Tu Tevha Tashi : 'तू तेव्हा तशी' मालिकेतील कलाकारांनी हापूस आंब्यावर मारला ताव; केली हापूस पार्टी
Tu Tevha Tashi : 'तू तेव्हा तशी' मालिकेच्या आगामी भागात हापूस पार्टी होणार आहे.
![Tu Tevha Tashi : 'तू तेव्हा तशी' मालिकेतील कलाकारांनी हापूस आंब्यावर मारला ताव; केली हापूस पार्टी The actors in the serial Tu Tevha Tashi did hapus party in serial Tu Tevha Tashi : 'तू तेव्हा तशी' मालिकेतील कलाकारांनी हापूस आंब्यावर मारला ताव; केली हापूस पार्टी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/24/d149cc2e99102ce20799035c7f1995ab_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Tu Tevha Tashi : 'तू तेव्हा तशी' (Tu Tevha Tashi) या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. या मालिकेतील सौरभ आणि अनामिकाची अव्यक्त प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडली आहे. या मालिकेतील हृदयस्पर्शी प्रसंग आणि संवाद देखील प्रेक्षकांना आवडत आहेत. मे महिना म्हणजे उन्हाळा आणि या महिन्यात आगमन होतं ते म्हणजे फळांचा राजा आंबा याचं. आंबा म्हणजे सगळ्यांचा जीव कि प्राण आणि याच हापूस आंब्यावर तू तेव्हा तशी या मालिकेतील कलाकारांनी ताव मारला.
मालिकेत होणार हापूस पार्टी
प्रेक्षकांना या मालिकेत हापूस पार्टी होताना पाहायला मिळणार आहे. इतकंच नव्हे तर अनामिकाकडे होणाऱ्या हापूस पार्टीमध्ये सौरभ रमा आजीला अनामिकावर असलेल्या त्याच्या प्रेमाची कबुली देखील देणार आहे. तिच्याशी लग्न करण्याची इच्छा देखील व्यक्त करणार आहे. सौरभ आता त्याच्या मनातील गोष्ट अनामिकाला सांगणार की नाही हे पाहणं महत्वाचं असेल. हापूस प्रमाणेच गोड अशी सौरभ आणि अनामिकेच्या प्रेमाची सुरुवात होणार का? हे प्रेक्षकांना मालिकेत लवकरच पाहायला मिळेल.
पहिल्या प्रेमाचं आपल्या आयुष्यात खूप खास स्थान असतं आणि त्या पहिल्या प्रेमाच्या आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात आयुष्यभर साठलेल्या असतात. अशातही जर ते पहिलं प्रेम व्यक्त करायचं राहून गेलं असेल तर? अशाच अव्यक्त प्रेमाची गोष्ट म्हणजे ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.
'तू तेव्हा तशी' मालिकेचे शीर्षक गीत चर्चेत
मालिकेसोबतच मालिकेच्या शीर्षक गीताची देखील सोशल मीडियावर चर्चा आहे. 'तू तेव्हा तशी' मालिकेच्या शीर्षक गीताचे शब्द अभिषेक खणकर यांचे असून अभय जोधपूरकरने ते गायलं आहे. हे शीर्षक गीत संगीतकार समीर सप्तीसकरने संगीतबद्ध केलं आहे. स्वप्निलने एकापेक्षा एक असे मराठी हिट सिनेमे दिले आहेत. याशिवाय तो आता छोट्या पडद्यावर परीक्षकाच्या भूमिकेत देखील दिसतो. वेबसिरीज, सिनेमा, मालिका, नाटक या सर्व माध्यमात त्याने काम केलं आहे. पण आता 'तू तेव्हा तशी' मालिकेच्या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याने त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे.
संबंधित बातम्या
Tu Tevha Tashi : स्वप्नीलचं चाहत्यांना सरप्राईज, जीवलगानंतर आता 'तू तेव्हा तशी' मालिकेत दिसणार
Maha Episodes : राया कृष्णाला पुन्हा विधातेंच्या घरात आणणार, तर सौरभच्या वाड्यात रामनवमी साजरी होणार!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)