Aditi Dravid : बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीचा डंका; अदितीनं पटकावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
अदितीला IJAAD (Journey of Discovery) या चित्रपटामधील अभिनयासाठी बर्लिन फिल्म फेस्टिव्हलचा (Berlin Indie Film Festival) सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.
Aditi Dravid : मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री अदिती विनायक द्रविड (Aditi Vinayak Dravid) हिनं बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा (Best Actress) पुरस्कार पटकावला आहे. अदितीला IJAAD (Journey of Discovery) या चित्रपटामधील अभिनयासाठी बर्लिन इंडिया फिल्म फेस्टिव्हलचा (Berlin Indie Film Festival) सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.
IJAAD (Journey of Discovery) या चित्रपटाचे दिग्दर्शन पियुष कुलकर्णी यांनी केले आहे. हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटामध्ये अदितीनं अस्मी ही भूमिका साकारली आहे. पुण्याच्या अदिती द्रविडनं आता बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कर पटकावून मराठी चित्रपटसृष्टीची मान अभिमानानं उंचावली आहे.
अदितीच्या मालिका
‘माझ्या नवऱ्याची बायको’या मालिकेमुळे अदितीला विशेष लोकप्रियता मिळाली. या मालिकेमध्ये अदितीनं शनायाची मैत्रीण म्हणजेच ईशाची भूमिका साकारली होती.‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेमध्ये अदितीनं नंदिनी ही भूमिका साकारली. अदिती सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असते. तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. अदितीच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते.
View this post on Instagram
अदिती आणि क्रिकेटर राहुल द्रविडचं नातं
अदिती आणि क्रिकेटर राहुल द्रविड यांचं खास नातं आहे. एकदा अदितीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन क्रिकेटर राहुल द्रविडसोबत असणाऱ्या नात्याबाबत तिच्या चाहत्यांना सांगितलं होतं. राहुल द्रविड हा अदितीचा चुलत काका आहे. अदितीनं तिचा बालपणीचा एक फोटो शेअर करुन ही माहिती चाहत्यांना दिली होती.
हेही वाचा: