(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Marathi Actor : मराठी सिनेसृष्टीतल्या दोन नामवंत कलाकारांचं अपहरण, नेमकं प्रकरण काय?
Marathi Actor : अमृता खानविलकर आणि संकर्षण कऱ्हाडे यांचं अपहरण झालं असून हे नेमकं प्रकरण काय आहे याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.
Amruta Khanvilkar and Sankarshan Karhade : झी मराठीवर 3 जूनला संध्याकाळी एक ब्रेकिंग न्यूज प्रसारित झाली, ती म्हणजे दोन नामवंत कलाकारांच्या अपहरणाबद्दल. संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) आणि अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) या दोघांचं अपहरण झालंय. संकर्षण एका जाहिरातीसाठी शूट करत असताना त्याला त्याचवेळी एका वाहनात टाकून नेण्यात आलं. तर दुसरीकडे अमृताला आपल्या व्हॅनिटी मधून बाहेर पडताच तिचे चाहते आणि बॉडीगार्डच्या उपस्थितीत किडनॅप केले गेले. ह्या दोन नामवंत कलाकारांना कुठे आणल गेलंय, खरंच हे दोघांचं अपहरण झालंय की हा कोणता नवीन ड्रामा आहे.
दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच अनेकांनी त्यावर कमेंट्स करायला सुरुवात केली. त्याचप्रमाणे हे सगळं काय असणार याची देखील उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे. त्यामुळे यामागे नेमकं कारण काय असणार आहे याची देखील उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे. दरम्यान या दोघांची नवी मालिका तर येणार नाही असे देखील प्रश्न अनेकांना पडले आहेत.
View this post on Instagram
संकर्षण कऱ्हाडेच्या कामाबद्दल
संकर्षण कऱ्हाडेने 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshingath), 'खुलता कळी खुलेना' (Khulta Kali Khulena) या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच 'वेडिंगचा शिनेमा' या सिनेमात तो महत्त्वाच्या भूमिकेत होता. 'महाराष्ट्राची किचन क्वीन' (Maharashtrachi Kitchen Queen)हा त्याचा कुंकिग शो आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
अमृता खानविलकरच्या कामाबद्दल
अमृताने आजवर तिच्या अभिनयाने आणि नृत्याने चाहत्यांना घायाळ केलं आहे. अमृताचे अनेक सिनेमे गाजले आहे. 'कट्यार काळजा घुसली', 'शाळा', 'साडे माडे तीन', 'चोरीचा मामला' आणि 'चंद्रमुखी' या मराठी सिनेमांसह तिने 'राझी', सत्यमेव जयते आणि 'मलंग' सारख्या हिंदी सिनेमांतदेखील आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. अमृताचा 'चंद्रमुखी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या सिनेमातील अमृताच्या कामाचे प्रचंड कौतुक झाले. या सिनेमात अमृता चंद्राच्या भूमिकेत होती.