Alia Bhatt, Ranbir Kapoor : लग्नानंतरच्या लूकमुळे आलिया ट्रोल; नेटकऱ्यांना आली कतरिनाची आठवण
आलियाच्या या लूकला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.
Alia Bhatt, Ranbir Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) 14 एप्रिल 2022 रोजी अभिनेता रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) लग्नबंधनात अडकली. आलिया-रणबीरच्या लग्नसोहळ्यात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लवाली. लग्नानंतर आलियाला 19 एप्रिल रोजी मुंबई एअरपोर्ट येथे गेली. करण जोहर, शबाना आजमी आणि फॅशन डिजाइनर मनीष मल्होत्रा हे देखील हजर होते. यावेळी आलियानं खास लूक केला होता. या लूकमधील तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आलियाच्या या लूकला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.
आलियानं मुंबई एअरपोर्टवर येत असताना सिंपल लूक केला होता. तिनं बेबी पिंक कलरचा ड्रेस आणि लाइट मेक-अप असा लूक केला होता. काही नेटकऱ्यांनी आलियाच्या या लूकला ट्रोल केलं आहे. आलियानं या वेळी मंगळसूत्र घतले नाही आणि सिंदूर लावले नसल्यानं नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. एका नेटकऱ्यानं आलियाच्या फोटोला कमेंट केली, 'ही आजिबात नववधु वाटत नाही. यापेक्षा छान कतरिना कैफ दिसत होती. '
View this post on Instagram
काही महिन्याआधी कतरिना कॅफनं देखील असाच लूक केला होता. कतरिनाच्या लूकसोबत नेटकऱ्यांनी आलियाच्या लूकची तुलना केली.
संबंधित बातम्या