एक्स्प्लोर

Nagar: रंगभूमीच्या रंणांगणात अहिल्यानगर महाकरंडकचा धुरळा, तरुणाईच्या सळसळत्या उत्साहात स्पर्धा संपन्न

Ahilyanagar Mahakarandak: ‘अहिल्यानगर महाकरंडक 2025’ या एकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आज सावेडीतील माऊली सभागृहात उत्साहात झाला.

Ahmednagar: राज्यात आता एकांकिका स्पर्धा,आंतरराज्य नाटक स्पर्धांचे वारे वाहू लागले आहेत . फिरोदिया, पुरुषोत्तमसारख्या स्पर्धांसाठी नाटकांची रंगीत तालीम सुरू झाली असून जिल्हा जिल्ह्यात तरुणाईत जल्लोष संचारलाय . दरम्यान, महाराष्ट्राची सगळ्यात मोठी आणि मानाची एकांकिका स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘अहिल्यानगर महाकरंडक 2025’ या एकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आज सावेडीतील माऊली सभागृहात उत्साहात झाला. ही स्पर्धा 16 ते 19 जानेवारी या कालावधीत झाली. या स्पर्धेत ‘सखा’ एकांकिकेने अहिल्यानगर महाकरंडक’ पटकावला. तर अनिल आव्हाड (गुडबाय किस) सर्वोत्कृष्ट अभिनेता, संस्कृती पवार (सेक्स ऑन व्हिल्स) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली. (Ahilyanagar Mahakarandak)

पारितोषिक समारंभाच्या वेळी आमदार संग्राम जगताप, आमदार सत्यजित तांबे, सुप्रसिद्ध दिग्दर्शक उमेश शुक्ला, परीक्षक, अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे, निर्माता आणि दिग्दर्शक आशिष वाघ, दिग्दर्शक आणि एडिटर मयूर हरदास, अहिल्यानगर महाकरंडक स्पर्धेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, स्पर्धेचे संयोजक स्वप्नील मुनोत, महावीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष हर्षल बोरा आदींची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेच्या वेळी शिवकालीन पुरातन नाणी, शिवकालीन शस्त्र आणि वस्तू यांचे प्रदर्शन देखील होते. यानिमित्ताने रंगकर्मींना आणि स्पर्धेला भेट देणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील दुर्मिळ वस्तू पाहायला मिळाल्या. स्पर्धेत प्रथम येणाऱ्या संघास 1 लाख 51 हजार 111 रुपये रोख, अहिल्यानगर महाकरंडक आणि प्रमाणपत्र असे पारितोषिक देण्यात आले.

अहिल्यानगर महाकरंडक म्हणून स्पर्धा ओळखली जाणार 

मागील 11 वर्षांपासून ‘अहमदनगर महाकरंडक’ नावाने प्रसिद्ध असणारी ही स्पर्धा जिल्ह्याचे नाव ‘अहिल्यानगर’ असे बदलल्याने आता ‘अहिल्यानगर महाकरंडक’ नावाने ओळखली जाणार आहे. यंदाचं स्पर्धेचं हे 12वे वर्ष होते. मागील एका तपात ही स्पर्धा राज्यातील सर्वात मोठी मानाची एकांकिका स्पर्धा म्हणून नाट्य वर्तुळात ओळखली जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला 351 वर्षे पूर्ण झाल्या निमित्त या एकांकिका स्पर्धेचं यंदाचं ‘उत्सव रंगभूमीचा, सोहळा शिवराज्याभिषेकाचा’ हे ब्रीदवाक्य होते.

अनुष्का मोशन पिक्चर्स अ‍ॅण्ड एंटरटेन्मेंट, शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन प्रायोजित, श्री महावीर प्रतिष्ठान आयोजित व आय लव्ह नगरच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा झाली. लेट्सअप हे या स्पर्धेचे डिजिटल पार्टनर होते. रंगकर्मींच्या अभिनय कौशल्याने सजलेल्या ‘अहिल्यानगर महाकरंडक’ एकांकिका स्पर्धा 2025 या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या एकांकिका स्पर्धेला झी युवा या वाहिनीची साथ मिळाली. झी युवा ही वाहिनी प्रायोजक म्हणून ‘अहिल्यानगर महाकरंडक’ 2025 स्पर्धेत आपली भूमिका बजावली.

सांघिक पारितोषिके

एकांकिका
प्रथम क्रमांक : सखा
द्वितीय क्रमांक : गुड बाय किस व ब्रम्हपुरा (विभागून)
तृतीय क्रमांक : लेबल 
उत्तेजनार्थ : स्पर्शाची गोष्ट
सर्वोत्कृष्ट विनोदी एकांकिका : टेबल नंबर 12 को क्या चाहिये व सेक्स ऑन व्हिल्स
परीक्षक शिफारस एकांकिका : त्यात काय

वैयक्तिक पारितोषिके

दिग्दर्शन
प्रथम क्रमांक : अजय पाटील (कुक्कुर)
द्वितीय क्रमांक : ओम नितीन चव्हाण (सखा)
तृतीय क्रमांक : संकेत पाटील व संदेश रणदिवे (चिनाब से रावी तक)
उत्तेजनार्थ : वैभव काळे (ब्रॅन्डेड बाय सडक छाप)
उत्तेजनार्थ : राकेश जाधव (गुडबाय किस)

अभिनेता

प्रथम क्रमांक : अनिल आव्हाड (गुडबाय किस)
द्वितीय क्रमांक : उत्कर्ष दुधाणे (सखा)
तृतीय क्रमांक : प्रवीण यादव (लेबल)
उत्तेजनार्थ : पवन पोटे (देखावा)
उत्तेजनार्थ : राहुल पेडणेकर (पैशाची गोष्ट)

