एक्स्प्लोर

Abhishek Bachchan Never Bought An IPL Team: कोट्यवधींची संपत्ती, खेळाचीही आवड; तरीसुद्धा अभिषेक बच्चन यानं IPL टीम का खरेदी केली नाही?

Abhishek Bachchan Never Bought An IPL Team: बॉलिवूडचा स्टारकीड, स्वतःही प्रसिद्ध अभिनेता, कोट्यवधींची संपत्ती आणि त्यात खेळाचीही आवड; पण तरीसुद्धा अभिषेक बच्चननं IPL Team विकत नाही घेतली?

Abhishek Bachchan Never Bought An IPL Team: सध्या भारतात आयपीएल (Indian Premier League) फिवर सुरू आहे, त्यामुळे क्रिडाप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. IPL च्या 2026 च्या 19 व्या सीझनमध्ये, कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders), सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad), मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांसारखे संघ एकमेकांशी भिडताना दिसत आहेत. आयपीएलचा रणसंग्राम फक्त आणि फक्त क्रिकेटपुरताच मर्यादित नाही, यामध्ये सिनेक्षेत्रातील अनेक दिग्गजसुद्धा उतरलेत. शाहरुख खान (Shah Rukh Khan), जूही चावला (Juhi Chawla) आणि प्रिती झिंटा (Preity Zinta) यांनी खेळाडू खरेदी करुन आपापल्या टीम विकत घेतल्यात. अशातच एक असा सेलिब्रिटी आहे, जो नेहमी आयपीएलच्या (IPL 2026) मैदानात दिसतो, पण फक्त सामना पाहताना, ना त्यानं कधी टीम खरेदी केली आणि कोणत्याही प्रँचायझीसोबत (IPL Franchises) हातमिळवणी केलीय. पण, तरी तो आयपीएल सामन्यांसाठी हजेरी लावताना दिसतो.

आम्ही ज्या अभिनेत्याबाबत बोलतोय, तो अभिनेता म्हणजे, बॉलिवूडचा स्टारकीड अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan). बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) अभिषेक बच्चन हा केवळ आपल्या प्रोफेशनल कामगिरीमुळेच नाहीतर आपल्या वैवाहिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. बॉलिवूडमधील कामाव्यतिरिक्त, अभिषेक बच्चनला खेळाविषयी प्रचंड आवड आहे. किंबहुना, त्यानं खेळांशी संबंधित अनेक इव्हेंट्समध्ये गुंतवणूक केली आहे, तो 'जयपूर पिंक पँथर्स' (Jaipur Pink Panthers) या कबड्डी संघाचा (Professional Kabaddi Team) मालक आहे. याव्यतिरिक्त, त्याच्या मालकीचा एक फुटबॉल लीग संघही (Football League) आहे. तरीही, खेळांमध्ये विशेष रुची असलेला आणि कोट्यवधींची संपत्ती असलेला अभिषेक बच्चन यानं, आजवर IPL संघ विकत का नाही घेतला? असा प्रश्न सध्या चर्चेत आहे.    

अभिषेक बच्चननं IPL टीम का खरेदी केली नाही?

अभिषेक बच्चन हा आपल्या वैयक्तिक आयुष्यात खेळांचा एक मोठा चाहता आहे. कबड्डी आणि फुटबॉल या दोन्ही क्षेत्रांत त्याच्या मालकीचे यशस्वी संघ आहेत. मात्र, त्यानं अद्याप इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) कधीच प्रवेश केलेला नाही. 'फोर्ब्स' (Forbes) सोबतच्या नुकत्याच झालेल्या एका संभाषणात, अभिषेक बच्चन यानं आपण आयपीएल संघ का विकत घेतला नाही, याचं स्पष्टीकरण दिलंय. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Chennaiyin FC (@chennaiyinfc)

अभिनेता अभिषेक बच्चन म्हणाला की, "ही गोष्ट खूपच रंजक आहे. आयपीएल आवडत नाही, असा एकही माणूस मला तरी माहीत नाही. मला वाटतं की, क्रीडा मनोरंजनाच्या (Sports Entertainment) क्षेत्रातील तो एक सर्वोच्च आविष्कार आहे. मला IPL शी जोडलं जायला नक्कीच आवडलं असतं, पण खरं सांगायचं तर, जेव्हा याची सुरुवात झाली, तेव्हा ते आर्थिकदृष्ट्या खूपच महाग होते. त्या वेळी, मी एक मर्यादित अनुभव असलेला अभिनेता होतो, माझे सिनेमे बॉक्स ऑफिसवर नुकतेच चांगली कामगिरी करू लागले होते. मी नुकताच बऱ्यापैकी उत्पन्न मिळवू लागलो होतो आणि एखादा संघ विकत घेणं, हे माझ्या बजेटच्या (आर्थिक क्षमतेच्या) पूर्णपणे बाहेरची गोष्ट होती..."  

अभिषेक बच्चननं पुढे असंही स्पष्ट केलं की, केवळ आर्थिक बाबींचा विचार न करता, आपण या खेळामध्ये प्रत्यक्षपणे कोणती ठोस मूल्य (Value) वाढवू शकतो, असा प्रश्नही त्यानं स्वतःला विचारला होता. तो म्हणाला, "सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, या खेळामध्ये मी नेमकं कोणतं विशिष्ट योगदान देऊ शकेन, हेच मला समजत नाही. पायाभूत सुविधांच्या (Infrastructure) बाबतीत, बीसीसीआयनं (BCCI) उत्कृष्ट काम केलंय, मग अशा परिस्थितीत 'मी' नक्की काय वेगळं देऊ शकणार होतो? मी अशा प्रकारचा माणूस नाही, ज्याला केवळ प्रेक्षक गॅलरीत बसून गर्दीकडे हात हलवण्यात आनंद मिळतो, तेही फक्त यासाठी की, लोकांनी माझ्याकडे बोट दाखवून म्हणावं, "अरे, पाहा! एक स्टार आलाय...", मी मुळात तशा प्रकारचा माणूसच नाही..."

टीम ओनरशिपबाबत काय म्हणाला अभिषेक बच्चन? (Abhishek Bachchan On Team Ownership)

अभिषेक बच्चननं संघमालक म्हणून आपल्या कार्यपद्धतीवरही भाष्य केलंय. अभिषेक बच्चन म्हणाला की, "जर तुम्ही सामन्यांदरम्यान मला पाहिलं असेल, तर तुमच्या लक्षात आलं असेल की, मी त्यात पूर्णपणे मग्न असतो. मी खेळाडूंसोबत बसतो, त्यांच्या अनुभवात मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून सहभागी होतो. शक्य असल्यास, मी त्यांना प्रशिक्षणही देतो. ते दररोज काय खातात, हे मी स्वतः अप्रूव्ह करतो. मी प्रत्येक लहान-सहान गोष्टींवर बारकाईनं लक्ष ठेवतो. मला काम करण्याची हीच पद्धत अधिक पसंत आहे..." 

विशेषतः क्रिकेटबद्दल बोलताना अभिषेक म्हणाला, "मी यात काय योगदान देऊ शकेन, याबद्दल मला खात्री नव्हती, कारण त्या वेळी माझ्याकडे खेळांविषयी तितकं सखोल ज्ञान नव्हतं, जितकं आज माझ्याकडे आहे. मला इतर खेळांविषयी अधिक माहिती होती आणि क्रिकेटमध्ये मी नेमकी कशी मदत करू शकेन, याबद्दल मला स्पष्टता नव्हती. तरीही, माणसानं कधीच 'नाही' असं म्हणू नये, त्यामुळे कदाचित भविष्यात काहीतरी घडून येईल..."

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bhushan Pradhan Marriage: मराठीतल्या चॉकलेट बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्याच्या लग्नाची जोरदार चर्चा, अखेर मौन सोडलं; 'स्वप्नसुंदरी'चं नाव सांगूनच टाकलं

