Akshay Kumar 100 Crore Movies: केसरी, राउडी राठोड ते सूर्यवंशी..; अक्षय कुमार ठरला ‘100 कोटींच्या क्लब’चा बादशाह, यादीत आणखी एका चित्रपटाची भर
Akshay Kumar 100 Crore Movies: अक्षय कुमार त्याच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याने त्याच्या कारकिर्दीत 100 कोटींचा व्यवसाय करणारे अनेक चित्रपट दिले आहेत. या चित्रपटांबद्दल जाणून घेऊयात...

Akshay Kumar 100 Crore Movies: बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) दरवर्षी 5-6 चित्रपट प्रदर्शित करतो. त्याचे चित्रपट हिट असोत किंवा फ्लॉप, ते नेहमीच चर्चेत राहतात. अक्षय कुमार सध्या त्याच्या 'जॉली एलएलबी 3' (Jolly LLB 3) या चित्रपटामुळे चर्चेत आहे, ज्याने 100 कोटींपेक्षा जास्त कमाई (100 Crore Movie) केली आहे. अक्षय कुमारचे साधारणपणे वर्षाला 2-3 चित्रपट 100 कोटींपेक्षा जास्त कमाई करतात.
अक्षय कुमारला 100 कोटींच्या चित्रपटांचा बादशाह म्हणणे चुकीचे ठरणार नाही, कारण त्याच्या तब्बल 19 हून अधिक चित्रपटांनी 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. त्याचा 'जॉली एलएलबी 3' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आणि आता हा चित्रपटही 100 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी झाला आहे. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात अक्षय कुमारचे ‘100 कोटींच्या क्लब’मधील चित्रपट कोणते आहेत?
Akshay Kumar 100 Crore Movies: अक्षय कुमारचे 100 कोटी कमाई झालेले चित्रपट
अक्षय कुमारचा पहिला 100 कोटींचा चित्रपट 'हाऊसफुल 2' आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 116 कोटींची कमाई केली. त्यानंतर 'राउडी राठोड' (133 कोटी), 'हॉलिडे' (113 कोटी), 'एअरलिफ्ट' (129 कोटी), 'हाऊसफुल 3' (109 कोटी), 'रुस्तम' (128 कोटी), 'जॉली एलएलबी 2' (117 कोटी), 'टॉयलेट एक प्रेम कथा' (134.25 कोटी), 'गोल्ड' (105 कोटी) आणि '2.0' (189 कोटी) हे चित्रपट आले.
तसेच, केसरी (154.42 कोटी), मिशन मंगल (203 कोटी), हाऊसफुल 4 (208.50 कोटी), गुड न्यूज (205.14 कोटी), सूर्यवंशी (196 कोटी), ओएमजी 2 (150 कोटी), स्काय फोर्स (134.93 कोटी), हाऊसफुल 5 (198.41 कोटी) आणि जॉली एलएलबी 3 (100.85 कोटी) यांचा समावेश आहे.
Akshay Kumar 100 Crore Movies: ‘100 कोटींच्या क्लब’मध्ये आणखी भर पडणार?
अक्षय कुमारकडे अजूनही चित्रपटांची एक मोठी मालिका आहे. तो अजूनही त्याच्या चित्रपटांवर काम करत आहे. त्याचे अनेक चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहेत, त्यापैकी बरेच चित्रपट 100 कोटी क्लबमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. अक्षय कुमारची 100 कोटींची यादी 19 वरून किती पुढे जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तर अक्षय कुमारने या वर्षी आधीच सहा चित्रपट प्रदर्शित केले आहेत, त्यापैकी काहींना चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या





















