एक्स्प्लोर

मैत्रिणींच्या जगात भारी यारीचा 'पिंगा गं पोरी पिंगा'; बिग बॉसनंतर कलर्सवर नवी मालिका

'पिंगा गं पोरी पिंगा' या भन्नाट मालिकेच्या माध्यमातून 'कलर्स मराठी'ने प्रेक्षकांना नवं सरप्राईज दिलं आहे. एक युनिक स्टोरी प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

New Serial On Colors Marathi : महाराष्ट्राच्या लाडक्या 'कलर्स मराठी' (Colors Marathi) वाहिनीवर सध्या अनेक नव्या मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत. 'आई तुळजाभवनी','अशोक मामा','बाईपण भारी रं' या मालिकांनंतर 'कलर्स मराठी'वर लवकरच 'पिंगा गं पोरी पिंगा' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या (New Serial on Colors Marathi) भेटीला येत आहे. नुकतीच या मालिकेची पहिली झलक समोर आली आहे. 

'पिंगा गं पोरी पिंगा' या भन्नाट मालिकेच्या माध्यमातून 'कलर्स मराठी'ने प्रेक्षकांना नवं सरप्राईज दिलं आहे. एक युनिक स्टोरी प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहे. समोर आलेली मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. मुंबईतील एका आलिशान सोसायटीत चार मुली आधीपासून पेईंग गेस्ट म्हणून राहत आहेत. आता त्यांच्यात भर पडते पाचव्या मुलीची. आधीपासून राहणाऱ्या पेईंग गेस्ट मुलींबद्दल सोसायटीतील काकूंना फारसं पटत नाही. त्यामुळे घरात शिरणाऱ्या नव्या मेंबरलाही त्या जज करतात. पण बाकीच्या मुली मात्र या नव्या मेंबरला लगेचच आपलंसं करत एक आत्मविश्वास देतात आणि लोकांकडे दुर्लक्ष करण्याचा सल्लाही देतात.

वेगवेगळ्या शहरांतून मायानगरी मुंबईत आलेल्या आणि एका बड्या सोसायटीत पेईंग गेस्ट म्हणून राहत असलेल्या पाच मुलींभोवती फिरणारं या मालिकेचं कथानक आहे. या पाचजणी काय धमाल करणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. 'कलर्स मराठी'वरील 'रमा राघव' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री ऐश्वर्या शेट्ये पुन्हा एकदा या मालिकेच्या माध्यमातून छोटा पडदा गाजवायला सज्ज आहे. ऐश्वर्यासह विदिशा म्हसकर, शाश्वती पिंपळीकर, प्राजक्ता परब आणि आकांक्षा गाडे या अभिनेत्री या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.

