Tu Tevha Tashi : 'तू तेव्हा तशी' मालिकेत नवा ट्विस्ट; कॉलेज रियुनियन ठरणार निर्णायक
Tu Tevha Tashi : 'तू तेव्हा तशी' मालिकेत आता नवा ट्विस्ट येणार आहे.

Tu Tevha Tashi : 'तू तेव्हा तशी' (Tu Tevha Tashi) ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांची आवडती मालिका ठरली आहे. ही मालिका आता एका विलक्षण वळणावर आली आहे. सौरभच्या मनातील भावना तो अनामिकासमोर व्यक्त करू शकेल का? याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. कॉलेजचं रियुनियन त्यासाठी निर्णायक ठरणार आहे.
कॉलेजच्या रियुनियनची सध्या जोरदार तयारी चालू असल्याचं प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळत आहे. सौरभ अनामिकाला अजुन काही क्लु देतो. अनामिका काही त्या मुलीला ओळखु शकत नाही. सौरभ या सगळ्याचा आनंद घेत आहे.
सौरभ अनामिकासमोर मनातल्या भावना बोलून दाखवणार
मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना रियुनियन पाहायला मिळणार आहे. सगळे मित्र अनेक वर्षांनंतर भेटतात. प्रत्येक मुलीमध्ये अनामिका तिला शोधण्याचा प्रयत्न करते. पण तिला यश मिळत नाही. इकडे वल्ली या रियुनियनला पोहोचते आणि सौरभ अनामिकासमोर त्याच्या मनातील गोष्ट बोलु नये यासाठी तिचे प्रयत्न सुरू होतात. ती सौरभला गुंगीचं औषध देते. त्या औषधाचा परिणाम काही काळ राहतो पण सौरभ अनामिका समोर त्याच्या मनातील भावना बोलुन दाखवतो. ती मुलगी अनामिकाच आहे हे अनामिकाला कळणार आहे पण अनामिका सौरभच्या भावनांचा स्वीकार करेल का? हे पाहणं रंजक ठरेल.
पहिल्या प्रेमाचं आपल्या आयुष्यात खूप खास स्थान असतं आणि त्या पहिल्या प्रेमाच्या आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात आयुष्यभर साठलेल्या असतात. अशातही जर ते पहिलं प्रेम व्यक्त करायचं राहून गेलं असेल तर? अशाच अव्यक्त प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांना ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.
'तू तेव्हा तशी' मालिकेचे शीर्षक गीत चर्चेत
मालिकेसोबतच मालिकेच्या शीर्षक गीताची देखील सोशल मीडियावर चर्चा आहे. 'तू तेव्हा तशी' मालिकेच्या शीर्षक गीताचे शब्द अभिषेक खणकर यांचे असून अभय जोधपूरकरने ते गायलं आहे. हे शीर्षक गीत संगीतकार समीर सप्तीसकरने संगीतबद्ध केलं आहे. स्वप्निलने एकापेक्षा एक असे मराठी हिट सिनेमे दिले आहेत. याशिवाय तो आता छोट्या पडद्यावर परीक्षकाच्या भूमिकेत देखील दिसतो. वेबसिरीज, सिनेमा, मालिका, नाटक या सर्व माध्यमात त्याने काम केलं आहे. पण आता 'तू तेव्हा तशी' मालिकेच्या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याने त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे.
संबंधित बातम्या
Tu Tevha Tashi : 'तू तेव्हा तशी' मालिकेतील कलाकारांनी हापूस आंब्यावर मारला ताव; केली हापूस पार्टी
Maha Episodes : राया कृष्णाला पुन्हा विधातेंच्या घरात आणणार, तर सौरभच्या वाड्यात रामनवमी साजरी होणार!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
