एक्स्प्लोर

Allu Arvind Advice Mrunal Thakur: 'तू तेलगु इंडस्ट्रीमधल्याच कुणाशी तरी लग्न कर...'; अल्लू अर्जनुच्या वडिलांचा मराठमोळ्या अभिनेत्रीला सल्ला

Allu Arvind Advice Mrunal Thakur: मृणाल ठाकूर आणि अदिवी शेष यांच्या मुख्य भूमिका असलेला 'डकैत' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय.

Allu Arvind Advice Mrunal Thakur: अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) सध्या तिच्या 'डकैत' (Dacoit) या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात तिच्यासोबत अभिनेता अदिवी शेष (Actor Adivi Sesh) झळकला आहे. सध्या मृणालचा हा सिनेमा बॉक्स ऑफिस (Dacoit Box Office Collection) गाजवतोय. महत्त्वाची बाब म्हणजे, 'धुरंधर 2'च्या (Dhurandhar 2) वादळातही मृणाल ठाकूर (Marathi Actor Mrunal Thakur) हिचा हा सिनेमा तग धरुन आहे आणि चांगली कमाई करतोय. याच सिनेमानं संपादन केलेल्या यशाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात दिग्दर्शक नाग अश्विन (Director Nag Ashwin) आणि प्रसिद्ध निर्माते अल्लू अरविंद (Producer Allu Arvind) उपस्थित होते. यावेळी नाग अश्विन यांनी मृणालचं कौतुक करताना तिची तुलना हिंदी सिनेसृष्टीतली दिग्गज अभिनेत्री मधुबाला आणि दिग्गज मराठी अभिनेत्री स्मिता पाटील यांच्यासोबत केलेली.

मृणाल ठाकूर आणि अदिवी शेष यांच्या मुख्य भूमिका असलेला 'डकैत' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. मीडिया रिपोर्टनुसार, या सिनेमानं रिलीज झाल्यानंतर अवघ्या तीनच दिवसांत जगभरात 40 कोटी रुपयांहून अधिक कमाई केलीय. 

मृणालचं कौतुक करताना नाग अश्विन काय म्हणाले? (Nag Ashwin On Mrunal Thakur)

मृणालचं कौतुक करताना दिग्दर्शक नाग अश्विन यांनी तिची तुलना मधुबाला आणि स्मिता पाटील या दिग्गज अभिनेत्रींसोबत केली. नाग अश्विन म्हणाले की, "मृणाल, तू एक अप्रतिम अभिनेत्री आहेस. जेव्हा तू एखादी भूमिका करतेस, तेव्हा मला वाटते की तू यापेक्षा खूप चांगल्या भूमिकांसाठी बनली आहेस. ज्या पात्रांमध्ये दुःख किंवा वेदना असते, अशा भूमिका तू ज्या ताकदीनं साकारतेस. ते पाहून मला मधुबाला आणि स्मिता पाटील यांच्या काळातील अभिनेत्रींची आठवण येते. सध्या तुझ्यासारख्या मोजक्याच अभिनेत्री आहेत, त्यामुळे तू चांगल्याच संहिता निवड..."

"तू तेलुगू इंडस्ट्रीतल्याच कोणाशी तरी लग्न कर आणि इथेच स्थायिक हो..." (Allu Arvind On Mrunal Thakur)

याच कार्यक्रमात 'पुष्पा' फेम अभिनेता अल्लू अर्जुनचे वडील सुप्रसिद्ध निर्माते अल्लू अरविंद सुद्धा उपस्थित होते. त्यांनीही मृणालचं तोंडभरुन कौतुक केलं. तसेच, यावेळी बोलताना त्यांनी मृणालला लग्नाबाबत सल्लाही दिला. निर्माते अल्लू अरविंद म्हणाले की, "माझी अशी इच्छा आहे की, तू तेलुगू इंडस्ट्रीतल्याच कोणाशी तरी लग्न कर आणि इथेच स्थायिक हो... तुला आमच्या जवळ ठेवण्याचा हाच एक मार्ग आहे आणि आम्हाला तू इथेच हवी आहेस..." अल्लू अरविंद यांचं वक्तव्य ऐकून उपस्थित सारेच खळखळून हसू लागले. तर, मृणालही काहीशी लाजली. 

मृणाल ठाकरूच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, मूळची महाराष्ट्रातली असलेली मराठमोळी मृणाल ठाकूर सध्या तिच्या 'डकैत' सिनेमामुळे चर्चेत आहे. हृतिक रोशनच्या 'सुपर 30'मधून तिला बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली. नंतर 'सीता रामम् या तेलुगू सिनेमानं तिचं नशीब पूर्णपणे बदललं. त्यानंतर अभिनेता नानीबरोबरच्या तिच्या 'हाय नन्ना' या सिनेमालाही प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली. याच यशाच्या जोरावर तिला 'कल्की 2898 एडी' मध्ये छोटी, पण महत्त्वाची भूमिका मिळाली.

मृणालनं 2012 साली छोट्या पडद्यावरून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. टीव्ही मालिकांमध्ये काम करताना तिनं मराठी सिनेसृष्टीतही आपली वेगळी ओळख निर्माण केली. पुढे 'लव्ह सोनिया' या सिनेमाद्वारे तिनं मोठ्या पडद्यावर पाऊल ठेवलं. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Abhishek Bachchan Never Bought An IPL Team: कोट्यवधींची संपत्ती, खेळाचीही आवड; तरीसुद्धा अभिषेक बच्चन यानं IPL टीम का खरेदी केली नाही?

महत्त्वाच्या बातम्या

Marathi serial Mi Kaat Takli: नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
OTT Upcoming Thriller: ''पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
'पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
TikTok Star Ayesha Gilmani: प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
Bollywood Actress Death: बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget