एक्स्प्लोर

All The Best : मराठी रंगभूमीवर 'ऑल दि बेस्ट' ची जादू कायम, अवघ्या तीन महिन्यांत नाटकाचे 50 प्रयोग

All The Best : 'ऑल दि बेस्ट' या नाटकाला नाट्यरसिकांनी पुन्हा एकदा उदंड प्रतिसाद दिला असल्याचं पाहायला मिळतंय. तसेच या नाटकातील कलाकारांच्या  नवीन संचाचा 50वा प्रयोग संपन्न होणार आहे. 

All The Best : मराठी रंगभूमीवर खणखणीत वाजलेलं व गाजलेलं नाटक म्हणजे देवेंद्र पेम लिखित-दिग्दर्शित ‘ऑल दि बेस्ट’ (All The Best).  हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर हाऊसफुल्ल धुमाकूळ घालत आहे. देवेंद्र पेम लिखित हे नाटक 90च्या दशकाच्या सुरुवातीला विशेष गाजलं. तीस वर्षांपूर्वी रंगभूमीवर दाखल झालेल्या या नाटकानं अनेक विक्रमांना गवसणी घातली आणि हजारो हाऊसफुल्ल प्रयोग करत रंगभूमीवर मोठा इतिहासचं घडवला.

 अनेक कलाकारांनी 'ऑल दि बेस्ट'  नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केले. अंकुश चौधरी भरत जाधव संजय नार्वेकर हे सुपरस्टार झाले. या नाटकाने मराठीत अत्यंत कमी वर्षात 4500 प्रयोगांचा टप्पा गाठला आहे. 'ऑल दि बेस्ट'ने केवळ मराठीचं नाही तर विविध भाषीक प्रेक्षकांनाही अक्षरशः वेड लावलं. त्यामुळे हे नाटक आजवर 12 भाषांमध्ये प्रदर्शित झालं असून त्याचे जवळ जवळ 10,000 प्रयोग होत आले आहेत.

'ऑल दि बेस्ट' नाटक पुन्हा रंगभूमीवर

नाट्यरसिकांच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने 'अनामय' नाट्यसंस्थेची निर्मिती असलेलं 'ऑल दि बेस्ट' हे नाटक पुन्हा रंगभूमीवर नवीन संचात रूजू झालं आहे.आता ता नाटकातील नवीन संचातील कलाकारांना माय-बाप रसिक प्रेक्षक उदंड प्रतिसाद देत आहेत. ज्यांनी हे नाटक 25 वर्षांपूर्वी  पाहिल होत  ते त्यांच्या मुलांना नाटक बघायला घेऊन येत आहेत. त्यामुळे तरुण पिढी सुद्धा थिएटरकडे  वळली आहे. म्हणूनच वघ्या 3 महिन्यात या नाटकाचा गौरवशाली असा 50 वा प्रयोग 5 मे रोजी शिवाजी मंदिर, दादर येथे दुपारी 3.30 वाजता संपन्न होणार आहे.

नाटकाच्या नव्या संचात कोण कोण?

या गौरवशाली प्रयोगाबाबत बोलताना लेखक- दिग्दर्शक देवेंद्र पेम म्हणाले की, "आजवर या नाटकाला नाट्यप्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिला, अपार प्रेम केलं. या नाटकाची लोकप्रियता आजही तितकीच आहे. आता नव्या संचात हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर धुमाकूळ घालत आहे. हे नाटक लवकरच विश्वविक्रमी टप्पा गाठेल याची खात्री आहे".30 वर्षांपूर्वी आलेलं हे नाटक नव्या कलाकारांच्या संचात पुन्हा येऊन त्यांनी 50 प्रयोगांचा टप्पाही गाठला आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये विनोदाची थंडगार धबधबा घेऊन हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर धुमाकूळ घालायला सज्ज झालं आहे. या नाटकाच्या नव्या संचात मयुरेश पेम, मनमीत पेम, विकास पाटील आणि रिचा अग्निहोत्री हे कलाकार पाहायला मिळत आहेत.

ही बातमी वाचा : 

Prasad Oak :'मराठी सिनेमांसाठी राज ठाकरेंनी आंदोलनं केलीत पण शिंदे सरकारच...', प्रसाद ओकने व्यक्त केला विश्वास 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Lok Sabha Elections 5th Phase Special Report : मुंबईतल्या 6 जागांवर कोण वरचढ ठरणार?Mumbai Lok Sabha Elections : शिवसेना दुभंगल्यानंतरची पहिली निवडणूक, मुंबईमध्ये कुणाचा झेंडा फडकणार?Sharad Pawar Vs Ajit Pawar Special Report : Pune Car Accident Special Report : दोघांना चिरडणाऱ्या धनाढ्य बापाच्या मुलाला काही तासात जामीन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
पावसाने राजस्थानचे टेन्शन वाढवले, अखेरच्या सामन्यात काय होणार?
पावसाने राजस्थानचे टेन्शन वाढवले, अखेरच्या सामन्यात काय होणार?
Embed widget