एक्स्प्लोर

मोठी बातमी : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जून विरोधात गुन्हा दाखल; पुष्पा 2 च्या प्रीमियरवेळी चेंगराचेंगरी, मृत महिलेच्या कुटुंबियांची पोलिसांत धाव

Pushpa 2 The Rule Premier : अभिनेता अल्लू अर्जूनच्या हैदराबाद येथील पुष्पा 2 च्या प्रीमियर वेळी चेंगराचेंगरी होऊन एका महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Allu Arjun Booked for Stampede and One Death : 'पुष्पा 2' फेम साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जून याच्या अडचणीत वाढ झाल्याची माहिती आहे. अभिनेता अल्लू अर्जूनच्या हैदराबाद येथील पुष्पा 2 च्या प्रीमियर वेळी चेंगराचेंगरी होऊन एका महिलेला जीव गमवावा लागला. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हैदराबाद पोलिसांनी अभिनेता अल्लू अर्जुन आणि इतर अनेकांविरुद्ध संध्या थिएटरबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीच्या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे. संध्या थिएटरबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत बुधवारी एका महिलेचा मृत्यू झाला. अल्लू अर्जून पुष्पा 2 : द चित्रपटाच्या प्रीमियर शोसाठी कोणतीही पूर्वसूचना न देता पोहोचला होता. यावेळी त्याला पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये धक्काबुक्की झाली, यातून पुढे चेंगराचेंगरी होऊन दुर्घटना घडली.

अभिनेता अल्लू अर्जून विरोधात गुन्हा दाखल

साऊथ अभिनेता अल्लू अर्जुनवर बीएनएस कायद्याच्या कलम 105, 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. चिक्कडपल्ली पोलिसांनी सांगितलं की, "आम्ही अल्लू अर्जुन आणि त्याच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. डीसीपी अक्षांश यादव  यांनी गुरुवारी यासंदर्भात माहिती दिली. यानुसार, अभिनेता अल्लू अर्जुन, 'पुष्पा 2 - द राइज'ची टीम,  आणि संध्या थिएटरच्या मालकाविरुद्ध कलम 105, 118 (1) बीएनएस कायद्यांतर्गत 3(5) नुसार गुन्हे दाखल केले आहेत.  डीसीपी अक्षांश यादव यांनी डेक्कन क्रॉनिकलला यासंदर्भात माहिती दिली.

नेमकं काय घडलं?

हैदराबादच्या आरटीसी एक्स रोडवर असलेल्या 'संध्या' सिनेमा हॉलबाहेर बुधवारी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला आणि तिची दोन मुले जखमी झाली. यानंतर हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुन आणि थिएटर व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल केला. हैदराबादमध्ये 'पुष्पा 2' चित्रपटाच्या प्रीमियरवेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 39 वर्षीय महिला रेवतीचा मृत्यू आणि तिच्या मुलाच्या गंभीर दुखापतीनंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसात गुन्हा दाखल केला.

अल्लू अर्जूनवर आरोप काय?

संध्या थिएटरवर सुरक्षेबाबत निष्काळजीपणाचा आणि प्रीमियरमध्ये अल्लू अर्जुनच्या उपस्थितीबद्दल आगाऊ माहिती न दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर पुष्पा चित्रपटाच्या निर्मात्यांनी मृत महिला आणि तिच्या कुटुंबियांना शोक व्यक्त करत आणि त्यांना शक्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले. 

मृत महिलेच्या कुटुंबियांना 25 लाखांची मदत

चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. "आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासत आहोत आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवत आहोत. अर्जुन थिएटरला भेट देणार असल्याची माहिती कोणीही दिली नाही. थिएटर व्यवस्थापनानेही गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी सुरक्षेबाबत कोणतीही अतिरिक्त तरतूद केली नाही", अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, अभिनेता अल्लू अर्जूनने मृत महिलेच्या कुटुंबियांनी 25 लाख रुपयांची आर्थिक मदत देत जखमी मुलांच्या उपचाराचा खर्च देण्याची घोषणा करत संवेदना व्यक्त केल्या आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Allu Arjun Video : पुष्पा 2 च्या प्रीमियर वेळी चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू; अल्लू अर्जून म्हणाला, "20 वर्षांच्या कारकिर्दीत..."

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 17 January 2025Baramati Father Killer Son : बापच उठला लेकराच्या जीवावर! 9 वर्षाच्या चिमुरड्याची बापाकडून हत्याWalmik Karad Special Report :कोट्याधीश कराड, पुण्यात घबाड; कराडच्या संपत्तीमुळे ईडीची एन्ट्री होणार?Saif Ali Khan Special Report : सैफ, सेफ आणि सवाल; सैफवरील हल्ल्याचंही राजकारण सुरु

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget