Yuzvendra Chahal On Real Love: खरं प्रेम... घटस्फोटाच्या चर्चांमध्ये युजवेंद्र चहलची इन्स्टा पोस्ट; धनश्रीचं नाव नाही घेतलं, पण...
Yuzvendra Chahal On Real Love: युजवेंद्र आणि धनश्रीच्या घटस्फोटाचं वृत्त समोर आल्यापासून युजवेंद्र चहलनं एकापाठोपाठ एक इनडिरेक्ट पोस्ट केल्या आहेत. त्याच्या सर्वच्या सर्व पोस्ट चर्चेचा विषय ठरल्या होत्या.
Yuzvendra Chahal Post On Real Love: क्रिकेटर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) सध्या त्याची पत्नी कोरियोग्राफर धनश्री वर्मा (Dhanashree Verma) सोबतच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच युजवेंद्र चहलच्या लेटेस्ट पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. युजवेंद्र चहलनं सोशल मीडियावर (Social Media) स्वतःचे काही फोटो अपलोड केले आहेत. तसेच, या फोटोंसोबत युजवेंद्र चहलनं एक कॅप्शनही दिलं आहे. युजवेंद्रनं दिलेलं हेच कॅप्शन नेटकऱ्यांनी हेरलं असून सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. नेटकऱ्यांनी युजवेंद्रचं कॅप्शन डिकोड केलं असून यातून युझीनं धनश्रीला खडे बोल सुनावल्याचा दावा नेटकरी करत आहेत.
युजवेंद्र आणि धनश्रीच्या घटस्फोटाचं वृत्त समोर आल्यापासून युजवेंद्र चहलनं एकापाठोपाठ एक इनडिरेक्ट पोस्ट केल्या आहेत. त्याच्या सर्वच्या सर्व पोस्ट चर्चेचा विषय ठरल्या होत्या. अशातच आता पुन्हा एकदा युजवेंद्रनं केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे. मंगळवारी चहलनं इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले होते. फोटोंपेक्षा युजवेंद्रनं दिलेलं कॅप्शन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
View this post on Instagram
चहलनं कॅप्शनमध्ये नेमकं काय म्हटलं आहे?
युजवेंद्र चहलनं फोटो शेअर करत त्यासोबत एक कॅची कॅप्शन दिलं आहे. युझीनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "खरं प्रेम दुर्मिळ होत चाललं आहे आणि मी स्वतः दुर्मिळ आहे." यासोबत युजवेंद्रनं एक हसण्याचा इमोजी शेअर केला आहे.
युजवेंद्र, धनश्रीचा घटस्फोट?
युजवेंद्र चहलनं आपल्या घटस्फोटाच्या चर्चांबाबत अद्याप उघडपणे कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. तसेच, धनश्री वर्मानंही अद्याप घटस्फोटाबाबत कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. पण, दोघांनीही घटस्फोटाच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं आहे. दरम्यान, दोघांनीही 2020 मध्ये एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली होती. पण, दोघांमध्येही सध्या काही आलबेल नसल्याचं दिसून येत आहे. युजवेंद्रनं धनश्रीसोबतचे फोटो सोशल मीडियावरुन डिलीट केले आहेत. तर, धनश्रीनं युजवेंद्रचं आडनावही आपल्या नावासमोरून हटवलं आहे.