Pathaan Screening : 'पठाण'च्या स्क्रिनिंगनंतर सेलिब्रिटींचा जल्लोष, 'बेशरम रंग' गाण्यावर थिरकले सेलिब्रिटी; व्हिडीओ पाहाच
Pathaan Screening Inside Pics : 'पठाण' रिलीज होण्यापूर्वी चित्रपटाचं स्क्रीनिंग ठेवण्यात आलं होतं. ज्यामध्ये स्टार कास्ट आणि इतर क्रू मेंबर्सनी जोरदार पार्टी केली.
![Pathaan Screening : 'पठाण'च्या स्क्रिनिंगनंतर सेलिब्रिटींचा जल्लोष, 'बेशरम रंग' गाण्यावर थिरकले सेलिब्रिटी; व्हिडीओ पाहाच after pathaan screening celebrities danced on besharam rang deepika shah rukh john watch marathi news Pathaan Screening : 'पठाण'च्या स्क्रिनिंगनंतर सेलिब्रिटींचा जल्लोष, 'बेशरम रंग' गाण्यावर थिरकले सेलिब्रिटी; व्हिडीओ पाहाच](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/25/4e9270270b7a85f4654bb053bcb1c9401674637298898358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pathaan Screening Inside Pics : बहुप्रतीक्षीत 'पठाण' (Pathaan) हा चित्रपट आज रिलीज झाला आहे. मात्र, चित्रपट रिलीज होण्यापूर्वी चित्रपटाचं स्क्रीनिंग ठेवण्यात आलं होतं. ज्यामध्ये स्टार कास्ट आणि इतर क्रू मेंबर्सनी चित्रपट पाहिल्यानंतर जोरदार पार्टी केली. या संबंधित काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. ज्यामध्ये चित्रपटाची संपूर्ण टीम पार्टी करतेय. या फोटोंमध्ये अभिनेता शाहरुख खान, अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम फॅन्सबरोबर फोटो काढताना दिसत आहेत.
दरम्यान, कोरिओग्राफर वैभवी मर्चंट आणि बॉस्को मार्टिस यांचा एक व्हिडीओही समोर आला आहे ज्यामध्ये दोघांनी 'पठाण' चित्रपटातील 'बेशरम रंग' गाण्यावर डान्स केला आहे. या चित्रपटाच्या रिलीज आधीच, निर्मात्यांनी मंगळवारी मुंबईतील यशराज फिल्म्स स्टुडिओमध्ये एक खास स्क्रीनिंग अरेंज केलं होतं. या पार्टीला पठाण स्टारकास्टसह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.
View this post on Instagram
स्क्रिनिंगमध्ये शाहरुखची पत्नी, इंटिरियर डिझायनर गौरी खान आणि दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद तसेच डान्स कोरिओग्राफर वैभवी मर्चंट आणि बॉस्को मार्टिस, अभिनेत्री राणी मुखर्जी आणि जॉनची पत्नी प्रिया रुंचालसह अनेक सेलिब्रिटी दिसले.
View this post on Instagram
पठाणच्या स्क्रिनिंग दरम्यान, शाहरूख खान आणि जॉन अब्राहम ब्लॅक आऊटफिटमध्ये दिसले. चित्रपट निर्माते सिद्धार्थ आनंद यांनीही काळा आउटफिट घातला होता. पठाणच्या स्क्रिनिंगसाठी, दीपिकाने ऑल-बेज कलरच्या ड्रेसमध्ये दिसली.
View this post on Instagram
स्पेशल स्क्रिनिंगच्या निमित्ताने शाहरुख खानने अभिनेत्री एकता कौलबरोबर फोटोसाठी पोजही दिली. शाहरुखबरोबरचा तिचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, "ये सब साथ!" या चित्रपटात एकता कौल महत्त्वाच्या भूमिकेत दिसली आहे.
View this post on Instagram
महत्त्वाच्या बातम्या :
Kangana Ranaut On Twitter : नाव न घेता कंगना रनौतने साधला 'पठाण'वर निशाणा, म्हणाली...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)