धा पहिल्यांदाच समोर येताच पाकिस्तानमध्ये गेल्या तीन दिवसांपासून भलताच सर्च ट्रेंड समोर
मैदानात फटके देताच अन् इशान किशनची गर्लफ्रेंड सुद्धा पहिल्यांदाच समोर येताच पाकिस्तानमध्ये गेल्या तीन दिवसांपासून भलताच सर्च ट्रेंड समोर
आमचे प्रेमसंबंध, जबरदस्ती नव्हे, मी मर्जीने आले, भिगवणच्या तरुणीचा VIDEO समोर, अपहरण नाट्यात ट्विस्ट!
आमचे प्रेमसंबंध, जबरदस्ती नव्हे, मी मर्जीने आले, भिगवणच्या तरुणीचा VIDEO समोर, अपहरण नाट्यात ट्विस्ट!
Share Market Update: शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 283 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 1.8 लाख कोटींची कमाई   
शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 283 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 1.8 लाख कोटींची कमाई   
Raj Thackeray Meets Eknath Shinde: राज ठाकरे थेट भाईंच्या भेटीला ठाण्यातील नंदनवनात पोहोचले, कोणता 'मनसे' शब्द दिला? भेटीचा तपशील समोर
राज ठाकरे थेट भाईंच्या भेटीला ठाण्यातील नंदनवनात पोहोचले, कोणता 'मनसे' शब्द दिला? भेटीचा तपशील समोर
Crime News: दिवा लावून सात फेरे घेतले; पॉवरच्या गोळ्या घेऊन बनला हैवान, गर्लफ्रेंडचा जीव घेतल्यानंतरही थांबला नाही, मृतदेहासोबत अत्याचार केलेल्या पियूषचा खळबळजनक दावा
दिवा लावून सात फेरे घेतले; पॉवरच्या गोळ्या घेऊन बनला हैवान, गर्लफ्रेंडचा जीव घेतल्यानंतरही थांबला नाही, मृतदेहासोबत अत्याचार केलेल्या पियूषचा खळबळजनक दावा
Satara : साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सत्ता स्थापन करणार, एकनाथ शिंदेंचा ग्रीन सिग्नल, मकरंद पाटील-शंभूराज देसाईंच्या भेटीत निर्णय 
मकरंद पाटील- शंभूराज देसाईंंच्या भेटीत एकनाथ शिंदेंचा ग्रीन सिग्नल, सातारा जिल्हा परिषदेवर शिवसेना- राष्ट्रवादीची सत्ता येणार
Rohit Pawar and Naresh Arora: माझ्या काकाला काय झालंय हे शोधण्याचं वेड मला लागलंय, कॅश बॉक्सवाल्यांनो 'रोक सके तो रोक लो', रोहित पवारांचा नरेश अरोरांवर हल्लाबोल
रोहित पवारांचा नरेश अरोरांना इशारा, म्हणाले, 'मला माझ्या काकाला काय झालंय हे शोधण्याचं वेड लागलंय, तुला किती पैसा....'
Pune Crime News: बुधवार पेठेत पोलिसांची छापेमारी; सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ११ बांगलादेशी महिला, दलालांसह कुंटणखाना चालवणाऱ्यांविरोधात कारवाईचा दिला आयुक्तांनी इशारा
बुधवार पेठेत पोलिसांची छापेमारी; सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ११ बांगलादेशी महिला, दलालांसह कुंटणखाना चालवणाऱ्यांविरोधात कारवाईचा दिला आयुक्तांनी इशारा
Embed widget