Amruta Khanvilkar Amey Wagh : आपण शोधायचं का रोहित चौहानला? अमृता खानविलकर-अमेय वाघची हाक, काय आहे प्रकरण?
Amruta Khanvilkar Amey Wagh : अभिनेत्री अमृता खानविलकर, अभिनेता अमेय वाघ यांच्यासह काही कलाकारांनी आपण शोधायचं का रोहित चौहानला? असा प्रश्न विचारला आहे. जे व्हायरल नाही ते खरं कशावरून? असा प्रश्नही या कलाकार मंडळींनी केला आहे.
Amruta Khanvilkar Amey Wagh : सध्या सोशल मीडियावर 'आपण शोधायचं का रोहित चौहानला?' हा प्रश्न विचारला जात आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar), अभिनेता अमेय वाघ (Amey Wagh) यांच्यासह इतर काही कलाकारांनी आपण शोधायचं का रोहित चौहानला? असा प्रश्न विचारला आहे. जे व्हायरल नाही ते खरं कशावरून? असा प्रश्नही या कलाकार मंडळींनी केला आहे. मात्र, हा प्रश्न एका चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग असल्याचे समोर आले आहे.
हॅशटॅग, लाईक, शेअर, सबस्क्राईब हे शब्द हल्लीच्या जीवनातील अविभाज्य भाग बनले आहेत. याच धाटणीवर आधारित 'लाईक आणि सबस्क्राईब' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाची सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली आहे. येत्या 11 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मोशन पोस्टरमध्ये 'आपण शोधायचं का रोहित चौहानला? ' असा प्रश्न विचारण्यात आला असून हा रोहित चौहान नक्की कोण आणि त्याचा 'लाईक आणि सबस्क्राईब'शी काय संबंध? हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहे.
View this post on Instagram
चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक मेरुकर यांनी सांगितले की, "सोशल मीडिया सध्या सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय झाला आहे. 'लाईक आणि सबस्क्राईब ' या दोन क्रीया आपण रोजच्या जीवनात करतच असतो. अगदी वयस्कांपासून लहान मुलांच्या तोंडी हे शब्द सर्रास असतात. अनेकांना प्रश्न पडला असेल, की हे 'लाईक आणि सबस्क्राईब', रोहित चौहान काय प्रकरण आहे, तर याचा उलगडा 11 ऑक्टोबर रोजीच होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चित्रपट रहस्यपट?
मोशन पोस्टरच्या पहिल्या झलकमध्ये हा चित्रपट रहस्यपट असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना रोहित चौहानला जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता लागली आहे.
चित्रपटात कोणते कलाकार?
नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत, एस. एन. प्रॉडक्शन्स एलएलपी आणि अभिषेक मेरूकर प्रॉडक्शन्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती नितीन प्रकाश वैद्य, अभिषेक मेरूकर यांनी केली आहे. 'लाईक आणि सबस्क्राईब'चे लेखन आणि दिग्दर्शन अभिषेक मेरूकर यांनी केले आहे.
चित्रपटात अमेय वाघ, अमृता खानविलकर, शुभंकर तावडे, विठ्ठल काळे, जुई भागवत अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.