अक्षय कुमारचा डबल रोल; 18-20 कलाकारांची तगडी स्टारकास्ट; 'वेलकम टू द जंगल'चा टीझर रिलीज
Akshay Kumars Welcome To The Jungle Shoot Completed: अक्षय कुमारने 'वेलकम टू द जंगल'चे शूटिंग पूर्ण केल्याची घोषणा. ख्रिसमसनिमित्त शेअर केला खास व्हिडिओ. चित्रपट कधी रिलीज होणार?

Akshay Kumars Welcome To The Jungle Shoot Completed: बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचे (Akshay Kumar) दरवर्षी 4-5 चित्रपट प्रदर्शित होतात. तो त्याच्या चित्रपटांची घोषणा खूप आधी करतो. त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्याचे फॅन्स त्याच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात. अक्षय बऱ्याच काळापासून 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटावर काम करत होता. माहितीनुसार, या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. ख्रिसमसच्या दिवशी अक्षय कुमारने पोस्ट करून 'वेलकम टू द जंगल'च्या टीमसोबत स्वत:ची एक झलक दाखवली. या चित्रपटात अक्षय कुमारपासून सुनील शेट्टीपर्यंत, तगडी स्टारकास्टचा समावेश आहे.
अक्षय कुमारने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या चित्रपटात अक्षयची दुहेरी भूमिका असल्याची माहिती आहे. एका भूमिकेत त्याचे केस पूर्णपणे पांढरे आहेत. तो या भूमिकेत वयस्कर दिसत आहे. तर, दुसऱ्या भूमिकेत अक्षय तरूण आणि फिट दिसत आहे. चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये अक्षय कुमारसह संपूर्ण स्टारकास्ट लष्कराच्या गणवेशात दिसत आहे. दरम्यान, या चित्रपटाचा नुकताच टीझर रिलीज करण्यात आला आहे. या टिझरवर प्रेक्षकांनी लाईक्स अन् कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण
व्हिडिओमध्ये, वेलकमच्या थीमसोबत जिंगल बेल्स वाजताना ऐकू येत आहे. संपूर्ण कलाकार लष्कराच्या ड्रेसमध्ये दिसत आहेत. तसेच कलाकार चालताना दिसत आहेत. या चित्रपटात नेमके किती कलाकार आहेत, हे या व्हिडिओतून दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना अक्षयने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'वेलकम टू द जंगलच्या संपूर्ण टीमच्यावतीने, तुम्हा सर्वांना नाताळच्या खूप खूप शुभेच्छा. 2026मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार. मी कधीही इतक्या मोठ्या टीमचा भाग नव्हतो. आमच्यापैकी कुणीही नव्हते. आम्ही या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना गिफ्ट देण्यास उत्सुक आहोत. चित्रपटाचे काम पूर्ण झाले आहे मित्रांनो!'.
View this post on Instagram
सध्या अक्षयची ही नवीन पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी व्हिडिओतील कमेंटद्वारे चित्रपट पाहण्यासाठी उत्सुकता दर्शवली आहे. 'वेलकम टू द जंगल' चित्रपटात 18 ते 20 कलाकारांची तगडी स्टारकास्ट आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात अक्षय कुमार, सुनील शेट्टी, परेश रावल, अर्शद वारसी, रवीना टंडन, जॅकलिन फर्नांडिस, दिशा पटानी, लारा दत्ता, तुषार कपूर, पुनीत इस्सर आणि इतर कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
स्मृती मानधनाचं नेटकऱ्यांकडून बॉडी शेमिंग; सलमान खानशी तुलना, ट्रोलर्सवर भडकली मराठी इन्फ्लुएंसर