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Kapoor : 'जोश' चित्रपट गाजवणारा खलनायक आर्थिक अडचणीत, पाळीव कुत्रेही एनजीओकडे पाठवले; मदतीला सलमान खान आणि सोनू सूद धावले
'जोश' चित्रपट गाजवणारा खलनायक आर्थिक अडचणीत, पाळीव कुत्रेही एनजीओकडे पाठवले; मदतीला सलमान खान आणि सोनू सूद धावले
Dipali Sayyed : रुपाली चाकणकराचा नाव, फोटो अन् स्टाईलवर ट्रेडमार्क; आ बैल मुझे मार... त्यांचा सल्लागार कोण आहे? दिपाली सय्यद यांचा सवाल, बायकांच्या साडीचाही विषय काढला
रुपाली चाकणकराचा नाव, फोटो अन् स्टाईलवर ट्रेडमार्क; आ बैल मुझे मार... त्यांचा सल्लागार कोण आहे? दिपाली सय्यद यांचा सवाल, बायकांच्या साडीचाही विषय काढला
Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हाचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्याला अटक; पण कोर्टाने खेळच पलटला, आरोपीला सोडून दिलं, नेमकं काय घडलं?
सोनाक्षी सिन्हाचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्याला अटक; पण कोर्टाने खेळच पलटला, आरोपीला सोडून दिलं, नेमकं काय घडलं?
Rupali Chakankar Trademark: रुपाली चाकणकरांच्या नाव, फोटो अन् शैलीवर ट्रेडमार्क; वापरल्यास कारवाईचा इशारा, एपस्टीन फाइल्सच्या दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
रुपाली चाकणकरांच्या नाव, फोटो अन् शैलीवर ट्रेडमार्क; वापरल्यास कारवाईचा इशारा, एपस्टीन फाइल्सच्या दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

व्हिडीओ

Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Farmers Farmer ID : शेतकऱ्यांनो तातडीने 'हे' काम पूर्ण करा, अन्यथा शासकीय योजनांचे पैसे अडकणार; मदत व पुनर्वसन विभागाचे महत्त्वाचे आवाहन
शेतकऱ्यांनो तातडीने 'हे' काम पूर्ण करा, अन्यथा शासकीय योजनांचे पैसे अडकणार; मदत व पुनर्वसन विभागाचे महत्त्वाचे आवाहन
Lalit Modi : आयपीएलचा संस्थापक आणि पळपुटा ललित मोदी बनला ब्रिटनचा नागरिक, फोटो शेअर करत म्हणाला 'हे नवं घर'
आयपीएलचा संस्थापक ललित मोदी बनला ब्रिटनचा नागरिक, फोटो शेअर करत म्हणाला 'हे नवं घर'
Devendra Fadnavis Chhat puja: छठपूजेसाठी मुख्यमंत्री जुहू चौपाटीवर; म्हणाले, देव कधीही जात, प्रांत भेदभाव करत नाही, सूर्यदेवाला नमन
छठपूजेसाठी मुख्यमंत्री जुहू चौपाटीवर; म्हणाले, देव कधीही जात, प्रांत भेदभाव करत नाही, सूर्यदेवाला नमन
Arrest and Criminal Case Rules : देशातील 'या' दोन व्यक्तींविरुद्ध कधीच गुन्हा दाखल होणार नाही, ना अटक करता येणार; काय आहेत त्यांचे विशेषाधिकार?
देशातील 'या' दोन व्यक्तींविरुद्ध कधीच गुन्हा दाखल होणार नाही, ना अटक करता येणार; काय आहेत त्यांचे विशेषाधिकार?
देवदर्शनाला जाणाऱ्या पुण्यातील कुटुंबावर काळाचा घाला; बेळगावमध्ये भीषण अपघात, कुटुंबातील तिघांचा मृत्यू
देवदर्शनाला जाणाऱ्या पुण्यातील कुटुंबावर काळाचा घाला; बेळगावमध्ये भीषण अपघात, कुटुंबातील तिघांचा मृत्यू
Team India : गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतर भारताचा विदेशातील पहिला वनडे मालिका विजय, अय्यरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतर भारताचा विदेशातील पहिला वनडे मालिका विजय, अय्यरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या जीवाशी खेळ! 120 किमी वेगमर्यादा असलेल्या एक्सेस कंट्रोल महामार्गावर चक्क गुरांचा कळप
समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या जीवाशी खेळ! 120 किमी वेगमर्यादा असलेल्या एक्सेस कंट्रोल महामार्गावर चक्क गुरांचा कळप
छठपूजेसाठी जुहू चौपाटीवर उत्तर भारतीयांची मोठी गर्दी, पर्यटकांना प्रवेश बंदी; नाशिकच्या रामकुंडावरही उत्साह
छठपूजेसाठी जुहू चौपाटीवर उत्तर भारतीयांची मोठी गर्दी, पर्यटकांना प्रवेश बंदी; नाशिकच्या रामकुंडावरही उत्साह
Embed widget