अभिनेत्री

प्रथम क्रमांक : समृद्धी पवार (नेक्स ऑन व्हिल्स)
द्वितीय क्रमांक : हेमांगी आरेकर (त्यात काय)
तृतीय क्रमांक : अक्षदा काळे (गुडबाय किस)
उत्तेजनार्थ :  समृद्धी भोसले (देव बप्पा)
उत्तेजनार्थ : श्रावणी ओव्हळ (अनन्या अवज्ञा)

सह-अभिनेता
प्रथम क्रमांक : संकेत शहा (टेबल नंबर 12 को क्या चाहिये)

सह-अभिनेत्री : 
प्रथम क्रमांक : सेजल जाधव (क्रॅक इन द मिरर)

विनोदी कलाकार :
प्रथम क्रमांक : ऋषिकेश वांबूरकर (टेबल नंबर 12 को क्या चाहिये)
द्वितीय क्रमांक : सचिन सावंत (लेबल)

लक्षवेधी अभिनेता 
महेश कापरेकर (क्रॅक्स इन द मिरर)

प्रकाश योजना

प्रथम क्रमांक : मयुरेश शहा (सखा)
द्वितीय क्रमांक : सिद्धेश नामलसकर (जुगाड लक्ष्मी)
तृतीय क्रमांक : साई शिरसेकर (गुडबाय किस)

संगीत
प्रथम क्रमांक : अक्षय धांगट (जुगाड लक्ष्मी)
द्वितीय क्रमांक : दुर्गेश खिरे (सखा)
तृतीय क्रमांक : रोहन पटेल (गुडबाय किस)

नेपथ्य :
प्रथम क्रमांक : प्रणाल व क्षितीजा (जुगाड लक्ष्मी)
द्वितीय क्रमांक : देवाशीष दरवडे (चिनाब से रावी तक)
तृतीय क्रमांक : सिद्धेश नामलसकर (कुक्कुर)

रंगभूषा :
प्रथम क्रमांक : आचल दांडेकर (लेखिका)
द्वितीय क्रमांक : गौरव बहुतुले (ब्रम्हपुरा)

वेशभूषा :
प्रथम क्रमांक : गौरव बहुतुले (ब्रम्हपुरा)
द्वितीय क्रमांक : कोमल पारधी (लेखिका)

लेखन :

प्रथम क्रमांक : विपूल महापुरूष (टेबल नंबर 12 को क्या चाहिये)
द्वितीय क्रमांक : डॉ. निलेश माने (लेबल)
तृतीय क्रमांक : ओम नितीन चौहान (सखा)

परीक्षकांकडून जाहीर पारितोषिके :
राकेश जाधव (गुडबाय किस)
लेखिका एकांकिकेतील जाई

हेही वाचा:

Yuzvendra Chahal On Real Love: खरं प्रेम... घटस्फोटाच्या चर्चांमध्ये युजवेंद्र चहलची इन्स्टा पोस्ट; धनश्रीचं नाव नाही घेतलं, पण...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Zomato Share Price  :झोमॅटोचा शेअर गडगडला, तीन दिवसांमध्ये 44620 कोटी बुडाले, पुढं काय, तज्ज्ञ काय म्हणाले?
झोमॅटोच्या शेअरमध्ये घसरणीचा ट्रेंड, गुंतवणूकदारांचे 44 हजार कोटी बुडाले, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
Maharashtra Politics: शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
Jos Buttler on BCCI Rule : बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Judicial Custody : वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुढे काय?ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 22 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सPune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळलीRadhakrishna Vikhe Patil : दुर्लक्ष करा जरा,गाड्या चालू द्या; वाळू माफियांना अप्रत्यक्ष अभय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Zomato Share Price  :झोमॅटोचा शेअर गडगडला, तीन दिवसांमध्ये 44620 कोटी बुडाले, पुढं काय, तज्ज्ञ काय म्हणाले?
झोमॅटोच्या शेअरमध्ये घसरणीचा ट्रेंड, गुंतवणूकदारांचे 44 हजार कोटी बुडाले, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
Maharashtra Politics: शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
Jos Buttler on BCCI Rule : बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
PM Kisan : पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे  2000 रुपये मिळण्यासाठी करावं लागेल महत्त्वाचं काम, अन्यथा...
पीएम किसानचे 18 हप्त्यात 36000 रुपये मिळाले, 19 व्या हप्त्याचे 2000 मिळवण्यासाठी करावं लागेल महत्त्वाचं काम
Walmik Karad: पहिल्या पत्नीपेक्षा दुसऱ्या पत्नीच्या नावे चौपट संपत्ती, वाल्मिक कराडच्या दोन्ही पत्नींच्या नावे किती मालमत्ता?
पहिल्या पत्नीपेक्षा दुसऱ्या पत्नीच्या नावे चौपट संपत्ती, वाल्मिक कराडच्या दोन्ही पत्नींच्या नावे किती मालमत्ता?
IND vs ENG 1st T20 : टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, इंग्रंजांविरुद्ध सावध राहावं लागणार; कोलकाता सामन्यापूर्वी हे रेकॉर्ड पाहाच!
टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, इंग्रंजांविरुद्ध सावध राहावं लागणार; कोलकाता सामन्यापूर्वी हे रेकॉर्ड पाहाच!
Eknath Shinde: वाल्मिक कराड किंवा कोणीही असू दे, सुटणार नाही; फाशीशिवाय दुसरी सजा नाही; एकनाथ शिंदे कडाडले
वाल्मिक कराड किंवा कोणीही असू दे, सुटणार नाही; फाशीशिवाय दुसरी सजा नाही; एकनाथ शिंदे कडाडले
Embed widget