Aishwarya Rai Bachchan pregnancy: ऐश्वर्या राय - अभिषेक बच्चनच्या जीवनात नव्या पाहुण्याची चाहूल? Good News असल्याच्या चर्चांना उधाण
ऐश्वर्या रायचा एक लुक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. लोकांनी तिच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीबाबत चर्चा करण्यास सुरुवात केली.
Aishwarya Rai Bachchan pregnancy: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आपल्या मोहक स्टाइल स्टेटमेंटमुळे नेहमीच चर्चेत असते. ऐश्वर्या राय बच्चनने आपल्या पोन्निईन सेलवन चे शूटिंग नुकतेच पूर्ण केले आहे. शुटिंगसाठी सध्या ऐशवर्या तामिळनाडू येथे आहे. रविवारी पती अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्यसोबत चित्रपटाच्या को-स्टार सरथ कुमारच्या घरी पोहचली. त्यावेळी शरथ कुमारची मुलगी आणि अभिनेत्री वरलक्ष्मीने इंन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले.
ऐश्वर्या रायचा हा लुक सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी तिच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीबाबत चर्चा करण्यास सुरुवात केली. ऐश्वर्या प्रेग्नेंट असल्यानं तिनं अशा पद्धतीचा ड्रेस घातल्याच काही चाहत्यांनी म्हटलं आहे. ऐश्वर्या प्रेग्नेंट आहे? ऐश्वर्या बेबी बंप लपवत अशा कमेंटस देखील तिच्या फोटोवर नेटकऱ्यांनी केल्या आहे.
View this post on Instagram
ऐश्वर्याने काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर टॉप घातला होता. या फोटोमध्ये ऐश्वर्याचे वजन वाढल्यासारखे दिसत आहे. तर आपल्या हाताने पोट लपविण्याचा ऐश्वर्या प्रयत्न करत आहे. ऐश्वर्याचे हे फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनी ती प्रेग्नंट असल्याचा अंदाज लावण्यास सुरुवात केली. या फोटोमध्ये अभिषेकने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि जीन्स घातली आहे. तर आराध्याने फ्लोरल ड्रेस घातला आहे. ऐश्वर्या आणि अभिषेकच्या या फोटोनी चाहत्याचे मन जिंकले आहे.
तर दुसरीकडे वरलक्ष्मीने फोटो शेअर करत अभिषेक आणि ऐश्वर्या बच्चनला भेटल्याबद्दल आनंद व्यक्त करत आभाराची एक मोठी पोस्ट लिहली आहे. बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या बच्चनने 2011 मध्ये आराध्याला जन्म दिला. यानंतर तिनं आपले संपूर्ण लक्ष लेकीच्या संगोपनावर केंद्रित केलं. आता पुन्हा ऐश्वर्या फोटो शेअर करताचकमेंट बॉक्समध्ये चाहत्यांनी लगेचच या जोडीला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे.
ऐश्वर्या राय बच्चनला फेमिना मिस इंडिया व मिस वर्ल्ड पुरस्कार मिळालेत. तिने हिंदी भाषा, तमिळ, तेलुगू, बंगाली आणि इंग्लिश अश्या अनेक चित्रपटांत काम केले आहे. 2009 मध्ये तिला पद्मश्री ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ऐश्वर्याचा 2007 मध्ये अभिषेक बच्चन बरोबर विवाह झाला.
ऐश्वर्या आणि अभिषेकनं गरोदरपणाबाबत कोणतंही अधिकृत वक्तव्य केलं नसलं तरीही त्यांनी पोस्ट केलेला हा फोटो बराच बोलका आहे. त्यामुळं आता तो प्रचंड व्हायरल होत आहे.