एक्स्प्लोर
Amruta Subhash : आईने ते नाव लावायला सुरुवात केली, मोहन गोखलेंही त्याचं माधुर्य सांगितलं मग..., अभिनेत्रीने सांगितलं 'अमृता सुभाष' या नावामागचं कारण
Amruta Subhash : अभिनेत्री अमृता सुभाष हीने तिच्या आडनावाविषयी एका मुलाखती दरम्यान भाष्य केलं आहे.
Amruta Subhash : सिनेसृष्टीत काम करताना अनेक कलाकार त्यांच्या आईचं नाव लावतात, काही जण त्यांच्या आई वडिलांचं नाव आडनाव म्हणून वापरतात. ललित प्रभाकर (Lalit Prabhakar), सायली संजीव (Sayli Sanjeev), रसिका सुनील (Rasika Sunil) आणि अमृता सुभाष (Amruta Subhash) हे कलाकार त्यांचं आडनाव म्हणून त्यंच्या वडिलांचं नाव लावतात. अभिनेत्री अमृता सुभाष हीने तिच्या या आडवनाविषयी नुकतच एका मुलाखतीदरम्यान भाष्य केलं. सौमित्र पोटे यांच्या मित्र म्हणे या पॉडकास्टमध्ये तिच्या आडनावाविषयी सांगितलं आहे.
मराठीसह अमृताने हिंदी आणि ओटीटी माध्यमांवरही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. तिच्या इंटिमेट सीन्समुळे ती बरीच चर्चेत आली होती. तिच्या आयुष्यातील पहिल्या इंटिमेट सीनविषयी आणि तेव्हा तिचा नवरा संदेश कुलकर्णी याला तिने केलेल्या फोन कॉलविषयीचे अनुभव सांगितले आहे. तसेच दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव यावेळी अमृताने शेअर केला. नुकतीच तिची 'लस्ट स्टोरीज 2' (Lust Stories 2) ही सिरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
मोहन गोखलेंनी त्या नावाचं माधुर्य सांगितलं
पुरुषोत्तम करंडकला मोहन गोखले परिक्षक होते. पहिल्या वर्षी मला यशवंत स्वराभिनय पुरस्कार जो तुमच्या वाणीसाठी पुरस्कार असतो, तो मिळाला. त्यावेळी मोहन गोखले यांनी भाषणात म्हटलं की, अमृताचं काय सांगावं ती अम्-ऋता आणि सु-भाष असल्यामुळे तिला हा पुरस्कार दिला. त्यावेळी मला असं वाटलं की मी ज्योति सुभाष यांची मुलगी आहे, त्यामुळे मला हा पुरस्कार मिळाला असं मला वाटलं. कार्यक्रम झाल्यानंतर मी त्यांच्याकडे तडतड करत गेले. मी त्यांना विचारलं की, मी अमृता सुभाष आहे म्हणून तुम्ही मला हा पुरस्कार दिलात का? तेव्हा त्यांनी म्हटलं की, अगं तुला या शब्दाचा अर्थ नाही का कळाला. हा एक संस्कृत अर्थ आहे. अमृतासारखी सुंदर वाणी असा त्याचा अर्थ आहे. तेव्हा मी त्यांना सॉरी म्हटलं. त्यामुळे या नावाचं माधुर्य मला त्यांच्यामुळे कळालं.
आमचं आडनाव चुकीचं उच्चारलं जायचं
आईने ज्योती सुभाष हे नाव लावायला सुरुवात केली. कारण आमचं आडनाव नीट उच्चारलं नाही जायंच. आमचं ढेंमरे असं आडनाव आहे. अभाविपचं नाट्यस्पर्धा होती. त्यावेळी मी त्यामध्ये पुरुषाचा रोल केला होता. मला त्यामध्ये पहिलं बक्षिसही मिळालं. पण माझं नाव तेव्हा ढेबे अमृता असं उच्चारलं. त्यानंतर पुन्हा त्यांनी चुकीचा उच्चार व्हायला लागला. त्यानंतर नेहमीच त्या नावाचा अपभ्रंश होऊ लागला. त्यामुळे मी मग आईने ज्याती सुभाष केल्यानंतर मी अमृता सुभाष केलं.
ही बातमी वाचा :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
क्रीडा
विश्व
Advertisement