aishwarya rai miss world : 'मिस वर्ल्ड'चा क्राऊन जिंकल्यानंतर ऐश्वर्या रायच्या भाषणाने वेधलं होतं लक्ष, शेवटच्या प्रश्नावर दिलेल्या उत्तरानं जिंकली मनं
aishwarya rai miss world : 'मिस वर्ल्ड 1994' जिंकताना ऐश्वर्या राय वन शोल्डर व्हाइट गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत होती. 'मिस वर्ल्ड 1994' नोव्हेंबर 1994 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील सन सिटी येथे आयोजित करण्यात आला होता.
aishwarya rai miss world : यंदाच्या 'मिस वर्ल्ड 2024' (Miss World 2024) च्या क्राऊनवर चेक रिपब्लिकनच्या क्रिस्टीना पिस्कोव्हा हिनं नाव कोरंल. त्यामुळे सध्या मिस वर्ल्डच्या विषयाची चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच आता दरम्यान, भारताची मिस वर्ल्ड ऐश्वर्या रायबद्दलही (Aishwarya Rai) बऱ्याच चर्चा सुरु झाल्यात. 'मिस वर्ल्ड 1994' (Miss World 1994) नोव्हेंबर 1994 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील सन सिटी येथे आयोजित करण्यात आला होता. जगभरातील 87 स्पर्धकांनी यामध्ये भाग घेतला होता. त्यावर्षी ऐश्वर्या रायने त्या क्राऊनवर स्वत:चं नाव कोरुन घेतलं.
'मिस वर्ल्ड 1994' जिंकताना ऐश्वर्या राय वन शोल्डर व्हाइट गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत होती. तिने पांढरे हातमोजे घातले आणि तिचे केस अप बनमध्ये स्टाईल केले. यापूर्वी तिने गडद रंगाच्या स्विमसूटमध्ये स्टेजवर रॅम्प वॉक केला होता. 30 वर्षांपूर्वी एश्वर्याच्या मोहक सौंदर्याने परीक्षकांवरही भूरळ घातली होती. इतकच नव्हे तर हा क्राऊन जिंकल्यावर ऐश्वर्याने दिलेल्या भाषणामुळेही साऱ्यांची मनं जिंकली होती.
मिस वर्ल्ड 1994 च्या क्राऊनवर ऐश्वर्याने कोरलं नाव
या मिस वर्ल्डच्या फेरीत ऐश्वर्याला काही प्रश्न विचारण्यात आले होते. तिने त्या प्रश्नांवर दिलेल्या उत्तरामुळे साऱ्यांचीच मनं जिंकली होती. उपांत्य फेरीत ऐश्वर्याला प्रश्न विचारण्यात आला होता की, 'मिस वर्ल्ड 1994 मध्ये कोणते गुण असावेत? त्यावर तिनं उत्तर दिलं की, आजपर्यंत ज्या मिस वर्ल्ड झाल्या आहेत, त्यांच्याकडे दयेच्या भावनेने पाहिलं जात. अनेकदा दया दाखवली जाते. आपल्याकडे असेही अनेक लोक आहेत, जे अनेक अडथळ्यांमधून मग ते राष्ट्रीयत्व असो किंवा रंग या सगळ्यांना पार करतात. आपल्याला त्यापलिकडे जाऊन पाहावे लागेल आणि त्यातूनच खरी मिस वर्ल्ड बनू शकले. ही खऱ्या माणासाची व्याख्या आहे.
सिनी शेट्टीने ऐश्वर्याच्या गाण्यावर केलं नृत्य
फेमिना मिस इंडिया 2022 सिनी शेट्टी हिने 71 व्या मिस वर्ल्ड स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलं. तिने टॅलेंट राऊंडमध्ये तिच्या गाण्यांवर नृत्य सादर केले. ऐश्वर्याने 1994 मध्ये मिस वर्ल्डचा ताज जिंकला होता आणि यावर्षी त्या ऐतिहासिक क्षणाला 30 वर्षे पूर्ण होत आहेत. हम दिल दे चुके सनम' मधील 'निंबूडा', 'ताल' मधील 'ताल से ताल मिला' आणि 'बंटी और बबली' मधील 'कजरा रे' यासारख्या ऐश्वर्याच्या काही हिट गाण्यांवर सिनीने नृत्य सादर केले.