आजवर पुरुषांच्या मैत्रीवर आधारित अनेक चित्रपट, मालिका, नाटक, वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. पण महिलांच्या मैत्रींवर भाष्य करणाऱ्या कलाकृती खूप कमी आहेत. वर्षभरापूर्वी रिलीज झालेल्या 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाने महाराष्ट्रातील प्रत्येक स्त्रीच्या हृदयात विशेष जागा निर्माण केली. या चित्रपटानंतर 'कलर्स मराठी'ने 'बाईपण भारी रं' या मालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम महिलावर्गाला एक खास सरप्राईज दिलं. या मालिकेच्या पाठोपाठ 'पिंगा गं पोरी पिंगा' ही नवी मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. 'कलर्स मराठी'वर सध्या नवनवे प्रयोग होत आहे. 'पिंगा गं पोरी पिंगा' ही मालिकादेखील याचाच एक भाग आहे. विभिन्न स्त्रियांच्या मैत्रीवर आधारित ही मालिका आहे. 'पिंगा गं पोरी पिंगा' मधील या पाच जणींच्या मैत्रीची रंगत न्यारी आहे. कारण त्यांची यारी जगात भारी आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CBSE दहावी अन् बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे 110 दिवस
CBSE दहावी अन् बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे 110 दिवस
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2025 | गुरुवार
Rohit Arya Encounter: चिमुरड्यांना ओलिस ठेवून जीवाशी खेळ, पवई पोलिस स्टेशनचे एपीआय अमोल वाघमारेंच्या गोळीत रोहित आर्याचा एन्काऊंटर
चिमुरड्यांना ओलिस ठेवून जीवाशी खेळ, पवई पोलिस स्टेशनचे एपीआय अमोल वाघमारेंच्या गोळीत रोहित आर्याचा एन्काऊंटर
रायगड, शिवनेरीवर नमो टूरिझम सेंटर उभारुन दाखवाच, उभं केलं की फोडणार, राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना पहिला इशारा
रायगड, शिवनेरीवर नमो टूरिझम सेंटर उभारुन दाखवाच, उभं केलं की फोडणार, राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना पहिला इशारा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chakankar Controversy:'आमच्या लेकीची बदनामी थांबवा', Rupali Chakankar यांच्या विरोधात गावकरी आक्रमक
Ajit Pawar : रुपाली चाकणकरांची खुर्ची संकटात? फलटण प्रकरणातील भूमिका अजित पवारांना अमान्य
Phaltan Doctor Case : संशयित आरोपी प्रशांत बनकर, गोपाळ बदनेला 2 दिवसांची पोलीस कोठडी
Farmers' Protest: 'शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळण्याचा अधिकार दिलाच कुणी?', सरकारला संतप्त सवाल
Farmers' Agitation: 'हीच कर्जमाफीची योग्य वेळ, सरकारने आता शब्द फिरवू नये', Ajit Navale यांचा इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CBSE दहावी अन् बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे 110 दिवस
CBSE दहावी अन् बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे 110 दिवस
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2025 | गुरुवार
Rohit Arya Encounter: चिमुरड्यांना ओलिस ठेवून जीवाशी खेळ, पवई पोलिस स्टेशनचे एपीआय अमोल वाघमारेंच्या गोळीत रोहित आर्याचा एन्काऊंटर
चिमुरड्यांना ओलिस ठेवून जीवाशी खेळ, पवई पोलिस स्टेशनचे एपीआय अमोल वाघमारेंच्या गोळीत रोहित आर्याचा एन्काऊंटर
रायगड, शिवनेरीवर नमो टूरिझम सेंटर उभारुन दाखवाच, उभं केलं की फोडणार, राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना पहिला इशारा
रायगड, शिवनेरीवर नमो टूरिझम सेंटर उभारुन दाखवाच, उभं केलं की फोडणार, राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना पहिला इशारा
सकाळी ऑडिशन, मुलांना खुश करण्यासाठी पिझ्झा, कोल्ड्रिंक्स मागवलं ; अखेर रोहित आर्यने बंदूक ठेवत खरे रंग दाखवले
सकाळी ऑडिशन, मुलांना खुश करण्यासाठी पिझ्झा, कोल्ड्रिंक्स मागवलं ; अखेर रोहित आर्यने बंदूक ठेवत खरे रंग दाखवले
Mumbai Powai Encounter: किडनॅपर रोहित आर्यचा एन्काऊंटर, पोलिसांसोबतच्या चकमकीत मृत्यू, हल्ल्यात ज्येष्ठ महिलेसह लहान मुलगी जखमी
मोठी बातमी : किडनॅपर रोहित आर्यचा एन्काऊंटर, पोलिसांसोबतच्या चकमकीत मृत्यू, हल्ल्यात ज्येष्ठ महिलेसह लहान मुलगी जखमी
Mumbai Children Hostage: गेल्या सहा दिवसांपासून वेब सिरीजसाठी कास्टिंग, शेवटच्या दिवशी ओलिसनाट्य! लंचसाठी मुल बाहेर आली नाहीत अन् मुलांचा हात काचेतून दिसताच थरकाप उडाला
गेल्या सहा दिवसांपासून वेब सिरीजसाठी कास्टिंग, शेवटच्या दिवशी ओलिसनाट्य! लंचसाठी मुल बाहेर आली नाहीत अन् मुलांचा हात काचेतून दिसताच थरकाप उडाला
मुंबईतील 17 शाळकरी मुलांना ओलीस ठेवणारा किडनॅपर रोहित आर्य कोण, डिमांड काय?
मुंबईतील 17 शाळकरी मुलांना ओलीस ठेवणारा किडनॅपर रोहित आर्य कोण, डिमांड काय?
Embed widget