एक्स्प्लोर

Alpha Box Office Collection: प्रचंड पब्लिसिटी- प्रमोशन करूनही आलिया भटचा 'अल्फा' पहिल्याच दिवशी फ्लॉप! देशभरातून सिनेमाला थंड प्रतिसाद, किती कोटी कमावले?

जवळपास 130 कोटी रुपये बजेट असलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी 9 कोटी रुपये कमावले. 

Alpha Box Office Collection 1st Day: आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ यांच्या प्रमुख भूमिका असलेला बहुप्रतिक्षित स्पाय ॲक्शन थ्रिलर 'अल्फा' (Alpha Box Office Collection) 3 जुलैला जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांना या चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा होत्या.पण पहिल्याच दिवशी मिळालेल्या थंड प्रतिसादाने अनेकांची निराशा केली.अल्फा चित्रपटाला पहिल्या दिवशी फारसा प्रतिसाद मिळाला नाही. प्रचंड प्रमोशन करूनही पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये 10 कोटी रुपयेही हा चित्रपट कमावू शकला नाही. सकाळी 9 वाजता लावलेल्या 9000 शोपैकी केवळ 10% टक्के चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षक उपस्थित होते.आणि जे आले, त्यापैकी बहुतेक जणांची निराशाच झाली. जवळपास 130 कोटी रुपये बजेट असलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी 9 कोटी रुपये कमावले. 

'अल्फा' पहिल्याच दिवशी पडला फिका?

अल्फा या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे लेखन अभिनेता उदय चोप्राय यांनी केले असून या चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा यांनी केली आहे. 'द रेल्वे मॅन' फेम शिव रावळ यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात आलिया आणि शर्वरी यांच्या व्यतिरिक्त अनिल कपूर आणि बॉबी देवल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ऋतिक रोशनने या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. Yrf स्पाय युनिव्हर्समधील हा सातवा चित्रपट आहे. यापूर्वी yrf ची निर्मिती असलेले वर पठाण, टायगर 3, टायगर जिंदा है, एक था टायगर,  वॉर 2 या चित्रपटांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता.  या सगळ्या चित्रपटांची पहिल्या दिवसाची कमाई 30 कोटी ते 60 कोटी रुपयांपर्यंत गेली होती. मात्र, हा एकमेव असा चित्रपट आहे जो 9 कोटींवरच अडकला.  

सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, अल्फा चित्रपटाने जगभरात 15.80 कोटी रुपये कमावले असून भारतात या चित्रपटाचं नेट कलेक्शन 9 कोटी रुपयांवर स्थिरावलं. पहिल्याच दिवशी काहीसा सुस्त प्रतिसाद या चित्रपटाला मिळाला.  मात्र, वर्ड ऑफ माऊथवर हा चित्रपट हिट ठरणार की फ्लॉप हे अवलंबून असणार आहे. चित्रपटातील ॲक्शन आणि अभिनयाचे कौतुक झाले असले तरी कमकुवत कथा नका मुळे या चित्रपटाला फटका बसत असल्याचा दिसतंय. YRF च्या युनिव्हर्समधील हा पहिला महिला केंद्रित चित्रपट होता. पण पहिल्याच दिवशी या चित्रपटाला मिळालेला थंड प्रतिसाद आणि निराशाजनक ओपनिंगमुळे आलिया भट, शर्वरी वाघ आणि दिग्गज कलाकारांची टीम येणाऱ्या आठवड्यांमध्ये चांगली कमाई करते की  बॅकफूटवरच थांबते, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramayan Release Date:4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
Mitali Mayekar Kanyadaan Onscreen Father: ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
Colors Marathi Serials: स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
CID Fame Actor Vivek: CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
Advertisement

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
Embed widget