एक्स्प्लोर

Akshay Kumar On Mrunal Thakur Dhanush Marriage Rumours: धनुषसोबतच्या लग्नाच्या चर्चांवरुन अक्षय कुमारनं चिडवलं, मराठमोळ्या मृणाल ठाकूरनं प्रेमसंबंधांबाबत थेटच सांगून टाकलं

Akshay Kumar On Mrunal Thakur Dhanush Marriage Rumours: 'दो दिवाने शहर में' सिनेमाची टीम अक्षय कुमारचा गेम शो 'व्हील ऑफ फॉर्च्यून'मध्ये दिसलीय. ज्यामध्ये मृणाल ठाकूर, सिद्धांत चतुर्वेदी आणि दिग्दर्शक रवी उदयवर यांचा समावेश आहे.

Akshay Kumar On Mrunal Thakur Dhanush Marriage Rumours: मराठमोळी अभिनेत्री (Bollywood Actress) मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) सध्या साऊथ सुपरस्टार (South Superstar) धनुषसोबतच्या (Dhanush) लग्नाच्या अफवांमुळे चर्चेत आहे. अशातच नुकताच मृणाल ठाकूर आणि सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) यांचा 'दो दिवाने शहर में' (Do Deewane Shaher Mein) नवा सिनेमा रिलीज झाला आहे. हा सिनेमा अशा लोकांची कहाणी सांगतो, ज्यांना नेहमीच परिपूर्ण राहणं आवश्यक नसतं, हे शिकायला मिळतं. सिनेमाची टीम सध्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सिनेमाची टीम अक्षय कुमारचा (Akshay Kumar) गेम शो 'व्हील ऑफ फॉर्च्यून'मध्ये दिसलीय. ज्यामध्ये मृणाल ठाकूर, सिद्धांत चतुर्वेदी आणि दिग्दर्शक रवी उदयवर यांचा समावेश आहे. या भागात, अभिनेत्रीनं खुलासा केलाय की, ती सध्या रिलेशनशिपमध्ये नाही.

अक्षय कुमारच्या प्रश्नावर मृणाल ठाकूरचं थेट उत्तर

'व्हील ऑफ फॉर्च्यून' शोमध्ये अक्षय कुमार मृणाल ठाकूरला चिडवतो. "मृणाल, सोशल मीडियावर तुझ्याबद्दल खूप चर्चा आहे, तुझं सध्याचं रिलेशनशिप स्टेटस काय आहे?", हा प्रश्न ऐकून मृणालनं संकोच न करता उत्तर दिलं, "मी सध्या सिंगल आहे आणि मिंगल होण्यासाठी तयार आहे..." अक्षय कुमारनं मृणालच्या उत्तरावर क्षणाचाही विलंब न लावता लगेच प्रेक्षकांमधल्या एका व्यक्तीला उठवलं, त्या माणसानं लगेच उत्तर दिलं की, माझं लग्न झालंय.

अक्षय कुमार पुढे बोलताना प्रेक्षकांमधल्या त्या व्यक्तीला म्हणाला की, "अरे मी तुला मिंगल होण्यासाठी आमंत्रण दिलं नव्हतं..." दरम्यान, मृणाल ठाकूर आणि साऊथ सुपरस्टार अभिनेता धनुषसोबतच्या लग्नाच्या अफवा काही काळापासून सोशल मीडियावर फिरत होत्या. दरम्यान, अभिनेत्रीनं तिच्या उत्तरानं सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @sonytvofficial

मृणाल ठाकरूचा नवा सिनेमा 'दो दीवाने शहर में'

रवी उदयवार दिग्दर्शित ही एक आधुनिक, वास्तववादी प्रेमकथा आहे. या सिनेमात सिद्धांत चतुर्वेदी आणि मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत आहेत. या दोघांव्यतिरिक्त, सिनेमा इला अरुण, जॉय सेनगुप्ता, आयशा रझा, विराज गेहलानी, संदीपा धर, दीपराज राणा, मोना आंबेगावकर, अचिंत कौर आणि नवीन कौशिक यांच्याही भूमिका आहेत. चित्रपटातील काही गाणी आधीच प्रदर्शित झाली आहेत आणि त्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. सोशल मीडियावरही या चित्रपटाबद्दल बरीच चर्चा आहे. आता, प्रेक्षकांकडून चित्रपटाला किती प्रतिसाद मिळतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. संजय लीला भन्साळी यांच्या भन्साळी प्रॉडक्शन आणि झी स्टुडिओज अंतर्गत निर्मित, 'दो दीवाने शहर में' हा रोमँटिक ड्रामा 20 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Divyaa Agarwal Husband Apurva Padgaonkar: प्रसिद्ध अभिनेत्रीचा संसार अडचणीत? बिझनेसमन नवऱ्यानं नात्यावर सोडलं मौन, चाहतेही झालेत चकीत

महत्त्वाच्या बातम्या

Satluj: रिलीजनंतर 48 तासांत हटवला; ‘सतलज’च्या नुकसानभरपाईसाठी गुरुद्वारांनी उचललं मोठं पाऊल! दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
रिलीजनंतर 48 तासांत हटवला; ‘सतलज’च्या नुकसानभरपाईसाठी गुरुद्वारांनी उचललं मोठं पाऊल! दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
Dashmi Marathi Movie Poster: महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
OTT Webseries: 7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget